रविवार, ८ डिसेंबर, २०१३

ओम श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 
     " जीवनात प्राप्त झालेला प्रत्येकक्षण ईश्वराच्या  सान्निध्यात राहण्याची सुवर्ण संधीच मानावी " .


वसंतामृतमाला 
पुष्प आठवे 
चिन्मय रस 

( भगवद् भावाचा आस्वाद ) 


       स्वामींनी एक बुकमार्क दिला त्यावर खालील मजकूर लिहिला होता .
       सत्य हे बीज आहे , सदाचरण मूळ तर प्रेम जल , शांती पुष्प आणि आनंद फल आहे . 
- बाबा 
मी स्वामींना याविषयी विचारले. 
२७ एप्रिल २०१३ ध्यान 
वसंता - स्वामी हा बुकमार्क काय आहे ?
स्वामी - तू लिही . तुझे जीवन सत्य युगाचे बीज आहे . तुझा जन्म सत्यामधून झाला आहे . 
ध्यान समाप्ती 
           आता आपण या विषयी पाहू . माझा जन्म  सत्यामधून , स्वामींनमधून झाला आहे . माझे जीवन म्हणजे केवळ सदाचरण . अगोदर मी जगाविषयी अनभिज्ञ होते. मला मानवी स्वभाव समजत नव्हता . माझा जन्म थेट परमेश्वरापासून झाल्यामुळे . मला या जगाविषयी काहीही माहिती नव्हती . मला फक्त एकच मार्ग माहिती होता , सदचरणाचा मार्ग . ज्यावरून मी वाटचाल करते . याहून दुसरे मला काही माहित नव्हते
. मला या जगातील वर्तणूक माहित नव्हती .प्रेम हे जल आहे. यासाठी प्रेमजल अत्यंत आवश्यक आहे . प्रेमाद्वारे या जगामध्ये मी कसा बर बदल घडून आणिन.
       एक उदाहरण देते . एका कुटुंबाने मला तीन साडया दिल्या तथापि त्या सर्व साडया वेगळ्या रंगाच्या असल्यामुळे मी त्या नेसू शकले नाही . त्यावरील किमतीचे लेबलही काढलेले होते . त्या साडयांच्या पिशवीवर ' पोथीज ' असे नाव असल्यामुळे आम्हाला त्या साडीच्या दुकानाचे नाव कळले पण त्या साडया त्यांनी केरळच्या शाखेमधून विकत घेतल्या होत्या. दुसऱ्या दिवशी एडी आणि निकोला मदुराईला जाणार होते . मी त्यांना म्हणाले , " जर शक्य असेल तर या साडया बदलून आणण्याचा प्रयत्न करा ".  त्यांनी मला दुकानातून फोन करून सांगितले की दुकानदाराने साडया परत घेऊन क्रेडीट नोट दिली . जी आपल्याला केव्हाही वापरता येईल . मला आश्चर्य वाटले !
           संध्याकाळी परत आल्यावर एडी म्हणाले त्यांनी पैसे परत दिले . त्या रात्री मी त्यावर चिंतन केले .  त्यांनी पैसे कसे परत दिले ? साडीचे बिलही नव्हते . तरी कसे पैसे दिले ?  यांनी त्यांना पैसे देण्यास भाग पाडले का ? अशा त-हेने मी कोणाला दुखावू  इच्छित नाही. मी विचार केला की मी सकाळी अमरला पाठवून साडया विकत घेऊन येण्यास सांगेल . सकाळी गर्भ कोटममध्ये जातांना मी एडींना विचारले , " त्यांनी एवढया सहजपणे क्रेडीट नोट कशी दिली , तुम्ही त्यांना जबरदस्तीने दयायला लावली का ?" माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले . एडी म्हणाले , " अम्मा , इतरांना न दुखावण्याचा धडा आम्ही तुमच्या कडून शिकलोय . आम्ही कधीही अशा त-हेने इतरांवर सक्ती करणार नाही ". निकोला म्हणाली , " मी त्या दुकानात ब्लाउज पीस विकत घेतले आणि क्रेडीट नोटचे पैसे एडींना दिले ". 
           इतक्या प्रमाणात मी प्रेम आणि सत्याचे अनुसरण करते . माझ्याकडून कोणीही दुखावले जाऊ नये यासाठी मी नेहमी अत्यंत दक्ष असते . अशा त-हेने माझ्या सत्य आणि प्रेमाने सामान्य दुकानदारात  परिवर्तन घडले . कोणत्याही दुकानदाराने अशा तऱ्हेने पैसे परत दिले नसते . केरळच्या दुकानातून एका व्यक्तीने विकत घेतलेल्या साडया मदुराईच्या शाखेत परत केल्या ! बिल नसूनही क्रेडीट नोट द्वारे सर्व रक्कम परत केली. अशा रीतीने हे प्रेम अखिल जगतामध्ये परिवर्तन घडवेल . जगामध्ये परिवर्तन कसे घडेल याचे हे एक उदाहरण आहे . यातून जगामध्ये सुख , शांती नांदेल . हे स्वामींचे अवतार कार्य आहे . 
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा