ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
अध्याय १
मानवतेचा इतिहास
एक कोळी स्वतःभोवती जाळी विणतो व स्वतःच्या मध्यभागी बसतो. अगदी असेच प्रत्येक मनुष्याने स्वतःभोवती संस्कारांचे जाळे बनविले आहे. पूर्वीच्या जन्मांमध्ये त्यांनी जे काही केले असते, त्याचे या जन्मात संस्कार होतात. हे त्याने स्वतः निर्माण केलेलं जाळं आहे. मानव स्वतः विधीलिखित लिहून स्वतःला शापित करतो. कोणाचीही या जाळ्यातून सुटका नाही. हा कर्म कायदा आहे. भगवंत सुद्धा या कर्म कायद्याला बांधील असतो. हे कसे काय? आपण पाहू या.
रामावताराच्या काळात वालीने तप करून वर प्राप्त केला. जो कोणी त्याच्याशी युद्ध करेल त्याची अर्धी शक्ती वालीला मिळेल असा तो वर होता. रामाने सुग्रीवास वालीशी युद्ध करण्यास सांगितले. त्यावेळी झाडामागे लपून रामाने बाण मारून वालीचा वध केला. जर रामाने हे केलं नसतं तर वालीचा वध कोणीही करू शकले नसते. हे अवतार कार्य होते. अवतार अवतरतो तेव्हा सर्व योजना आखतो, सर्वकाही त्यानुसारच घडले पाहिजे. पुढील युगात वाली नावाच्या पारध्याने झाडामागून कृष्णाच्या पायाच्या अंगठ्यावर बाण मारला व त्याचा मृत्यू झाला. रामाच्या चुकीच्या कृतीमुळे हे सर्व घडले. कर्म कायद्यापासून कोणाचीही सुटका नाही याचे प्रात्यक्षिक अवतार स्वतः करतात. आपण अजून एक उदाहरण पाहू.

संदर्भ - सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा