ओम श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" दिखावू कार्मकांडांपेक्षा अंतर्भक्ती श्रेष्ठ आहे " .
श्री वसंत साई
पुष्प सातवे पुढे सुरु
स्वामींनी शर्टच्या आकाराचा कागद कापून एका रजिस्टरच्या मागे चिकटवला.
वरच्या बाजूला बोमध्ये रिबीनीच्या दोन उभ्या रेघा दिसत होत्या . रिबिनींच्या पुढे ' रोमान्स ' हा शब्द लिहिलेला होता . शर्टच्या मध्यभागी
म्हणजे हृदयस्थानी स्वामींनी सहा पाकळ्यांचे एक फुल चिकटवले होते . हे
आमच्या दोघांच्या हृदय मिलनाचे , चिंतामणीचे सूचक आहे . तेथून सत्य आणि
प्रेम यांच्या संयोगातून , नवनिर्मिती होणार . शर्टवरील त्या दोन उभ्या
रेघा इडा आणि पिंगला नाड्यांचे प्रतिक आहे . त्या दोन्ही उर्ध्वगामी असून
अनाहत चक्रात त्यांचा संयोग होतो . हे आहे शिव आणि शक्ती .
आमच्या हृदयीचे भाव विश्व ब्रम्ह गर्भ कोटममधून
स्तूपादवारे बाहेर पडून सर्वत्र पसरतात . प्रत्येक पुरुषामध्ये स्वामींचे
सत्यभाव भरून राहतात आणि सर्व स्त्रियांमध्ये माझे प्रेम भाव भरून उरतात .
सर्वांमध्ये या भावांनी प्रवेश केल्यानंतर ते उन्नत होतात . या भावसंयोगातून
जन्माला येणारी ज्ञानसंतती जीवनमुक्त अवस्थेत असेल . हाच दिव्य प्रणय .
इथे कामभाव नाही . स्पर्शभाव नाही. सर्व केवळ परमेश्वर स्पर्शी आहे .
स्वामींनी त्या लेबलवर चेनच्या रनर सारखा प्रेम ( Romance ) हा
शब्द लिहिला होता . शर्टाचे दोन्ही भाग चेननी जोडले जातात . मी ती चेन आहे
जी स्वामींची दोन्ही रूपं सांधते एका रुपात स्वामी ८४ वर्षे राहिले आता साई
नूतन देहात येतील , या दोन्ही देहांना जोडणारी मी चेन आहे . स्वामींनी देह
सोडल्यानंतर मी शोकविव्हल होऊन करुण विलाप करत होते . माझ्या या करूण
रुदनामुळे ते आता पुन्हा येत आहेत स्वामींच्या नाम आणि रूपाप्रती असणारे
माझे प्रेम स्वामींना परत घेऊन येत आहे . म्हणून शर्टच्या दोन्ही भागांना
जोडणाऱ्या चेनप्रमाणे माझी भूमिका आहे . मी माझ्या प्रेमाद्वारे त्यांचे हे
नवीन रूप निर्माण केले आहे .
तुमची प्रत्येक इच्छा तुमची निर्मिती करते . तुमचे अनेक पैलु बनवते . तुम्ही मूर्ती घडवणाऱ्या शिल्पाकारासारखे आहात . तुमचा प्रत्येक विचार छीन्नीसारखा असून तो तुम्हाला आकार
देतो . आणि तुमच्या पुढील जन्माची रूपरेषा बनवतो . माझी फक्त एकाच इच्छा
आहे " मला स्वामींना प्राप्त करायचे आहे ". म्हणून माझा प्रत्येक विचार
त्यांचे रूप घडवतो . माझे अश्रू आणि रुदन त्यांचा प्रत्येक अवयव बनवतो . अशा
त-हेने स्वामी आता नवीन रूपात येतील . हे खरे प्रेम आहे मी स्वामींना
कधीही जवळून पाहिले नाही . ते कधीही माझ्याशी एक शब्दही बोलले नाहीत . ना
मी त्यांना कधी स्पर्श केला आहे . तथापि मला ते प्रिय आहेत आणि मला ते हवेत . स्वामी आणि मी ध्यानात एकमेकांशी
बोलतो आणि स्पर्श करतो . परंतु तेव्हा स्थूल शरीर नसून दिव्य शरीर असते .
ते शुद्ध असते . सर्व शुद्ध सत्व स्थितीत घडते . हा देहभाव नव्हे . परमेश्वर
आणि त्याची शक्ती यांना देहभाव नसून केवळ दिव्य भाव असतो . शिव आणि शक्ती एकाच देहाचे दोन भाग आहेत . शिव शक्ती सर्वांच्या देहामध्ये विदयमान
असून कुंडलिनीच्या रूपाने कार्यरत आहेत . त्या दोघांचा संयोग म्हणजे जीवन मुक्त
अवस्था होय . हे दर्शवण्यासाठी स्वामी आणि मी येथे आलो आहोत . आणि याच
कारणासाठी आम्ही विरह वेदना सोसतोय . तथापि ही प्रेमिकांची विरहवेदना नव्हे
तर जीवात्मा व परमात्म्याची वियोग वेदना आहे . याचे प्रात्यक्षिक हेच
स्वामींचे अवतार कार्य आहे . तथापि सामान्य मानवी जीवनात जेव्हा हे अनुभवले जाते तेव्हा त्याला प्रेम (रोमान्स ) म्हणतात . ते कामभावावर आधारित असते . त्यानंतर विवाह होतो . ह्या भौतिक जीवनाची तुलना खड्डयातील सांडपाण्याच्या जीवनाशी करता येईल .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....
जय साईराम
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा