रविवार, २५ ऑगस्ट, २०२४

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

         " त्याग आणि करुणा हे प्रेमाचे दोन नेत्र आहेत. "

१२

  सहस्त्र मातांचे प्रेम

           
१४ फेब्रुवारी २००९.
             मुद्दनहळ्ळीला स्वामींचे दर्शन झाल्यावर मला खूप आनंद झाला. संध्याकाळी अनेक भक्त भेटायला आले आणि आम्ही कर्मकायदा पुस्तकावर चर्चा केली. तसेच त्यांच्या स्वामींसोबतच्या मुद्दनहळ्ळीच्या प्रवासाविषयी बोललो.
१५ फेब्रुवारी २००९.
वसंता- स्वामी, काल अब्राहम लिंकनविषयी बोलताना तुमच्या डोळ्यात अश्रू आले. का बरं?
स्वामी-  ते तुझ्यासाठीच होते. त्यांनीसुद्धा तुला हकलून दिले. तू एका कोपऱ्यात अनाथासारखी बसून राहिलीस. ते सहन न झाल्याने मी माझे भाव गोष्टीरुपात व्यक्त केले.
वसंता- स्वामी सत्ययुग आणि कर्मकायदा हे पुस्तक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
स्वामी- तू काही पुस्तके माझ्याकडे पाठवून दे.
वसंता- स्वामी, मला भीती वाटते, जर कोणी पाहिले तर ते मला धमकी देतील. नको स्वामी..... मी नाही पाठवणार.
स्वामी- तू का बरं घाबरतेस तू माझ्याकडे पाठवून दे.
ध्यानाची समाप्ती.


संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा