रविवार, २२ मार्च, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " आत्मा म्हणजे काय ? ते शुद्ध चैतन्य आहे. जो अविनाशी, अजन्मा, अमर आहे. "

भाग - आठवा 

' मी विना मी ' ची गुणवैशिष्ट्ये 

              मी सर्व आत्मसाक्षात्कारी जीवांहून वेगळी आहे. मला परमेश्वर आणि जग दोन्ही हवे आहे. मला द्वैत हवे आहे. का ? कारण मला जगातील सर्वांचे परिवर्तन घडवून त्यांना माझ्यासारखे बनवायचे आहे. जर मी समाधी-अवस्थेत राहिले,  तर इतर संतमाहात्म्यांसारखी मलाही मोक्षप्राप्ती होईल. संपूर्ण जगाला मुक्ती मिळावी अशी माझी इच्छा आहे. सर्वांनी मुक्तीचा अनुभव घ्यावा. इतरांच्यात आणि माझ्यात हा फरक आहे. ईशावस्थेसह सर्व उच्च अवस्था या समाधी अवस्थेसारख्या आहेत. जर मी परमेश्वर झाले तर जगाच्या कर्मांचा संहार कसा करणार ? सर्वांना मुक्ती कशी देणार ? माझ्या हातामध्ये कर्माचा तराजू येईल आणि मी साक्षी अवस्थेत असल्याने कोणासाठीही काही करू शकणार नाही, हे मला नको आहे. 

*     *     *

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, १९ मार्च, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " सर्वकाही परमेश्वर आहे. प्रत्येक गोष्ट परमेश्वराचेच रूप आहे. तेथे केवळ परमेश्वरच आहे अन्य काही नाही. "

भाग - आठवा 

' मी विना मी ' ची गुणवैशिष्ट्ये 

           अनेक वर्षांपूर्वी मी पूजा करत असताना समाधी  अवस्थेमध्ये गेले. पूर्वावस्था येण्यास पुष्कळ वेळ गेला. मी रडत  स्वामींना म्हणाले," मला समाधी नको आहे. मी समाधीमध्ये असताना तुमच्या विचारांमध्ये राहू शकत नाही." स्वामींनी माझी समजूत घातली ते म्हणाले," घाबरू नकोस. तू मला कधीही विसरणार नाहीस." सर्वांनी आश्चर्याने विचारले," तुम्हाला समाधी-अवस्था का नको आहे ? तुम्हाला ऐक्य का नको आहे ?" मला झोप आणि समाधी यांची भीती वाटते. का ? गाढ झोपेत आणि समाधी-अवस्थेत जीवाचा परमेश्वराशी योग्य होतो. तो ऐक्यावस्थेत असतो. मला हे नको आहे. मी परमेश्वरपासून वेगळी असायला हवी. परमेश्वर माझ्याहून वेगळा असावा असे मला वाटते. का ? कारण मला त्याचा ध्यानावस्थेत अनुभव घ्यायचा आहे. मला त्याच्याशी संवाद साधायचा आहे आणि त्याच्या सान्निध्यातून मिळणाऱ्या परमानंदाची अनुभूती घ्यायची आहे. माझे सर्व लिखाण केवळ ध्यानातील अनुभवांवर आधारित आहे.

*     *     * 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम  

रविवार, १५ मार्च, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

" अनासक्त जीवन जगणे म्हणजेच मुक्ती होय."

भाग -आठवा

' मी विना मी ' ची गुणवैशिष्ट्ये 

मला नवीन औषधांचीही भीती वाटते.

           मला सतत शिंका येतात व त्वचेला कंड सुटते. मला कोणते औषध लागू पडेल ? होमिओपथिक, नेचरोपथिक, Allopathy  का आयुर्वेदिक ... माझा देह यांपैकी कशाचाच स्वीकार करणार नाही. माझ्यासाठी ' साईपथी ' हे एकमेव औषध आहे. त्यांचे चिंतन हेच माझे औषध आहे.

मला आजारांची भीती वाटते. 

            किरकोळ आजार झाला तरी मला भीती वाटते की , त्याने माझे लक्ष देहाकडे वळेल आणि तो आजार ईशचिंतन करणारे माझे मन व्यापून टाकेल. 

मला झोपेची भीती वाटते.

            मला झोपेची भीती वाटते. मी नेहमी स्वामींना  रडून रडून सांगते," मला झोप नको आहे. मला झोप नको आहे." मी जर झोपले तर मला परमेश्वराचे विस्मरण होईल अशी मला भीती वाटते. मला जर एखादे नवीन औषध लिहून दिले तर ते घेण्यापूर्वी " याने मला ग्लानी तर येणार नाही ना ?" असे मी विचारते. एका क्षणासाठीही मला स्वामींचे विस्मरण होऊ द्यायचे नाहीये. झोप म्हणजे वेळेचा अपव्यय असे मला वाटते. 

*     *     *

उर्वरित प्रकरण  पुढील भागात.....

जय साईराम    

गुरुवार, १२ मार्च, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

        " आपल्या मार्गात अनेक अडथळे आले तरी आपण आपला धर्म (स्वधर्म), सदाचरण याच्याशी निष्ठावंत राहिले पाहिजे. " 

भाग आठवा 

' मी विना मी ' ची गुणवैशिष्ट्ये

मला पैसा आणि दागिने यांची भीती वाटते. 

           लहानपणापासूनच मला माझ्याजवळ पैसे बाळगायची सवय नाही. कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त मी जर कधी कोणाबरोबर गावाला गेले तर माझ्या खर्चाचे पैसे मी त्यांच्याजवळ ठेवायला देत असे. ते खर्च करत असत. मी कधीही माझ्याजवळ पैसे व पर्स ठेवली नाही. जर कोणी मला दागिने दिले तरी मला भीती वाटते. माझ्या विवाहप्रसंगी माझ्या बहिणींनी मला अनेक रत्नजडित अलंकारांनी सजवले होते. मी माझ्या आजीजवळ रडले आणि म्हणाले, " त्यांनी मला एखाद्या सिनेकलावंतासारखे नटवले आहे. मला हे नको आहे. खरच नको आहे. " मी रडून त्यांना ते सर्व उतरविण्यास सांगितले. कोणीही स्त्री असे सांगेल का त्यानंतर स्वामींनी मला नवरत्नांचे दागिने करून घालण्यास सांगितले. मी म्हणाले, " स्वामी, मला यांचे ओझे होते. जेव्हा तुम्ही मला बोलवाल तेव्हा ते सर्व मी तुमच्या चरणकमलांवर अर्पित करेन."

मला उंची साड्यांची भीती वाटते 

             मला अनेक लोक उंची साड्या देतात. त्या मी नेसत नाही व इतरांना भेट देऊन टाकते. बालपणापासूनच मी नेहमी खादीची वस्त्रे वापरत असे. त्यांनतर मी ३० रु. किंमतीच्या साड्या वापरू लागले. मला या चैनीच्या वस्तू पहायची भीती वाटते. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   

रविवार, ८ मार्च, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" अनासक्त जीवन जगणे म्हणजेच मुक्ती होय. " 

भाग आठवा 

' मी विना मी ' ची गुणवैशिष्ट्ये 

              या जगात मीच का बरं अशी वेगळी आहे ? कारण ही परमेश्वराची स्पंदशक्ती आहे. हा ' मी विना मी ' त्याची चैतन्यशक्ती, क्रियाशक्ती आहे. 
माझ्या मनात नेहमीच असे भय असते की 
कोणी मला परमेश्वरापासून दूर करू नये ... 

मला नवीन लोकांची भीती वाटते. 

          त्यांचा स्वभाव कदाचित माझ्याशी जुळणारा नसेल. ते परमेश्वराव्यतिरिक्त इतर गोष्टींबद्दल बोलतील. मला भीती वाटते की त्याने माझे मनही विचलित होईल .

मला नवीन पदार्थांची भीती वाटते. 

           कोणताही नवीन पदार्थ खाण्याची मला भीती वाटते. तो पदार्थ खाल्ल्याने कदाचित मला allergy
  होऊन कंड सुटेल किंवा शिंका येतील, माझे मन परमेश्वरापासून ढळून देहाकडे वळेल, अशी मला भीती वाटते.

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, ५ मार्च, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " तेलाच्या संततधारेसारखे आपणही अखंड परमेश्वराचे चिंतन केले पाहिजे. "

भाग आठवा 

मी विना मी ' ची गुणवैशिष्ट्ये 

              ... मला स्वतःचे व्यक्तित्व नाही, म्हणून मला पाच वर्षांनंतर कोणीही पाहू नये, माझा देह कोणी पाहू नये असा वर मी मागितला. मी देह नाही, मी मन नाही, मी इंद्रिये नाही, मी बुद्धी नाही. मी केवळ त्यांच्या चरणांखालची धूळ आहे. 
              ... शिक्षण, वैद्यकशास्त्र, कला आणि संस्कृती इ. क्षेत्रांमधील मान्यवरांना किताब बहाल केले जातात. त्यांना मिळालेले पद्मश्री, पद्मभूषण यांसारखे किताब ते आपल्या नावाशी जोडतात. 
               मला नावलौकिक आणि किताब यांची भीती का वाटते ? परमेश्वरानी दिलेली १०८ नामेही मी नाकारली. मला देऊ केलेले परमेश्वरपदही मी स्वीकारले नाही कारण तोही एक प्रकारे किताबाच आहे. मला हा ' मी ' नको आहे. मी माझा ' मी ' स्वामींनी अर्पण केल्यावर माझे स्वतःचे असे काय असू शकते ? हा ' मी विना मी ' दर्शवण्यासाठी मला वसंतचे नाम आणि रूप देण्यात आले. मला तर माझी ही ओळखही नको आहे. या देहाचे ज्योतीमध्ये परिवर्तन होऊन स्वामींच्या देहामध्ये विलीन व्हावे अशी माझी इच्छा आहे. देहभावाविना मी हा देह वागवत आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम    

रविवार, १ मार्च, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

         " आपण केवळ ह्या परमेश्वराच्या निर्मितीचे विश्वस्त आहोत आपण कोणत्याही गोष्टीचे मालक नाही."

भाग आठवा

' मी विना मी ' ची गुणवैशिष्ट्ये

             ... आश्रमाची संस्थापक म्हणून मी ओळखली जावी अशी माझी इच्छा नाही. आश्रम आणि त्यांचे संस्थापक त्यांच्या अनुयायांच्या आध्यात्मिक प्रगतीस सहाय्यभूत ठरतात, तिथे फक्त थोडे बदलतील. मी विचारते," सर्वांना मुक्ती मिळेल का ? एखाद्याची आध्यात्मिक मार्गावर खरीखुरी प्रगती होईल का ? कलियुगातील दुःख दूर होईल का ? म्हणून तर मला ईशपदही नको आहे. जर ते सर्वांना मोक्षपद प्राप्त करून देणार असेल तर तुम्ही मला ' मी '  द्या.''
             ... याचप्रमाणे मला प्रत्येक गोष्टीचीच भीती वाटते. मला माझ्या सामर्थ्याचीही भीती वाटते. 
             ... स्वामी म्हणतात, " तू चंदनाच्या खोडासारखी आहेस. " चंदनाचे खोड सहाणेवर उगाळल्यानंतरच त्याचा सुगंध दरवळतो. ही उगाळण्याची प्रक्रिया केल्यानंतरच काहीच शिल्लक राहात नाही. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम