बुधवार, २३ ऑक्टोबर, २०२४

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः


श्री वसंतसाईंचा जन्मदिन संदेश

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️


शुद्धता शोधक म्हणजे काय?
संस्काराचा एक अर्थ आहे गाठ जी
प्रत्येक जन्माला जोडून साखळी तयार करते.  आपले चांगले-वाईट प्रत्येक कर्म आपल्याला त्या साखळीमध्ये बद्ध करतात. आपल्या सर्व विचारांची शृंखला बनते आणि फलस्वरूप संस्कार बनतात.
शुद्धता शोधक म्हणजे काय?
आपल्यामधे हे खोलवर रुजलेले किती संस्कार नष्ट केले त्याची ही मोजपट्टी आहे. आपण स्वतःला किती शुद्ध केले मी त्यातून दर्शवले जाते. जेव्हा शुद्धीकरण पूर्ण होते तेव्हा कोणतेही संस्कार राहत नाहीत आणि आपण रिक्त बनतो. जेव्हा आपण आपला 'अहम्' दूर करुन स्वतःला मुक्त करतो तेव्हा आपण रिक्त बनतो. रिक्त बनल्यावर, आपल्यामध्ये सत्य भरून राहते ही शुद्ध सत्व अवस्था आहे.
शुद्ध सत्व अवस्था थेट परमेश्वराशी जोडते. हा परमेश्वराशी जोडणारा दुवा आहे जेव्हा आपण परमेश्वराशी जोडले जातो तेव्हा सर्व संस्कारांची साखळी तुटते आणि सर्व संस्कार  नष्ट होतात.
ती गाठ म्हणजेच अहम्,अहंकार होय. जर आपण अहंकाराला शोधून बाहेर काढले तर काहीही उरत नाही. जेव्हा आपण परमेश्वराशी शुद्ध सत्व स्थितीमध्ये जोडले जातो तेव्हा नाम आणि रूप अग्नीतल्या निखाऱ्यासमान बनते, तेथे आकार(रूप) असतो. तथापि आपण त्याला स्पर्श करत आहात त्याचे रूप नाहीसे होते आणि उरते ती फक्त राख.
 माझे जीवनही त्याच्यासारखेच आहे मला अहंकार नाही.
 माझे नाव आणि रूप येथे आहे पण  अहंकाराविना.  'मी' विना 'मी'  म्हणजे जळणाऱ्या  लाकडाचा तुकडा. मला अहंकार नसल्यामुळे माझे विचार , उच्चार आणि आचार यांची साखळी थेट परमेश्वराशी जोडलेली आहे. संस्कार जन्मा मागून जन्मांशी जोडले जातात आणि माझ्या बाबतीत, मला परमेश्वराशी जोडतात. परमेश्वर  माझ्या साखळीला जोडलेला आहे तो पुढील अवतारात प्रेमसाई बनून पुन्हा येत आहे.


श्री वसंत साई अम्मा🌸🕉️🌸


जय साईराम

रविवार, २० ऑक्टोबर, २०२४

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

    " अळीपासून ब्रह्मपर्यंत सर्वांमध्ये परमेश्वराचे प्रतिबिंब पाहा. "

१३ 
नभ गुरु 
 

             एकीकडे स्वामी माझ्या लिखाणाद्वारे सत्य आणि ज्ञानाचा वर्षाव करत आहेत तर दुसरीकडे काही लोकांना माझं सत्य नाकारण्यास व माझं लिखाण खोटं आहे असा वाद घालण्यास प्रवृत्त करत आहेत. माझ्या साध्या सरळ स्वभावाला त्यांचं वागणं कळत नाही. मी एक खेडवळ स्त्री असल्यामुळे मला काय करावं कळत नाही, मी गोंधळून जाऊन भीतीने थरथरते. किती हे अडथळे, पाऊस, गडगडात, कडकडाट... तरीही माझं मन दूरवर काहीतरी शोधतोय. म्हणतंय, सत्यमेव जयते हे होणार! नक्कीच! हे वेदवाक्य आहे.

हे नभा!
तू आत्मसात केलेली कला
मज शिकवशील का?
काहीही घडू दे, तू न होशी विचलित
सदैव शांत निश्चल.
ही तर नव्हे साक्षी अवस्था?
हीच असते का परमेश्वरावस्था?
अशीच असते का?
मला वाटे, मज उमगत आहे थोडेथोडे,
असती का पुरावे पुराणांमधी ?
हे नभा..... सांग ना रे मजला
 तुझ्याविषयी लिहिताना
नाही अडवणार कोणी मला.


संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम