ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
"जादूटोणा, चमत्कार वा मंत्र याद्वारे, प्रेम एका हृदयातून दुसऱ्या हृदयामध्ये स्थलांतरीत करता येत नाही."
११
गुप्तभाव
स्वामींनी सांगितलेल्या दूता हस्ते शिवसूत्र पुस्तक मी स्वामींना अर्पण केले. नंतर स्वामींनी मला 'सत्ययुग आणि कर्मकायदा' लिहिण्यास सांगितले. हे पुस्तकही स्वामींना दर्शनाची वेळी देण्यात आली. ह्यावेळी एक भक्त पुट्टपर्तीहून मुक्ती निलयमला आले होते. मी त्यांना हे पुस्तक दिले आणि स्वामींच्या दूताला देण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ फेब्रुवारी २००९ ला स्वामींनी ते घेतले.
या सर्व गोष्टी गुप्तपणे का बरे होत आहेत? माझं पहिलं पुस्तक स्वामींनी उघडपणे, त्यांच्या स्वतःच्या हातांनी प्रकाशित केले. आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना ते प्रशांति पुस्तकालयात ठेवण्यास सांगितले. परंतु अधिकाऱ्यांनी नकार दिला. परमेश्वर काय करणार? कलियुगातील मानव परमेश्वराच्या शब्दांकडे कानाडोळा करतो. त्यानंतर एका व्यक्तीने मला माझा पुस्तक दाखवून, मला प्रशांति निलयममध्ये येण्यास बंदी घातली; यावर परमेश्वर काय करणार? त्यांनी मला आत बोलवण्यासाठी गुप्तपणे दूत पाठविले. ते माझी पत्रे, पुस्तके, सर्व काही घेतात. परमेश्वराची इच्छा असेल तर ते या सर्व लोकांना बाजूला सारून मला नाही का बोलवू शकत? ते तसं का नाही करत?
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा