रविवार, २९ डिसेंबर, २०१३

ओम श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

       
    " सर्वांवर प्रेम करा तथापि कोणाकडेही मोहित होऊ नका ".


पुष्प नववे पुढे सुरु 


माझ्या पापांकरीता स्वामींनी देह सोडला  भाग २ 



         स्वामींनी एक प्रश्नावली दिली . त्यामधील २८वा प्रश्न होता ,
    ' कोणता शब्द तुझे यथोचित वर्णन करतो ?' 
          या प्रश्नाला मी कसे काय उत्तर देणार ? आपण याचे विश्लेषण करू . 
         मी आत्मा आहे. जर मी आत्मा असेन तर मी देहाला एवढे महत्व का देते ? कारण हा देह स्वामींच्या देहामध्ये विलीन झाला पाहिजे , स्वामींच्या देहाशी त्याचा योग झालाच पाहिजे . मला असे का वाटते ? आज पर्यंत होऊन गेलेल्या कोणत्याही ऋषीमुनींनी अशा तऱ्हेने विचार केला नाही . मी एकटीच असा विचार का करते ? अगदी बालवयातच परमेश्वराशी विवाह करायचा होता . विवाह म्हटला की देह समर्पण क्रमप्राप्त आहे . हा देह जमिनीवर न पडता त्यांना समर्पित व्हायला हवा असा माझा निर्धार आहे . म्हणून मी आत्मा नव्हे . 
           मी शक्ती आहे का ? नाही , मी शक्ती नाही . स्वामी म्हणाले की , त्यांची शक्ती आहे.  स्वामींनी स्वाक्षरी केलेल्या माझ्या पहिल्या पुस्तकात मी हे लिहिले आहे . हे लिहिल्या नंतर मला स्वामींच्या दर्शनाची परवानगी नाकारण्यात आली . त्यानंतर मी पुट्टपर्तिला  गेले नाही . 
          २००१ मध्ये स्वामींनी मंगळसुत्र देऊन मी त्यांची शक्ती असल्याचे सिद्ध केले . २००३ मध्ये शिवरात्रीच्या वेळी स्वामींनी मला पुट्टपर्तिला बोलावले.  तेथे त्यांनी आम्ही शिवशक्ती असल्याचे दर्शवले . १९६३ मध्ये ८ दिवस स्वामींना अर्धांगवायू झाला होता . त्यातून स्वतःला बरे केल्यानंतर त्यांच्या शरीराची डावी बाजू शक्तीचे प्रतिनिधित्व करते . त्यामुळे त्या बाजूला अर्धांग वायू झाल्याचे त्यांनी उघड करून भारद्वाज ऋषींची गोष्ट सांगितली . 
            त्याच प्रमाणे गर्भ कोटमच्या उद्घाटन समारंभापुर्वी आम्ही अनेक यज्ञ केले . तेव्हा माझ्या डाव्या भागाला आठ दिवस अत्यंत वेदना होत होत्या . भारद्वाज ऋषींचा अंश असलेले नानजुन्दाय दिक्षित यांनी इथे येऊन यज्ञ केले . मी त्यांची शक्ती आहे हे यातून दर्शवले जाते असे स्वामींनी सांगितले . २००७ मध्ये मी भगवंताचे अखेरचे सात  दिवस हे पुस्तक लिहिले आणि मला पुन्हा प्रशांती निलयम मध्ये येण्यास मनाई करण्यात आली . स्वामींच्या शक्तीला स्वामींचे दर्शन घेण्यात किती ते अडथळे ! जिथे जिथे मी गेले प्रत्येक ठिकाणाहून मला हुसकावून लावण्यात आले . पाप ! पुरे ! मी शक्ती नाही ! मला एकटीला राहू द्या . पुरे आता ! पुरे ! मी शक्ती नाही . परमेश्वराने कदाचित त्याच्या शक्तीविषयी सांगितले तरी मनुष्य त्याचा कदापि स्वीकार  करणार नाही . मी शक्ती नाही , नाही नाही त्रिवार नाही ! 
          मी कोण आहे ? मी मन आहे का ? मी जर मन असेन तर माझ्या मध्ये हजारो इच्छा उद्भवतील परंतु मला कोणत्याही भौतिक इच्छा नाहीत . स्वामींच्या स्थूलरुपाचे दर्शन आणि संभाषण ही माझी एकमेव अव्दितिय  इच्छा आहे . इच्छांमुळे  मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि मृत्यू पावतो. मला मन नाही.  माझे मन केवळ स्वामींबरोबर  असते. म्हणून मी मन नाही.  मग मी कोण आहे ? मी स्वतःला हाच प्रश्न विचारते .        
 उर्वरित वसंतामृत पुढील भागात  .....

जय साईराम
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा