गुरुवार, १९ डिसेंबर, २०१३

ओम श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 
     
     " नकारात्मकतेवरच मनुष्य प्रथम भर देत राहतो, नव्हे ह्या ऐवजी सकारात्मक विचारांवरच सतत भर दया  आणि म्हणा मी सर्वांवर हृदयापासून प्रेम  करतो."

वसंतामृत माला 
पुष्प नववे
  
संत कॅथरीनची अंगठी आणि गांधर्व विवाह भाग - १ 


८ मे २०१३ सकाळचे ध्यान 
वसंता - स्वामी , तुम्ही मला एक गोष्ट  सांगणार होतात. 
स्वामी - हो , मी सांगतो .
         ....... एक राजा होता . त्याला एक सुंदर कन्या होती . त्याच्या शेजारी दुसरा राजा राज्य करत होता . त्याला एक पुत्र  होता . तथापि ते दोन्ही राजे एकमेकांचा व्देष करत . त्या दोन्ही राज्यामध्ये वैर  होते . राजकन्येने त्या शेजारच्या राज्यातील राजपुत्राविषयी अनेक गोष्टी ऐकल्या आणि ती  त्याच्यावर प्रेम  करू लागली . एक दिवस ती  राजकन्या डोलीतून तिच्या मैत्रिणीबरोबर बाहेर गेली असता रस्त्यातून जातांना त्यांनी एक फुलांनी बहरलेला सुंदर बगीचा पाहिला . त्या दोघी खाली उतरल्या आणि त्यांनी बगीच्यात फेरफटका मारला . त्याच वेळी एक व्यक्ति घोडयावरून येतांना दिसली . डोली पाहून तो खाली उतरला आणि कोण आहे ते पाहू लागला . त्याने तिच्या मैत्रिणीकडे राजकन्येची चौकशी केली . मैत्रिणीने राजकन्ये विषयी  सर्व माहिती सांगितली.  तो शेजारच्या राज्यातील राजपुत्र असल्याचे सांगून त्याने राजकन्येला भेटण्याची इच्छा व्यक्त केली . मैत्रिणीने राजकन्येला हे सांगितल्यावर ती खूष  झाली . दोघं एकमेकांना भेटले , बोलले . राजपुत्राने त्याची अंगठी तिच्या बोटात घातली व म्हणाला " हा आपला गांधर्व विवाह आहे . आपल्या दोन्ही राज्यांमधील शत्रुत्व मिटल्यावर आपण पुन्हा भेटू आणि एकत्र येऊ " . 
वसंता - हे काय स्वामी ? हे तर आपल्या गोष्टीसारखे आहे . 
स्वामी - हो , ही आपलीच गोष्ट आहे . या विषयी लिही . 
वसंता - स्वामी , स्वामी हे वैर कधी संपणार ? ही व्देष भावना का ? 
स्वामी - केवळ हे वैश्विक कर्म आपल्याला एकत्र येण्यास प्रतिबंध करतात . इथेच आपण आनंदाने एकमेकांशी बोलू . 
वसंता - आता मला समजले स्वामी . कृपया मला यासाठी  काही पुरावा दया . 
ध्यान समाप्ती 
          आता आपण स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी विषयी पाहू . एक राजा होता . त्याला एक सुंदर कन्या होती . तिने शेजारच्या राज्यातील राजपुत्र देखणा , बुद्धिमान आणि सद्गुण संपन्न असल्याचे ऐकले . आणि ती त्याच्यावर प्रेम करू लागली . तथापि त्या दोन्ही राज्यांमध्ये शत्रुत्व असून त्यांच्यात नेहमी युध्द होत असे . एक दिवस ती राजकन्या डोलीतून तिच्या मैत्रिणीबरोबर बाहेर जात असतांना फुलांनी बहरलेला एक सुंदर बगीचा पाहून त्या डोलीतून खाली उतरल्या . त्याच रस्त्यावरून राजपुत्रही घोडयावरून जात होता . त्याने ती डोली पाहून मैत्रिणीकडे चौकशी केली , " तुम्ही कोण आहात ? येथे का आलात "? त्याने राजकन्येला भेटण्याची व तिच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली . ते दोघं भेटले . राजकन्या ज्याच्यावर प्रेम करत होती तो राजकुमार तिच्या शोधात आल्याने ती  अत्यंत आनंदात होती . राजपुत्राने त्याची अंगठी तिच्या बोटात घालून तिच्याशी गांधर्व विवाह केला .दोन्ही राज्यातील शत्रुत्व मिटल्यानंतर पुन्हा एकत्र येण्याच्या संकल्पाने दोघं अलग झाले .

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम
           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा