ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - १५ , श्लोक ११
योगीजनही आपल्या हृदयात असलेल्या या आत्म्याला प्रयत्नानेच तत्वतः जाणतात, परंतु ज्यांनी आपले अंत:करण शुद्ध केलेले नाही असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही या आत्मस्वरूपाला जाणत नाहीत.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव .....
कान्हा, या दीन जीवाला तुझ्या प्राप्तीसाठी श्रमणारा योगी बनव. तू माझ्या अंतःकरणात वास करतो आहेस, हे मला दर्शव. हे प्रभू! सप्तगिरीवासा, माझा माझ्यावर ताबा राहू दे. माझे अज्ञान दूर कर. अच्युता! हे हरितवर्णा, शेषशयना, तूच माझे आश्रयस्थान आहेस. शरणो शरणम्.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा