गुरुवार, २६ डिसेंबर, २०१३

ओम श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " स्वार्थ परता आणि अपेक्षा ह्या दोन भावांचा ज्यांनी त्याग केला त्याला कर्म कधीच बाधणार नाहीत  ".

पुष्प नववे पुढे सुरु 
             
         सकाळी स्वामींनी फुलांची दोन चित्रे दिली . त्यापैकी एकामध्ये १०८ ट्युलीपची फुले होती . त्यातील २ पिवळी , २ गुलाबी , २ जांभळी , २ गुलबाक्षी ( विलयन रंग गुलाबी + निळा ) , २ भगवी आणि २ पिवळा , भगवा आणि गुलाबी अशा मिश्र रंगातील . ही सर्व फुले म्हणजे स्वामी आणि मी १० संख्या सर्व पूर्णम ० असल्याचे आणि सर्व १-एक असल्याचे दर्शवते . तो कागद L आकारामध्ये कापलेला होता म्हणजेच सर्व प्रेमस्वरूप आहे . प्रेम हे या जगातील सर्वांच्या संयोगाचे कारण आहे . दुसऱ्या चित्रामध्ये बागेतील फुलझाडांच्या ताटव्यांसारखे चित्र होते . हे चित्र ज्या बागेत राजपुत्र आणि राजकन्या भेटले त्या फुलांच्या बगीच्याचे प्रतिनिधित्व करते . स्वामी आणि मी वृंदावन मध्ये भेटलो . 
            अंगठीवरील कोरलेले शब्द इंग्रजी भाषेतील नसून दुसऱ्याच भाषेतील होते . त्यावर संत कॅथरीन असे लिहिले होते . आम्ही तिच्या जीवनाविषयी माहिती  घेण्यासाठी इंटरनेटवर पाहिले . तेथे असे म्हटले होते . कॅथरीन अलेक्झांड्रीयावर राज्य करणाऱ्या पॅगन राजाची सुंदर कन्या होती . ती अत्यंत बुद्धिमान आणि परिपूर्ण होती . तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता . बाल वयातच तिने जीझसशी लग्न करण्याची तसेच आजीवन कौमार्य जपण्याची इच्छा बाळगली होती . एक दिवस , एका गूढ विवाहामध्ये व्हर्जिन मेरीने तिला जिझसला दिल्याचे दृश्य कॅथरीनने पाहिले . कॅथरीन नेहमी तिच्या श्रद्धास्थानाविषयी बोलून अनेकांना तिने स्वीकारलेल्या मार्गाचे अनुसरण करण्यास प्रेरित करत असे . परंतु रोमन सम्राट पॅगनला ती ख्रिश्चन धर्माची शिकवण देते हे मान्य नव्हते . त्यांनी एक सभा आयोजित करून तिच्या बरोबर विवाद करण्यास अनेक उत्तम पॅगन तत्वक्ते आणि वक्ते यांना आमंत्रित केले . त्याला अशी आशा होती की ते तिच्या ख्रिश्चन धार्जिण्या मतांचे खंडन करतील . परंतु विवादामध्ये कॅथरीन जिंकली . त्या रोमन सम्राटाची तिच्याशी विवाह करण्याची इच्छा होती परंतु तिला केवळ जीझसशी विवाह करायचा असल्याचे सांगून तिने तो प्रस्ताव नाकारला . त्यानंतर सम्राटाने तिला अणुकुचीदार चक्रावर खिळे ठोकून ठार मारण्याची शिक्षा फर्मावली परंतु तिच्या स्पर्शाने चमत्कार होऊन ते चक्र नष्ट झाले . अखेरीस त्या सम्राटाने तिचा शिरच्छेद केला . कॅथरीनला किती छळ आणि यातना सोसाव्या लागल्या परंतु ती तिच्या श्रद्धास्थानापासून ढळली नाही . अखेरीस तिला हौतात्म्य प्राप्त झाले .
             लहानपणापासून माझीही परमेश्वराशी विवाह करण्याची इच्छा होती . स्वामी आले आणि त्यांनी माझ्याशी विवाह केला परंतु दुसऱ्या रुपात . नंतर त्यांनी स्वतः हा माझ्याशी  गांधर्व विवाह केला . विवाह जगासमोर झाला नाही म्हणून त्यांना परत आणण्यासाठी मी अश्रू ढाळते आहे . स्वामी न आल्यामुळे  माझ्या देहाला अत्यंत क्लेश सोसावे लागत आहेत . स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय मी त्यांना सोडणार नाही वा हा देहही सोडणार नाही . मला वैश्विक मुक्ती हवी आहे . स्वामी जगासमोर माझे पावित्र्य सिद्ध करे पर्यंत माझा लढा चालूच राहील . 
           आता आपण अंगठीवरील चिन्हे पाहू या . हृदयाच्या मध्यभागी क्रॉस आहे आणि C आणि K ही अक्षरे आहेत . ते हृदय विश्व गर्भ कोटमचे निदर्शक आहे . क्रॉस हे स्तूपाचे प्रतिक आहे . C हा ( creation ) निर्मितीसाठी आणि K कुंडलिनीसाठी आहे . क्रॉस स्वामींनी आणि मी आमच्या देहावर घेतलेली जागतिक कर्मे दर्शवतो . याद्वारे स्वामी आमची अवस्था स्पष्ट करतात . १० फुलांच्या चित्राच्या मागील बाजूस तमिळमध्ये काहीतरी लिहिले होते . ते असे , 
' लवकरच विवाह संपन्न होवो ' 
स्वामी लवकरच येतील आणि माझ्याशी जगासमोर गांधर्व विवाह करतील . 
... 
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......  
           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा