रविवार, २० ऑक्टोबर, २०२४

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

    " अळीपासून ब्रह्मपर्यंत सर्वांमध्ये परमेश्वराचे प्रतिबिंब पाहा. "

१३ 
नभ गुरु 
 

             एकीकडे स्वामी माझ्या लिखाणाद्वारे सत्य आणि ज्ञानाचा वर्षाव करत आहेत तर दुसरीकडे काही लोकांना माझं सत्य नाकारण्यास व माझं लिखाण खोटं आहे असा वाद घालण्यास प्रवृत्त करत आहेत. माझ्या साध्या सरळ स्वभावाला त्यांचं वागणं कळत नाही. मी एक खेडवळ स्त्री असल्यामुळे मला काय करावं कळत नाही, मी गोंधळून जाऊन भीतीने थरथरते. किती हे अडथळे, पाऊस, गडगडात, कडकडाट... तरीही माझं मन दूरवर काहीतरी शोधतोय. म्हणतंय, सत्यमेव जयते हे होणार! नक्कीच! हे वेदवाक्य आहे.

हे नभा!
तू आत्मसात केलेली कला
मज शिकवशील का?
काहीही घडू दे, तू न होशी विचलित
सदैव शांत निश्चल.
ही तर नव्हे साक्षी अवस्था?
हीच असते का परमेश्वरावस्था?
अशीच असते का?
मला वाटे, मज उमगत आहे थोडेथोडे,
असती का पुरावे पुराणांमधी ?
हे नभा..... सांग ना रे मजला
 तुझ्याविषयी लिहिताना
नाही अडवणार कोणी मला.


संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा