रविवार, ९ नोव्हेंबर, २०२५

 


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक ८
 
           ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर वास्तूतील गंध घेऊन जातो, त्याचप्रमाणे देवादिकांचा स्वामी जीवात्माही ज्या शरीराचा त्याग करतो, त्या शरीराचा त्याग करतो, त्या शरीरातून मनसहित इंद्रिये बरोबर घेऊन नवीन शरीरात जातो. 

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा ! या दीन जिवाने देह सोडताना, ज्याप्रमाणे गंध बरोबर घेऊन वारा वाहतो तसे इंद्रिये बरोबर घेऊन जाऊ नये, तर तुला घट्ट पकडून ठेवावे. तू हे कर. मरतेक्षणी तुझा विचार येईल असे विचार दे. तुझा विचार करतच मृत्यू येऊ दे. वासुदेवा! वैकुंठवासा ! या अतिमूर्खाला तुझ्या सुवर्णचरणांवर घेऊन आशीर्वादित कर. हा भूमीदेवाला भार होऊन अजून का जगतो आहे ? परमधामा ! दुवा दे. या अगतिकाची गती तूच. शरणो शरणम्. 

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा