रविवार, १५ डिसेंबर, २०१३

ओम श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 
     
     " सुरुवातीस यांत्रिकता जरी वाटली तरीही ईश्वराचे नामस्मरण सुरूच ठेवा . ह्या सातत्यामुळे आपोआपच  भक्तीभाव जागृत होईल " .
पुष्प आठवे पुढे सुरु
            
         काही वर्षांपूर्वी स्वामींनी मला स्तुपाचे चित्र काढून दिले आणि त्यानुसार मला स्तुप बांधण्यास सांगितले . मला काही कळेना , म्हणून स्वामींनी मला नाडी ग्रंथ पाहण्यास सांगितले . नाडीमध्ये दिलेल्या आदेशानुसार  आम्ही मुक्ती स्तूप बांधला . त्या नंतर स्वामींनी माझी कुंडलिनी कशी कार्य करते ते दर्शवले . नंतर गणपती स्थपतीनी घोषित केले की आगम शास्त्रानुसार हा स्तूप निर्मितीच्या आगोदर पासून अस्तित्वात असणारा मूलस्तंभ आहे . त्यानंतर स्वामी म्हणाले की आम्ही आदि मूलम आणि आदिशक्ती , आदिपुरुष आणि त्याची शक्ती आहोत . स्वामींनी स्तूप अर्चनेसाठी २७ नामे दिली . ती २७ नामे २७ /५ / २००१ मध्ये झालेल्या आमच्या विवाहाचे प्रतिनिधित्व करतात . ५ पंचतत्वांसाठी आणि २७ नक्षत्रांसाठी नवनिर्मितीचा जन्म आमच्या पासून झाला आहे . स्वामींनी प्रथम आम्हाला आरती दिली आणि नंतर झुला गीत दिले अशा तऱ्हेने मी कोण आहे हे स्वामींनी प्रकट केले .
                 परंतु मला हे काही नकोय.  मला फक्त स्वामी हवेत . मी स्वामींसाठी करूण विलाप करते आणि तेच सर्वकाही लिहितात . हा प्रणय नव्हे , शृंगार रस नव्हे वा ऐहिक कामभाव नव्हे . हा चिन्मय रस आहे . परमेश्वराचा  अमृत रस  आहे , भगवद्  भावाचा आस्वाद . यादवारे नवनिर्मिती होणार आहे . माझ्या भावांना स्वामी देत असलेल्या प्रतिसादामुळे कलियुग सत्ययुगात परिवर्तित  होत आहे . आज पर्यंत परमेश्वराने त्याच्या नामाशी जोडून कधीही कोणाला नामे , आरती वा झुला गीत दिले नाही . स्वामींनी तमिळ नामे आणि माझ्या देहाशी संबंधित नामे ही दिली आहेत . हे सर्व परमेश्वर व त्याच्या शक्तीचे निदर्शन करतात . स्वामी मला हे देतात आणि मी स्वामींसाठी अश्रू ढाळते. हे ऐहिक प्रेम नाही . हा चिन्मय रस आहे आणि विश्वामध्ये परिवर्तन घडवण्याचे प्रयोजन आहे . 
            हे सर्व  अवतार कार्यासाठी आहे . जर परमेश्वराने या सर्व गोष्टी दुसऱ्या एखादयाला सांगितल्या असत्या तर त्याला तो अत्यंत अभिमानाने म्हणाला असता " स्वामी लिहित आहेत ! स्वामी बोलत आहेत ! " जर स्वामींनी त्याला नामे दिली असती तर त्याला अधिक गर्व झाला असता . त्याच्या घरी येणाऱ्या लोकांनी मंदिर बांधून त्यांची भक्ती करायला सुरुवात केली असती . मी स्वतःला संपूर्ण रिक्त केले , मला ' मी ' नाही.  माझ्या सर्व शक्ती बाहेर जाऊन जगामध्ये परिवर्तन घडवतात.  जर एखादयास ' मी ' नसेल तर तो त्याच्या मध्ये असणाऱ्या शक्तीद्वारे काहीही साध्य करू शकतो . यासाठी " मी "चा नाश करणे अत्यंत आवश्यक आहे . त्याचे निदर्शन हेच स्वामींचे अवतार कार्य आहे . जर ' मी ' दूर केला नाही तर तो ' मी ' बॉम्ब बनून तुमचा सर्वनाश करेल.  म्हणून मायेतून जागे व्हा ! ' मी ' मधून स्वतःला मुक्त करा .

जय  साई राम
व्ही. एस.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा