ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - १५ , श्लोक ९
याप्रकारे जीवात्मा कान, डोळे त्वचा, जीभ, नाक आणि मन यांच्या आश्रयानेच विषयांचा उपभोग घेतो.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव .....
कान्हा, प्रभू, तू आश्रयदाता आहेस. हा यःकश्चित जीव नाक, कान, डोळे, त्वचा आणि जीभ यांच्याद्वारे विषयवस्तूंचा उपभोग घेतो. हे आदीपुरुषा, माझे मन त्यांच्यामागे न जाता तुझ्याकडे धाव घेऊ दे. हे नीलवर्ण मेघश्यामला! नित्यानंदा! जानकीरामा! श्रीमन् नारायणा, तू आश्रयदाता आहेस. शरणो शरणम्. कान्हा, या जिवाला ताबडतोब तुझ्या चरणांशी घे. मी तुला शरण आलो आहे. मला आश्रय दे.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा