ओम श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" ईश्वर प्राप्तीचा खरा मार्ग " प्रेम " भक्ती आहे ".
पुष्प नववे पुढे सुरु
किती अजब गोष्ट आहे ! स्वामींनी मला आमचीच गोष्ट या नव्या दृष्टीकोनातून लिहिण्यास सांगितले . मी राजकन्येसारखी वाढले आणि मी द्वारकेच्या राजाविषयी ऐकून त्याच्यावर प्राणापलीकडे प्रेम करू लागले . तथापि आमच्या दोन्ही राज्यात वैर असल्यामुळे कृष्णाशी विवाह करणे शक्य नसल्याचे वडीलधाऱ्यांनी सांगितले . तो वैकुंठवासी परमेश्वर आणि मी पृथ्वीवरील एक सामान्य मुलगी . हे दोन्ही देश एकमेकांच्या विरुद्ध दिशांना असून त्यांच्यामध्ये वैर भाव होता . पृथ्वी एक स्वतंत्र राज्य असून येथे राहणाऱ्या लोकांना स्वर्गात जाण्याची इच्छा नसते . त्यांचे जग केवळ कुटुंब , मी आणि माझे एवढया पुरते मर्यादित असते . परमेश्वराचे जग म्हणजे सहस्त्रार . कोणालाही त्या जगतात जायचे नसते . मी कृष्णासाठी विलाप करत असे अखेरीस त्यांनी मला सांगितले की तो पुट्टपर्तित असून मी त्याला तेथे भेटण्यास यावे . मी तेथे गेले . त्याच्या दर्शनाने मला परमानंद झाला .
..... अरे द्वारका नगरी खाली आली आणि द्वारकेचा राजाही भूतली आला ?
एक दिवस आम्ही एका सुंदर वृंदावनात भेटलो . तिथे त्यांनी माझ्याशी गांधर्व विवाह केला . नंतर आम्ही विभक्त झालो . ते त्यांच्या राज्यात प्रशांती निलयमला गेले आणि मी माझ्या राज्यात मुक्ती निलयमला . मी इथे त्यांच्या आगमनाची प्रतिक्षा करते आहे . अजून ते आले नाहीत .
१९९८ मध्ये मी प्रशांतीला गेले परंतु तेथील प्रशासक म्हणाले , ' तुम्ही आत येऊ शकत नाही !' त्यांनी मला आत येण्याची परवानगी दिली नाही . त्यांनी माझी नाडी वाचून मला प्रवेश नाकारला . नाडी मध्ये ऋषीमुनींनी स्वामी कृष्ण आणि मी राधा असल्याचे घोषित केले आहे. ते वाचल्यानंतर त्यांनी मला आत येण्यास बंदी घातली . २००३ मध्ये स्वामींनी स्वतः मला बोलावले . मी आमचे सत्य सांगणारी अनेक पुस्तके लिहू लागले . आम्ही कसे हे जग सोडून वैकुंठगमन करू , हे मी अखेरीस लिहिले . मी लिहिले की स्वामी स्वतः माझ्या गळ्यात मंगळसुत्र बांधतील मग आम्ही हे जग सोडू . हे वाचल्यावर त्यांनी पुन्हा मला आत न येण्याविषयी बजावले . त्यांची वर्तवणूक अशी होती की जणुकाही स्वामी राजपुत्र आहेत व ते सर्वजण राजे ! ते म्हणाले , " आमचा राजपुत्र ब्रम्हचारी आहे . तो तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधेल असे तू कसे काय लिहितेस "?
अशा तेऱ्हेने प्रशांतीच्या प्रशासकांनी मला स्वामींचे दर्शन घेण्यापासून वंचित केले . त्यांनी माझे फोटो काढून घेतले . स्वामी जिथे जिथे जात तेथे मला प्रवेश नाकारला . एवढेच नव्हे तर त्यांनी मुक्ती निलयममधील इतरांचे फोटो घेऊन त्यांनाही स्वामींच्या दर्शनाची परवानगी नाकारली . ते आमच्या कडे शत्रुत्वाच्या भावनेने पाहत होते . परंतु या सर्वांचे खरे कारण त्यांचे वैश्विक कर्म हे आहे . वैश्विक कर्मांचा जेव्हा शेवट होईल तेव्हाच स्वामी आणि मी एकत्र येऊ शकू . १९९८ मध्ये माझी एकच नाडी होती . आता ४० च्या वर नाडया आहेत. ज्या स्वामी आणि मी कोण आहेत , ते आणि आमच्या नात्यामधील सत्य स्पष्ट करून सांगत आहेत .
स्वामींनी देह सोडल्यानंतर मी खूप रडले . त्यानंतर स्वामींनी मला सांगितले की ते परत येतील . स्वामींनी एस. व्हीं. ना नाडी ग्रंथ पाहण्यास सांगावे असेही सांगितले . एस. व्हि. नाडी पाहण्यास गेले असता सर्व नाडयांमधून एकच गोष्ट पुन्हा पुन्हा समोर येत होती . ऋषीमुनींनी स्वामी आणि मी कोण आहोत हे सत्य घोषित केले होते . त्यात त्यांनी म्हटले की माझे अश्रू आणि विलाप यामुळे स्वामींना पुन्हा यावच लागेल . अशा तऱ्हेने जागतिक पापकर्मांसाठी स्वामी आणि मी हे दुःख सोसतो आहोत .
या गोष्टीसाठी जेव्हा मी स्वामीकडे पुरावा मागितला तेव्हा त्यांनी मला चांदीची अंगठी दिली . ती एक चांदीची पट्टी होती . त्यावर मधोमध हृदयाचा आकार होता . हृदयावर ( + ) क्रॉसचे चिन्ह होते आणि त्या पट्टीच्या किनारीवर काही अक्षरे कोरली होती . ' aria aIKaTEPINa '
१८ मे २०१३ संध्याकाळचे ध्यान
वसंता - स्वामी , या अंगठीचे काय ?
स्वामी - तू पुरावा मागितलास . ही गांधर्व विवाहासाठी आहे .
वसंता - स्वामी , तुम्ही पूर्वी सांगितले की तुम्ही निळी अंगठी दयाल ?
स्वामी - ही या गोष्टीसाठी आहे ......
ध्यान समाप्ती
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......
जय साईराम
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा