मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१३

      ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
             

 सुविचार 

       "प्रत्येक दिवस नूतन आहे , प्रत्येक तास , मिनिट , आणि  सेकंद  नूतन आहे . प्रत्येक क्षण आनंदात साजरा करा ".

 अमृत कण

     
 
   येणाऱ्या नवीन वर्षात आनंदाची प्राप्ती कशी करून घ्याल ?
      
         येणाऱ्या नवीन वर्षात काय घडेल हा विचार करण्यात तुम्ही वेळ वाया घालवू नका . जर तुमची कर्म चांगली असतील तर निश्चितच तुमचे भविष्य उज्वल असेल . राष्ट्राचे भवितव्य तुमच्या कृतींवर अवलंबून आहे . परमेश्वर सर्व साक्षी आहे . ना तो तुमचे रक्षण करतो ना  तो  तुम्हाला  शिक्षा करतो !प्रत्येक जण आपआपल्या सुख दुःखास जबाबदार असतो . या नवीन वर्षात मनामध्ये सदभाव  जागृत करून सर्वांना आनंद द्या . धनअर्जित करण्याच्या मागे न धावता तुमच्या प्रेमाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा . एकदा का तुमचे प्रेम विस्तार पावले की क्रोध , मत्सर या सारख्या दुर्गुणांना तेथे थारा मिळणार नाही . जर तुमचे विचार आणि कृती चांगल्या असतील तर तुमचे भविष्य उज्वल असेल . केवळ तुमचे नव्हे तर अखिल विश्व समृद्ध होईल . अखिल विश्वात शांती व समृद्धी नांदो . या साठी प्रार्थना करा . केवळ मानवी आचरणाद्वारे शांती प्राप्त होईल . 
५ एप्रिल २००८ च्या स्वामींच्या प्रवचनातून . 


       पुष्प नववे पुढे सुरु
 
            मी स्त्री आहे का ? नाही ! नाही ! मी स्त्री आहे या विचाराने त्यांनी मला दर्शनाची परवानगी नाकारली . मला आत येऊ दिले नाही . परमेश्वर पुरुष आहे आणि परमेश्वरावर प्रेमकरणारी स्त्री आहे . किती विचित्र जग आहे . हे जग स्त्री पुरुष संबंधाशिवाय दुसरे काहीही जाणत नाही . ते परमेश्वरालाही त्याच तराजूत तोलतात . हा त्यांचा दृष्टीकोन आहे . मी स्त्री असल्यामुळे त्यांनी मला एखादया स्वानासारखे हुसकावून लावले ! नाही , नाही ! अरेरे ! मी स्त्री नाही . कृपया मला एकटीला राहू दया .
           संत कॅथरीनसारखाच माझा छळ करण्यात
आला . स्त्रीचा जन्म घेतलेले संत होऊ शकत नाही का ? स्त्रीला संत पद प्राप्त करण्याचा अधिकार नाही का ? खरच तिला अधिकार नाही का ? स्त्री सर्वसंगपरित्याग करू शकत नाही का ? स्वामी येथे स्त्रीत्वाची महानता दर्शवण्यासाठी आले . म्हणून आम्ही जगात सत्य युग आणले . स्वामी ते वसंतमयम बनवणार आहेत . आता मला कोण हुसकावेल ? तुम्ही सत्य साई आहात . ज्या वसंतेला तुम्ही हुसकावून लावली ती तुमची आई , पत्नी आणि कन्या आहे ! म्हणून कोण तुम्हाला हुसकावेल ?
            मी कोण आहे ? माझ्या वर्णनासाठी केवळ एक शब्द पुरेसा आहे .मी स्वामींच्या चरणांखालची धूळ आहे .  स्वामी , हा मानवी जन्म पुरे ! हे जग आणि या जगातील सर्वजण माझ्यासाठी अपरिचित आहे , मी त्यांच्याशी आणि त्यांच्या गुणांशी परिचित नाही . मला दडण्यासाठी केवळ एक स्थान आहे आणि ते म्हणजे तुमच्या चरणांखाली  . तिथे मला कोणीही पाहू शकणार नाही . 
            स्वामींनी मला १०८ संस्कृत नामे , १०८ तमिळ नामे आणि ८९ देहाशी संबंधित नामे दिली . त्या सर्वांमधील एक नाव मला हवे आहे . ' साई पाद धुलिकायै ' स्वामींच्या चरणाखालची धूळ . मला या खेरीज दुसरे काही नको , इतर सर्व नामे मी त्यांची शक्ती असल्याचे दर्शवतात . नाही ! मी शक्ती नाही.  मला केवळ त्यांच्या चरणाखालची धूळ बनायचे आहे . केवळ हे एक स्थान असे आहे  जिथे जगाच्या नजरेपासून मी सुरक्षित असेन  आणि कोणीही मला पाहू शकणार नाही . 
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ….

टीप :-  श्री वसंता साई लिखित ' Miracle Maya ' हे इंग्रजी पुस्तक वाचकांसाठी मराठी भाषेतून ' चमत्कार माया ' या नावाने प्रकाशित झाले आहे . संपर्कासाठी भ्रमनध्वनी क्रमांक - ९८९०२९४५२९
     सर्व वाचकांना नवीन वर्ष सुखसामृधीचे , आनंदमय व आरोग्यदायी जावो  .
जय साई  राम
व्ही. एस.

रविवार, २९ डिसेंबर, २०१३

ओम श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

       
    " सर्वांवर प्रेम करा तथापि कोणाकडेही मोहित होऊ नका ".


पुष्प नववे पुढे सुरु 


माझ्या पापांकरीता स्वामींनी देह सोडला  भाग २ 



         स्वामींनी एक प्रश्नावली दिली . त्यामधील २८वा प्रश्न होता ,
    ' कोणता शब्द तुझे यथोचित वर्णन करतो ?' 
          या प्रश्नाला मी कसे काय उत्तर देणार ? आपण याचे विश्लेषण करू . 
         मी आत्मा आहे. जर मी आत्मा असेन तर मी देहाला एवढे महत्व का देते ? कारण हा देह स्वामींच्या देहामध्ये विलीन झाला पाहिजे , स्वामींच्या देहाशी त्याचा योग झालाच पाहिजे . मला असे का वाटते ? आज पर्यंत होऊन गेलेल्या कोणत्याही ऋषीमुनींनी अशा तऱ्हेने विचार केला नाही . मी एकटीच असा विचार का करते ? अगदी बालवयातच परमेश्वराशी विवाह करायचा होता . विवाह म्हटला की देह समर्पण क्रमप्राप्त आहे . हा देह जमिनीवर न पडता त्यांना समर्पित व्हायला हवा असा माझा निर्धार आहे . म्हणून मी आत्मा नव्हे . 
           मी शक्ती आहे का ? नाही , मी शक्ती नाही . स्वामी म्हणाले की , त्यांची शक्ती आहे.  स्वामींनी स्वाक्षरी केलेल्या माझ्या पहिल्या पुस्तकात मी हे लिहिले आहे . हे लिहिल्या नंतर मला स्वामींच्या दर्शनाची परवानगी नाकारण्यात आली . त्यानंतर मी पुट्टपर्तिला  गेले नाही . 
          २००१ मध्ये स्वामींनी मंगळसुत्र देऊन मी त्यांची शक्ती असल्याचे सिद्ध केले . २००३ मध्ये शिवरात्रीच्या वेळी स्वामींनी मला पुट्टपर्तिला बोलावले.  तेथे त्यांनी आम्ही शिवशक्ती असल्याचे दर्शवले . १९६३ मध्ये ८ दिवस स्वामींना अर्धांगवायू झाला होता . त्यातून स्वतःला बरे केल्यानंतर त्यांच्या शरीराची डावी बाजू शक्तीचे प्रतिनिधित्व करते . त्यामुळे त्या बाजूला अर्धांग वायू झाल्याचे त्यांनी उघड करून भारद्वाज ऋषींची गोष्ट सांगितली . 
            त्याच प्रमाणे गर्भ कोटमच्या उद्घाटन समारंभापुर्वी आम्ही अनेक यज्ञ केले . तेव्हा माझ्या डाव्या भागाला आठ दिवस अत्यंत वेदना होत होत्या . भारद्वाज ऋषींचा अंश असलेले नानजुन्दाय दिक्षित यांनी इथे येऊन यज्ञ केले . मी त्यांची शक्ती आहे हे यातून दर्शवले जाते असे स्वामींनी सांगितले . २००७ मध्ये मी भगवंताचे अखेरचे सात  दिवस हे पुस्तक लिहिले आणि मला पुन्हा प्रशांती निलयम मध्ये येण्यास मनाई करण्यात आली . स्वामींच्या शक्तीला स्वामींचे दर्शन घेण्यात किती ते अडथळे ! जिथे जिथे मी गेले प्रत्येक ठिकाणाहून मला हुसकावून लावण्यात आले . पाप ! पुरे ! मी शक्ती नाही ! मला एकटीला राहू द्या . पुरे आता ! पुरे ! मी शक्ती नाही . परमेश्वराने कदाचित त्याच्या शक्तीविषयी सांगितले तरी मनुष्य त्याचा कदापि स्वीकार  करणार नाही . मी शक्ती नाही , नाही नाही त्रिवार नाही ! 
          मी कोण आहे ? मी मन आहे का ? मी जर मन असेन तर माझ्या मध्ये हजारो इच्छा उद्भवतील परंतु मला कोणत्याही भौतिक इच्छा नाहीत . स्वामींच्या स्थूलरुपाचे दर्शन आणि संभाषण ही माझी एकमेव अव्दितिय  इच्छा आहे . इच्छांमुळे  मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि मृत्यू पावतो. मला मन नाही.  माझे मन केवळ स्वामींबरोबर  असते. म्हणून मी मन नाही.  मग मी कोण आहे ? मी स्वतःला हाच प्रश्न विचारते .        
 उर्वरित वसंतामृत पुढील भागात  .....

जय साईराम
  

गुरुवार, २६ डिसेंबर, २०१३

ओम श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " स्वार्थ परता आणि अपेक्षा ह्या दोन भावांचा ज्यांनी त्याग केला त्याला कर्म कधीच बाधणार नाहीत  ".

पुष्प नववे पुढे सुरु 
             
         सकाळी स्वामींनी फुलांची दोन चित्रे दिली . त्यापैकी एकामध्ये १०८ ट्युलीपची फुले होती . त्यातील २ पिवळी , २ गुलाबी , २ जांभळी , २ गुलबाक्षी ( विलयन रंग गुलाबी + निळा ) , २ भगवी आणि २ पिवळा , भगवा आणि गुलाबी अशा मिश्र रंगातील . ही सर्व फुले म्हणजे स्वामी आणि मी १० संख्या सर्व पूर्णम ० असल्याचे आणि सर्व १-एक असल्याचे दर्शवते . तो कागद L आकारामध्ये कापलेला होता म्हणजेच सर्व प्रेमस्वरूप आहे . प्रेम हे या जगातील सर्वांच्या संयोगाचे कारण आहे . दुसऱ्या चित्रामध्ये बागेतील फुलझाडांच्या ताटव्यांसारखे चित्र होते . हे चित्र ज्या बागेत राजपुत्र आणि राजकन्या भेटले त्या फुलांच्या बगीच्याचे प्रतिनिधित्व करते . स्वामी आणि मी वृंदावन मध्ये भेटलो . 
            अंगठीवरील कोरलेले शब्द इंग्रजी भाषेतील नसून दुसऱ्याच भाषेतील होते . त्यावर संत कॅथरीन असे लिहिले होते . आम्ही तिच्या जीवनाविषयी माहिती  घेण्यासाठी इंटरनेटवर पाहिले . तेथे असे म्हटले होते . कॅथरीन अलेक्झांड्रीयावर राज्य करणाऱ्या पॅगन राजाची सुंदर कन्या होती . ती अत्यंत बुद्धिमान आणि परिपूर्ण होती . तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता . बाल वयातच तिने जीझसशी लग्न करण्याची तसेच आजीवन कौमार्य जपण्याची इच्छा बाळगली होती . एक दिवस , एका गूढ विवाहामध्ये व्हर्जिन मेरीने तिला जिझसला दिल्याचे दृश्य कॅथरीनने पाहिले . कॅथरीन नेहमी तिच्या श्रद्धास्थानाविषयी बोलून अनेकांना तिने स्वीकारलेल्या मार्गाचे अनुसरण करण्यास प्रेरित करत असे . परंतु रोमन सम्राट पॅगनला ती ख्रिश्चन धर्माची शिकवण देते हे मान्य नव्हते . त्यांनी एक सभा आयोजित करून तिच्या बरोबर विवाद करण्यास अनेक उत्तम पॅगन तत्वक्ते आणि वक्ते यांना आमंत्रित केले . त्याला अशी आशा होती की ते तिच्या ख्रिश्चन धार्जिण्या मतांचे खंडन करतील . परंतु विवादामध्ये कॅथरीन जिंकली . त्या रोमन सम्राटाची तिच्याशी विवाह करण्याची इच्छा होती परंतु तिला केवळ जीझसशी विवाह करायचा असल्याचे सांगून तिने तो प्रस्ताव नाकारला . त्यानंतर सम्राटाने तिला अणुकुचीदार चक्रावर खिळे ठोकून ठार मारण्याची शिक्षा फर्मावली परंतु तिच्या स्पर्शाने चमत्कार होऊन ते चक्र नष्ट झाले . अखेरीस त्या सम्राटाने तिचा शिरच्छेद केला . कॅथरीनला किती छळ आणि यातना सोसाव्या लागल्या परंतु ती तिच्या श्रद्धास्थानापासून ढळली नाही . अखेरीस तिला हौतात्म्य प्राप्त झाले .
             लहानपणापासून माझीही परमेश्वराशी विवाह करण्याची इच्छा होती . स्वामी आले आणि त्यांनी माझ्याशी विवाह केला परंतु दुसऱ्या रुपात . नंतर त्यांनी स्वतः हा माझ्याशी  गांधर्व विवाह केला . विवाह जगासमोर झाला नाही म्हणून त्यांना परत आणण्यासाठी मी अश्रू ढाळते आहे . स्वामी न आल्यामुळे  माझ्या देहाला अत्यंत क्लेश सोसावे लागत आहेत . स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय मी त्यांना सोडणार नाही वा हा देहही सोडणार नाही . मला वैश्विक मुक्ती हवी आहे . स्वामी जगासमोर माझे पावित्र्य सिद्ध करे पर्यंत माझा लढा चालूच राहील . 
           आता आपण अंगठीवरील चिन्हे पाहू या . हृदयाच्या मध्यभागी क्रॉस आहे आणि C आणि K ही अक्षरे आहेत . ते हृदय विश्व गर्भ कोटमचे निदर्शक आहे . क्रॉस हे स्तूपाचे प्रतिक आहे . C हा ( creation ) निर्मितीसाठी आणि K कुंडलिनीसाठी आहे . क्रॉस स्वामींनी आणि मी आमच्या देहावर घेतलेली जागतिक कर्मे दर्शवतो . याद्वारे स्वामी आमची अवस्था स्पष्ट करतात . १० फुलांच्या चित्राच्या मागील बाजूस तमिळमध्ये काहीतरी लिहिले होते . ते असे , 
' लवकरच विवाह संपन्न होवो ' 
स्वामी लवकरच येतील आणि माझ्याशी जगासमोर गांधर्व विवाह करतील . 
... 
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......