गुरुवार, ५ डिसेंबर, २०१३

ओम श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

     " अमरत्व हे केवळ त्यागाद्वारे प्राप्त होते. जेव्हा आपण आपल्या भौतिक जीवनाचा परमेश्वरासाठी त्याग करतो तेव्हा कर्मांच्या परिणामांचा नाश होतो ". 

पुष्प सातवे पुढे सुरु 

नारदमुनींनी  अनुभवली माया 
           तमिळ भाषेत एक म्हण आहे ' डुकरे अनेक पिल्लांना जन्म देतात परंतु सिंह मात्र एकाच छव्याला जन्म देतो '. डुकरे घाणीत आनंदाने जीवन जगतात . एक उदाहरण  देते.  एकदा नारदांनी डुकराचा जन्म घेतला व ते आपल्या पत्नी आणि पिलावळीसह घाणीमध्ये अत्यंत आनंदात जीवन जगत होते . परमेश्वर तेथे येऊन त्यांना म्हणाले , " तू नारद आहेस , तू या घाणीत का राहतोस. तुझे सत्य स्वरूप जाण !" नारद उत्तरले , नाही नाही ! मी इथे माझ्या बायको मुलांसह सुखात आहे ". नारद सदैव परमेश्वराच्या सानिध्यात असतात . सदैव त्यांचे गुणगान करतात . आनंदाने त्रिभुवनात संचार करतात . परमेश्वराची प्रत्यक्ष भेट केव्हाही घेण्याचे परम भाग्य केवळ नारदांना लाभले होते . असे हे महान नारद मायेमुळे डुकराचा जन्म घेतात आणि त्यालाच सत्य मानू लागतात . ते म्हणतात मी या घाणीमध्ये आनंदाने राहतो आहे ! जर नारद असे म्हणाले तर मनुष्याचे काय ? म्हणून सर्वांनी मायेपासून सावधान राहायला हवे ! 
          एकदा नारद मुनींनी परमेश्वराला विचारले , " माया म्हणजे काय " ? भगवान म्हणाले , " नारदा , मला खूप तहान लागली आहे . थोडसं पाणी घेऊन ये , मग मी तुला सांगतो " नारद जवळपासच्या गावातील एका घरापाशी गेले . त्यांनी घराचे दार वाजवले . दरवाज्यातून एक सुंदर तरुणी बाहेर आली . तिला पाहून नारद पाणी मागण्याचे विसरून गेले. एवढेच नाही तर ते तिच्या वडिलांना भेटले व तिच्या विषयी चौकशी केली . आणि तिच्या वडिलांच्या संम्मतीने त्यांनी तिच्याशी विवाहही करून ते त्या गावात राहू लागले. यथाकाल त्यांना मुले झाली आणि ते गृहस्थाश्रमी जीवन जगू लागले. एक दिवस त्या गावात महापूर आला. सर्वजण त्या ओढवलेल्या संकटापासून बचावाचा प्रयत्न करू लागले.  नारदांनीही आपली संपत्ती एका कपडयात गोळा केली . ते गाठोडे डोक्यावर ठेऊन बायको , मुलांचे हात धरून पुराच्या पाण्यातून चालू लागले . तथापि पुराच्या लोंढयात त्यांचे कुटुंब वाहून गेले . नारद दुःखाने विलाप करू लागले. त्यांनी त्यांची बायको , मुल आणि संपत्ती सर्वकाही गमावले . त्यानंतर त्यांना जाणीव होते , " अरे मी पाणी  आणण्यासाठी आलो होतो". प्रभू त्यांना म्हणतात दहा मिनीटात दहावर्षांचे जीवन जगलास . पती , पत्नी आणि संपत्ती हे सर्व भ्रम , माया आणि असत्य आहे याची त्यांना जाणीव होते . या मायेचाच त्यांच्यावर पगडा बसलेला असतो . 
            यातून जागे व्हा ! स्वामी केवळ यासाठीच , सत्य दर्शवण्यासाठीच आले . केवळ स्वामींच्या कालखंडातच सर्वजण मायेतून जागे होऊ शकतात . या मायेतून सुटका कशी करून घ्यायची हे दाखवण्यासाठी स्वामी आणि मी येथे आलो . आमच्या दिव्य भावांमधून सत्ययुग आणि नवनिर्मिती येत आहे . तथापि , तुम्ही तुमच्या भौतिक भावांमधून नारदाप्रमाणे मुले आणि कुटुंब निर्माण करता . कलियुगाचे दुसरे सत्र पुन्हा येणार आहे . ते अत्यंत वाईट असेल म्हणून ते सत्र सुरु होण्या अगोदर तुम्ही जागे झालेच पाहिजे आणि त्यानुसारच आचरण केले पाहिजे . स्वामींचे आणि माझे विशुद्ध प्रेम देहाच्या पलीकडचे आहे . ते प्रेम देहाच्या संयोगातून नव्हे तर हृदयाच्या  संयोगातून जन्मले आहे . 

जय साई राम 
व्ही. एस.  
       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा