ओम श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" केवळ ईश्वर प्राप्ती हे आपले कर्तव्य माना. ह्या व्यतिरिक्त सर्व विचारांचा त्याग करा " .
पुष्प आठवे पुढे सुरु
स्वामींनी नंतर एक पांढरे कार्ड दिले. त्यावर लिहिले होते.
सिल्क १६
२६ एप्रिल २०१३ ध्यानवसंता - स्वामी सिल्क १६ म्हणजे काय ?
स्वामी - या निर्मितीमध्ये परमेश्वराच्या १६ कलांनी युक्त असे सत्य आणि प्रेम मात्र भरून राहिले आहे , हे साई वसंता यांच्या तारका स्पंदनांद्वारे सर्वत्र पसरते .
ध्यान समाप्ती
आता आपण या विषयी पाहू या. स्वामींनी SILK हा शब्द लिहिला K अक्षराखाली १६ आकडयाच्या पुढे V S आणि C लिहिले होते . इथे S आणि V सत्य आणि प्रेम यांचे निदर्शन करतात . आम्हा दोघांचे भाव स्तुपामध्ये जातात व तारका स्पंदनांद्वारे बाहेर पडून जगात सर्वत्र पसरतात . हे दर्शवण्यासाठी स्वामींनी स्तूपाच्या उद्घाटन समारंभाचे दोन फोटो दिले .
२८ एप्रिल २०१३ सकाळचे ध्यान
वसंता - स्वामी , मी प्रेमाविषयी ( Romance ) लिहित आहे . कृपया त्याविषयी काही सांगा .
स्वामी - मी जे काही तुला सांगतो . तेव्हा तू म्हणतेस , " मी नाही , मी नाही ! " मी स्वतः तुला नामे दिली . आरती , झुला गीत आणि नामे याद्वारे मी तुला आपल्यामधले नाते दर्शवले . अशा रितीने यापूर्वी परमेश्वराने असे केलेले नाही . हे सर्व अवतार कार्यासाठी आहे .
वसंता - स्वामी , मला तुमच्या शिवाय दुसरे काही नको .
स्वामी - जर एखादयाला परमेश्वराने स्वतः नामे दिली तर त्याला केवढा अभिमान वाटेल . तथापि तुझ्यामध्ये जराही गर्वाची भावना नाही . यामुळेच तू ही महान कार्ये करू शकतेस .
वसंता - स्वामी , तुम्ही गीत गोविंदम मध्ये काय सांगितले ?
स्वामी - हा शृंगार रस नव्हे , भौतिक इच्छांचा आस्वाद ही इथे नाही तर चिन्मय रस आहे , भगवद् भावाचा आस्वाद . हे मी यामध्ये दर्शवले आहे .
ध्यान समाप्ती
आता आपण या विषयी पाहू स्वामींनी प्रथम मला १०८ नामे दिली. त्यानंतर त्यांनी त्यातील प्रत्येकी ६ नामे भगवद् गीतेतील १८ अध्यायांशी जोडण्यास सांगितले. मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे केले परंतु मी असे लिहिले की जो कोणी या विशिष्ट अध्यायाचे अनुसरण आणि आचरण करेल त्याला ही नामे अनुरूप होतील .
स्वामींनी दिलेल्या कोणत्यही शक्तीचा ( सिद्धीचा ) मी स्वीकार करत नाही . मला त्या नको आहेत . मला ' मी ' नाही . म्हणून स्वामी स्वतःच मी कोण आहे , तसेच आणि त्यांच्या माझ्यातील नाते काय आहे हे प्रकट करत आहेत . ते परमेश्वर असल्याचे त्यांनी दर्शवले आहे . जर मी त्यांची शक्ती असेन तर मी त्यांच्यासारखीच असायला हवी . तथापि मला भीती वाटते आणि मी स्वतःला धुळीसमान मानून त्यांच्या चरणांखाली लपते .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……
जय साईराम
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा