ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी प्रेम हा मार्ग आहे."
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - १, श्लोक - २८-३०
कान्हा! प्रभू! या दुबळ्याचा बेडा पार कर. या अगतिकाची तूच गती. तुझ्या चरणी घेऊन तूच कल्याण कर. त्राता, धर्मस्वरूपा, अश्वत्थपत्रवासा, आदिअंतररहित ईसा! तूच माझा आधार.
कान्हा, भयातीता, यालाही तू भयातीत कर हातातून गांडीव निसटू देऊ नकोस. शारीरिक ताप निर्माण करू नकोस. स्थिरमती कर. मनास गोते खाऊ देऊ नकोस. मधाच्या धारेप्रमाणे संतत, अखंड, स्थिर, अविचल, अचंचल, फक्त तुझा विचार येईल असं कर. श्रीनिवासा! जगदिशा! ईसा परिपूर्णा, पुरुषोत्तमा ! तूच फक्त आधार.
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम