गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१३

                                          ओम श्री साई राम                            
                                    पुष्प चौथे पुढे सुरु

४) सौंदर्य - सौंदर्य  अत्यंत धोकादायक आहे . एक दिवस तुमचे सौंदर्य लोप पावणार आहे . सौंदर्य म्हणजे काय ? साधारणतः सौंदर्य या शब्दातून बाह्य सौंदर्य सूचित होते . तथापि बाह्य सौंदर्य किती काळ टिकेल ? सर्व काही क्षणभंगुर आहे . सौंदर्य तारुण्य काळापर्यंत टिकून राहते . वार्धक्यामध्ये सौंदर्य ओसरू लागते म्हणून बाह्य सौंदर्याचा विचार करू नका . तुमचे लक्ष तुमच्या आंतरिक सौंदर्यावर केंद्रित करा . 
             स्वर्गीय लोकात केवळ अप्सरांसाठी बाह्य सौंदर्य उचित असते . कारण त्या चिरतरुण असतात . पृथ्वीवरील मानवाचे सौंदर्य हे आभाळात चमकून क्षणार्धात अदृश्य होणाऱ्या विजेप्रमाणे असते . म्हणून सौंदर्याचा अहंकार बाळगू नका .
५) तारुण्य - तारुण्य हे क्षणार्धात अदृश्य होणाऱ्या विजेप्रमाणे असते . तारुण्याच्या अहंकाराविषयी बोलतांना स्वामी म्हणतात , " वडीलधाऱ्या  मंडळींचा मान राखा . आजचे तरुण उदयाचे वयस्क आहे . काळ सतत बदलतो आहे . मुल जन्माला येते , तारुण्यात प्रवेश करते , वार्धक्याकडे वाटचाल व अखेरीस मृत्यू पावते . म्हणून कोणीही आपल्या तारुण्याचा अहंकार बाळगू नका . परमेश्वर प्राप्ती हेच केवळ मनुष्याचे ध्येय आहे तथापि परमेश्वराची कृपा असेल तर एखादा चिरतरुण राहू शकतो . मार्कंडेय हे त्याचे उदाहरण आहे . तो सोळाव्या वर्षी मृत्यू पावेल असे त्याला सांगितले गेले . त्या दिवसापासून त्याने उत्कट भक्ती भावाने परमेश्वराची आराधाना केली . त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन परमेश्वराने त्याला सदैव सोळा वर्षे वयाचा  राहण्याचा चिरंजीवी होण्याचा वर दिला . युगा  मागून युग गेली तरी तो सोळा वर्षाचाच चिरतरुण राहिला आदि शंकरांनीही सांगितले होते. सावधान केले होते की तारुण्याचा अहंकार बाळगू नका. स्वामीही तेच सांगतात . 
           एक उदाहरण पाहू या. पुरू नावाचा एक राजा होता. वार्धक्याकडे झुकला असूनही त्याला तारुण्यातील मौजमजा लुटण्याची इच्छा होती. त्याने त्याच्या पुत्रांना विचारले की ते त्यांच्या तारुण्याच्या बदल्यात त्याचे  वार्धक्य घेतील का . चौघापैकी तिघा पुत्रांनी नकार दिला. सर्वात धाकटया मुलाने त्याला संमती दर्शवून वडिलांचे वार्धक्य घेतले . वडिलांनी इतर तीन मुलांना ते शिकारी होतील असा शाप दिला. धाकटा मुलगा वार्धक्यात अनेक हालअपेष्टा सोसत होता. त्याचे वडील तारुण्यातील आनंद उपभोगत होते . बराच कालावधी लोटल्यानंतर त्यानी त्याचे वार्धक्य परत घेतले आणि मुलाला राज्य पद दिले . 
           ह्या कथेतून तारुण्याची आसक्ती दर्शविली आहे . राजाला तारुण्यातील मौजमजा लुटण्याच्या इच्छेखातर तो तीन मुलांना शिकारी बनवतो व धाकटया मुलाला वृद्ध बनवतो . तिन्ही मुलांना शाप देण्या इतकी तसेच धाकटया मुलाचे वृद्धात परिवर्तन करण्याची इतकी सिद्धी शक्ती त्याच्या कडे असते . तथापि ती सिद्धी तारुण्यातील मौजमजा लुटण्यासाठी खर्ची घालतो. जर त्याने ती सर्व शक्ती परमेश्वराकडे वळवली असती तर त्याला अमरत्व प्राप्त झाले असते.  हे लक्षात घ्या. वृद्धत्व येण्यापूर्वी  केवळ थोडी वर्षे तारुण्याचा बहार असतो . यातून कोणीही सुटू शकत नाही .
                    उर्वरित वसंतामृत पुढील भागात ...... 

रविवार, २७ ऑक्टोबर, २०१३

   
                                                    
                                                           ओम श्री साई राम
   वसंतामृतमाला
 चतुर राजा ! ( पुष्प चौथे )

" मी आत्मा आहे. परमेश्वरामध्ये विलिन होण्यासाठी मला जन्म दिला गेला आहे . " 
         प्रत्येकाने अशा तऱ्हेने चिंतन करून स्वतः मध्ये परिवर्तन घडवले पाहिजे . आपण आत्म्याचे सत्य जाणले पाहिजे . हे शिकवण्यासाठीच हा महाअवतार येथे आला . 
             आता पुरे ! उठा ! जागे व्हा ! तुम्ही देह नाही ! 
        देहभावामधुनच ' मी आणि माझे ' उत्पन्न होते . मनुष्य जास्तीत जास्त धन संपत्तीची आकांक्षा करतो . त्याला इतरांचे अनुकरण करण्याची इच्छा असते . त्यातून क्रोध आणि मत्सर त्याच्या अंतरंगात शिरकाव करतात . तथापि ज्यावेळी तो देह त्याग करतो तेव्हा तो बरोबर काहीही घेऊन जात नाही. कोण पत्नी ? कोण पुत्र ? वाल्मिकींच्या कथेद्वारे हे सत्य दर्शवण्यात आले आहे . 
          रत्नाकर अनेकांची हत्या करून त्यांच्या जवळील पैसा अडका लुटून आपल्या कुटुंबाची गुजराण करत असे . एक दिवस नारद मुनी येऊन त्याला सांगतात , " तू तुझ्या कुटुंबाला विचार की ते तू लुटलेल्या संपत्तीत भागीदार होतात . परंतु ते तुझ्या पापात भागीदार होतील का ? " ते उत्तरतात , " कुटुंबाचा चरितार्थ चालवणे हे तुझे कर्तव्य आहे . आम्ही तुझ्या पापात वाटेकरी होणार नाही ." हे ऐकल्यानंतर रत्नाकरचे डोळे उघडतात व त्याला आपली चूक समजते . तो तप करतो आणि वाल्मिकी बनतो . त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी कठोर परिश्रम केलेत तरी तुमच्या पापामध्ये कोणीही वाटेकरी होणार नाही . काम , क्रोध , मोह , लोभ , मद , मत्सर देहभावामधुन येणारे पापकारक षडरिपू आहेत . हे षडरिपू आपल्या मधून काढून टाकण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे . यासाठी देह भाव नष्ट करायला हवा . मी आत्मा आहे असा घोष करा . देह आणि देहाशी संबंधित जे काही आहे ते माझ्या सत्य स्वरूपाशी संबंधित नाही . अशा तऱ्हेने तुम्ही चिंतन केले पाहिजे .

अष्टाहंकार

            स्वामींनी एका कागदावर लिहून दिले , " हे आठ प्रकारचे अहंकार ओळखा . त्या अहंकारांना पायदळी तुडवा . कुटुंब , संपत्ती , सौंदर्य , तारुण्य , विद्वत्ता , जन्मस्थान आणि आध्यात्मात व्रतवैकल्य पूर्ती यातून अहंकार उत्पन्न होतो . 
          आणि पुन्हा ...........
     आपले आत्मस्वरूप म्हणजेच परमेश्वर अहंकाराच्या पडद्याने झाकले जाते. 
            आता आपण ह्या अष्टाहंकारांविषयी पाहू या . स्वामी म्हणतात तुम्ही या अहंकारांना पायदळी तुडवा . ते हे कठोर शब्दात सांगत आहेत . वडील मुलांवर प्रेमाचा वर्षाव करतात परंतु जेव्हा मुले चूका  करतात  ते कठोर होऊन कडक शब्दात कान उघडणी करतात . स्वामी प्रेमस्वरूप आहेत . परंतु चुकीच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्या मुलांशी ते कठोरपणे वागतात . आता आपण आठ प्रकारच्या अहंकारान विषयी पाहू . 
१) कुटुंब - आसक्तीची सुरुवात कुटुंबातून होते - प्रथम पत्नी नंतर मुले , नातवंडे आणि पतवंडे . अशा तऱ्हेने आसक्ती वाढत जाऊन मनुष्यावर घट्ट पकड घेते . काही दिवसांपूर्वी मी स्वामींच्या पुस्तकातील एक गोष्ट वाचली . 
" एकदा एक राजा तप करतो . त्याच्या तपाने प्रसन्न होऊन परमेश्वर त्याच्या समोर प्रकट होतो आणि विचारतो की  त्याला काय हवे . राजा म्हणतो , " मला माझ्या पतवंडाचा राज्याभिषेक सोहळा पहायचा आहे !" 
          स्वामी हे सांगून त्या राजाच्या वर मागण्याच्या चतुराई विषयी आश्चर्य व्यक्त करतात. या एका वरात सर्व सामावले आहे . प्रथम त्या राजाला मुलगा असायला हवा त्या नंतर त्याच्या मुलाला मुलगा व्हायला हवा आणि त्या नंतर त्याच्या नातवाला मुलगा व्हायला हवा . त्या सर्वांना राज्य पद मिळायला हव. त्याचे राज्य अबाधित राहायला हवे आणि हे सर्व पाहण्यासाठी राजाची प्रकृती चांगली राहायला हवी ! 
          संपत्ती , नाव , लौकिक , वारस ह्या सर्व इच्छा या एका वरामध्ये अंतर्भूत आहेत . एका माणसाच्या मनात किती इच्छा असतात हे स्वामी या गोष्टीतून दर्शवत आहेत ! राजाने हा वर मागितला म्हणजे त्याच्या वंशातील सर्वांना राज्य पद प्राप्त होईल . प्रत्यक्ष परमेश्वर त्याच्या समोर प्रकट झाला असे असूनही त्याच्या इच्छा वासनांमुळे त्याने असा वर मागितला . कुचेला अत्यंत दरिद्री होता व तो परमेश्वराच्या शोधार्थ निघाला . परमेश्वराचे दर्शनाने झालेल्या अतीव आनंदाच्या भरात तो त्याच्या कडे  काही मागायचेच  विसरला. अशा तऱ्हेने आपण धनवान किंवा राजघराण्यात जन्म झाल्याच्या अहंकाराचे वा गर्वाचे उच्चाटन करायला हवे . 
२) संपत्ती - धन संपत्तीचा अहंकार अत्यंत वाईट असतो . सर्व काही नाशवंत आहे . संपत्तीही शाश्वत नाही.  आजचा भिकारी उदयाचा लक्षाधीश असेल किंवा आजचा लक्षाधीश उदया भिकारी असेल . स्वामी हे बऱ्याचवेळा सांगतात . धनाचा अहंकार अत्यंत वाईट गुण आहे . धनवान लोक बऱ्याचदा इतरांचा मान ठेवत नाहीत . धनसंपत्तीव्दारे कोणीही परमेश्वर प्राप्त करून घेऊ शकत नाही . येथे केवळ विनम्रता आवश्यक आहे . महालक्ष्मी ही समस्त धनसंपदेची देवता आहे . असे असूनही तिला केवळ महा विष्णूनच्या पद्सेवेची इच्छा असते . नवविधा  भक्ती मार्गाचे वर्णन करतांना स्वामी पदसेवा करणाऱ्या महालक्ष्मीचे उदाहरण देतात . 
३) चारित्र्य - प्रत्येकाने सदगुण आत्मसात करावेत . परंतु सदगुण संपन्न असण्याचा अहंकार बाळगणे अत्यंत वाईट आहे . विनोबाजींनी भगवद  गीतेवर लिहिलेल्या प्रबंधात असे सांगितले आहे . 
         ' वाईट मनुष्य सदगुण संपन्न व सदगृहस्थ असल्याचा अहंकार बाळगणाऱ्या माणसापेक्षा बरा . 
             याचा अर्थ असा नाही की मी दुर्गुणांना उत्तेजन देतेय किंवा उचलून धरतेय . जर एखाद्याकडे चांगले गुण असतील ज्याचा त्याला अहंकार असेल तर ते दुर्गुणी व्यक्ति पेक्षा अधिक वाईट आहे . अहंकार किती घातक आहे हे दर्शवण्यासाठी विनोबाजी उदाहरण देतात . आपण सदगुणी आहोत याची त्या व्यक्तीस जाणीवही नसावी . जेव्हा एखाद्याकडे एवढी विनम्रता असेल तेव्हाच अहंकार उदभवणार नाही . एकदा धर्म राजाला जगातील एक वाईट व्यक्ति शोधण्यास सांगितले गेले . काही वेळाने तो परत आला आणि म्हणाला , "  मी अखिल विश्वात शोध घेतला . परंतु सर्वजण  चांगले आहेत. मी एकटाच वाईट आहे . " धर्मराज हा धर्माचे पालन करणारा राजा म्हणून ओळखला जातो . तथापि त्याचा स्वतः विषयीचा दृष्टीकोन पूर्णपणे वेगळा होता . त्याच्या दृष्टीकोनातून जगातील सर्वजण चांगले होते व केवळ तो एकटा  वाईट होता . तो स्वतः एक सदगुणी व्यक्ति आहे हे तो विसरला . जर त्याच्या एवढी विनम्रता असेल तर अहंकाराचा उदभव होणार नाही . जरी तो सर्वगुण संपन्न राजा असला तरी त्याला अजिबात अहंकार नव्हता . जे सदगुणी आहेत त्यांनी या मर्यादेपर्यंत अहंकार रहित असायला हवे . 
             उर्वरित वसंतामृत पुढील भागात ........
            

गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०१३

                                        ओम श्री साई राम             
                                अनुभवसिद्ध कर्मयोग 

श्री वसंत साई अम्मांची कर्मयोगावर आधारित जीवनशैली
 कर्मयोग म्हणजे काय ?
       कर्मयोग - गीतेतील तिसरा अध्याय . सामान्य कर्म करतानाही परमेश्वराशी नित्य युक्त राहण्याचा सराव करणे म्हणजे कर्मयोग होय . हा काही एकांतात जाऊन करण्याचा योगाभ्यास नव्हे . कर्म म्हणजे आपण करत असलेली नेहमीची दैनंदिन कृत्ये . उदा :- चालणे,  बोलणे, बसने , लिहिणे आपण करत असलेली प्रत्येक कृती .   
      कर्माशिवाय कोणीही क्षणभरसुद्धा राहू शकत नाही . श्वासोच्छवास हे ही  एक कर्मच आहे . जीवनातल्या प्रत्येक क्षणी आपण कर्म करत  असतो . झोपेतही कर्म करत असतो तथापि , मायेने संभ्रमित झाल्यामुळे इच्छा वासनांमध्ये अडकून आपण आपल्या कर्मामधून य:कश्चित फलाची अपेक्षा धरतो. 
      आपल्या या कर्मांचे मुळ  कारण काय ? सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण अविश्रांत काम करत असतो . आपल्याला आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा असतो . मुलांचे पालन पोषण करायचे असते . त्यांना चांगले शिक्षण व सुखसोयी उपलब्ध करून दयायच्या असतात . यासाठी आपण हा सर्व खटाटोप करत असतो . एवढे करून आपल्याला काय मिळते ? तर अनंत अडचणी , त्रास आणि अपमान . आपले जीवनही अशांत व अस्वस्थ असते . या सर्वत्र त्रासापासून , मानसिक अस्वस्थतेपासून सुटका करून घेण्यासाठी आपण नाटक , सिनेमा , टी. व्ही. , मासिके यांचा आश्रय घेतो . मित्र- मैत्रिणीना भेटून त्यांच्या बरोबर दुस-यांची निंदानालस्ती करत वेळ घालवतो . याने आपल्याला शांती मिळते का ? दिलासा मिळतो का ? फार फार तर असे म्हणता येईल की , आपल्याला आपल्या मानसिक अस्वस्थतेचा थोड्या काळाकरता विसर पडतो . परंतु घरात पाऊल टाकताक्षणी पुन्हा सगळ्या चिंता-काळज्या आपल्याला घेरून टाकतात . 
            जर हे खरे आहे , तर जगातील सर्व वस्तूंमधून मिळणारा आनंदही तात्कालिक स्वरूपाचा नाही का ? मनुष्य ह्याचा विचारच करत नाही . या वस्तूंमधून मिळणारी शांती , ही खरी शांती नाही याची जेव्हा मनुष्याला जाणीव होते तेव्हा तो ख-या शांतीच्या स्त्रोताचा शोध घ्यायचा प्रयत्न करू लागतो आणि तिथूनच त्याच्या अध्यात्मिक प्रवासास सुरुवात होते . आपण प्रामाणिक प्रयत्न केले तर परमेश्वर आपल्याला मदत करतो . परमेश्वराला अर्पण करण्याच्या भावातून जर आपण आपली नित्यकर्मे पार पाडली , तर आपल्याला चित्तस्थिरता व शांतीचा लाभ होतो . आपली कामें परमेश्वराला कशी अर्पण करायची ? पुढील गोष्टींवरून याची कल्पना येईल .

                                 सर्व कर्म भगवद्प्रीत्यर्थ
 
            एका गावात दोन विणकर राहत होते . एक होता सामान्य विणकर आणि दुसरा होता कबीरदास . कबीरदास कापड विणतांना परमेश्वराचे नामस्मरण करत असे , स्तुती स्तोत्रे गात असे . तसेच ते कापड तो ईश्वरासाठी विणतो आहे असा भाव त्याच्या मनात असे . दोघेही विणकर बाजारा मध्ये जात  व कापड विकून पैसे मिळवत . दोघेही धन प्राप्तीचा आनंद घेत . कबीराला मात्र त्या बरोबर आध्यात्मिक धन प्राप्तीही होत असे . त्याला भक्तीचा अतिरिक्त लाभ होत असे . अशा रीतीने आपले कर्म ईश्वर चरणी अर्पण करून  कबीराने सामान्य विणकराला कर्मयोगाचा उच्च  दर्जा प्राप्त करून दिला . 
           असेच दुसरे उदाहरण गोरा कुंभाराचे . तो कुंभार काम करत असे , मडकी बनवतांना परमेश्वराचे गुणगान करत असे . मातीची मडकी व भांडी बाजारात विकून त्यावर आपला चरितार्थ चालवत असे . त्याने आपल्या कर्माची भक्तीशी सांगड घातल्याने त्याला परमेश्वर कृपा प्राप्त झाली व तो एक कर्म योगी म्हणून ओळखला जाऊ लागला.

संदर्भग्रंथ :- अनुभवसिद्ध कर्मयोग  

















बुधवार, २३ ऑक्टोबर, २०१३

                                                         ओम श्री साई राम

अम्मा ! अखिल विश्वातील समस्त भक्तांकडून ह्या कविता आपल्या सुवर्ण चरण कमली अमृत वर्षात पदार्पणानिमित्य  हे समर्पण .




                                       अमृत संवत्सर
 
डोळ्यात प्राण आणुनी 
प्रतीक्षा करत होतो आम्ही 
तुझ्या पदार्पणाची , या मंगल वर्षात 
उजाडली आज पहाट , त्या अमृत वर्षाची 
ऋषीमुनी सांगती नाडी ग्रंथात 
बोलावतील स्वामी तुज या शुभ संवत्सरात 
ती मंगल घटिका नाही दूर 
येता नूतन देहधारी श्री सत्य साईश्वर 
दीर्घ प्रतिक्षेची तुझ्या  होईल अखेर , होईल अखेर
जगद्जननी आहेस तू , सांगतील स्वामी जगासमोर 
होतील नतमस्तक सारे तुझ्या कमल चरणांवर 
कलियुगाचा अस्त अन सत्ययुगाची पहाट
साई वसंतेचा जयजयकार दुमदुमेल अखिल विश्वात 



                                              माँ

                                 श्री वसंता साई    माँ  (२ )            
प्रेम स्वरूपिणी माँ
शांती दायिनी  माँ
दुःख निवारिणी   माँ
हृदयस्पर्शी   माँ
आनंद दायिनी   माँ  
 श्री वसंता साई    माँ (२ )
ज्ञान दायिनी   माँ
आत्म स्वरूपिणी   माँ
शक्ती प्रदायीनी   माँ
 अंर्तयामिनी   माँ
दिव्य स्वरूपिणी   माँ
  श्री वसंता साई    माँ (२)
सद्गुण संपन्न   माँ
जगद्धो धारिणी  माँ
विश्व  मुक्ती प्रदायिनी   माँ
          श्री वसंता साई   माँ   


 साई  राम

सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१३

                                                              ओम श्री साई राम 
                              ... स्वामी पुस्तक घेतात ! *

२३ ऑक्टोबर २००७ 
        सकाळचे ६:३० वाजलेत ! भरगच्च भरलेल्या कुलवंतराय मंडपामध्ये मी बसते . अनेक विचार उठतात ... ' हे खरं आहे नं ? मी या पुस्तकात लिहिलेलं सर्व सत्य आहे न ?' काल ध्यानात स्वामी म्हणाले , " तू डॉक्टर बागचींना पुस्तक दे . मी घेईन . " 
            बराच वेळ झाला ! स्वामी अजून आले नाहीत ! डॉक्टर बागची दिसत नाहीत . मी विचार करते , ' हे काही सत्य नाही .' आम्ही फार दूर बसलो आहोत . मी स्वतःशीच कुजबुजते , ' हे काही सत्य नाही .' माझ्या पुढयात बसलेली भक्त सर्वांना व्यत्यय आणते आहे . मी शांतपणे स्वतःला सांगते , " हे सत्य नाही . हे काही सत्य नाही ." 
            ८ वाजून ५५ मिनिटे झाली आहेत . डॉक्टर बागची येतात आणि व्हरांडयात बसतात . स्वामी कुठे आहेत ? भजन सुरु होतं . माझ  हृदय धडधडतंय ! मी रडवेली होऊन स्वामींचा धावा करते . ' स्वामी , प्लीज या ना!' स्वामी गाडीतून येतात . ९ वाजून २२ मिनिटे झाली आहेत . भजन ऐकू येते , ' बाबा ! आवो मेरे कीर्तन में. ' स्वामी व्हरांडयात जातात . स्वामी गाडीतून बाहेर येताच डॉक्टर बागची पुढे सरकतात . त्यांच्या हातात पुस्तक आहे . स्वामी हात वर करून आशीर्वाद देतात . एक भक्त उठतात आणि स्वामींशी  बोलतात . नंतर स्वामी डॉक्टर बागचींना बोलावतात . डॉक्टर बागची पुस्तक दाखवताहेत . स्वामींचे दिव्य हात पुस्तक घेतात . माझ्या अश्रूंना उधान येते , तसेच माझ्या बरोबरच्या  सर्वांच्या आनंदालाही . ९ वाजून २५ मिनिटे झाली आहेत . भजन चाललंय … ' अंतर ज्योती जालाओ साई  … ' स्वामी भजन सभागृहामध्ये जातात . ५ मिनिटां नंतर आरती होते . स्वामी निघतात . 
              हे सर्व असं घडलं की  जणू स्वामी केवळ पुस्तक  घ्यायलाच आले होते ! भजन सुरु होता होता डॉक्टर बागचींचं येण , स्वामींचं येण , ' अंतर ज्योती जालाओ  साई ' ही ओळ गायली जात असताना स्वामींनी पुस्तकाचा स्वीकार करण , सर्व काही त्या दैवी योजनेचा भाग असच दिसत होतं. भजनाच्या ह्या ओळीचा अर्थ आहे , ' अंतर मनातील ज्योती जागवा . ' माझे स्वामीन मध्ये एक रूप होण्याविषयीचे पुस्तक स्वामींनी माझ्या जन्म दिवशी घेतले . मी ज्योती रूपाने जन्म घेतला आणि ज्योती रूपाने विलीन होणार ! केवळ हेच सत्य आहे. ह्या व्यतिरिक्त काहीही सत्य नाही . 
           माझी इच्छा होती , माझ्या जन्म दिवशी स्वामींनी माझ्या कडे बघावे आणि आशीर्वाद दयावा . आता मला कळतंय की  स्वामींच पुस्तक घेण हाच सर्वात मोठा आशीर्वाद आहे . आता पर्यंत मी बावीस पुस्तके प्रकाशित केली आहेत . हे पहिलं पुस्तक आहे जे स्वामींनी घेतलं.  ह्या वरून पुस्तकाचे महत्व जगास दिसून येईल . 
                                                          श्री वसंता साई 

संदर्भग्रंथ :- भगवंताचे अखेरचे ७ दिवस 

  

रविवार, २० ऑक्टोबर, २०१३

            कृष्णच कर्ता करविता आहे याचा विसर पडू देऊ नका. ह्याचाच राधा आणि गोपिकांनी आकंठ आनंद अनुभवला. त्यांनी चराचरात , ठायी ठायी फक्त कृष्णच पाहिला. संपूर्ण जग हे कृष्णाचा अमृतमय खेळ आहे . फार वर्षांपुर्वी मी एक कविता केली होती . 

हे जग आहे कृष्णलीलामृत 
इथे किती हा आनंद 
कूजन पक्ष्यांचे, नृत्य मोरांचे 
तरंगणारी फुलपाखरे , पळणारी हरणे 
शिखरे उत्तुंग , द-या खोल 
नानाविधरंगी वृक्ष फुलांचा बहर
हिरवे हिरवेगार गालिचे 
नाही का हे देती तुजसी आनंद ? 

मानवात दिसती महात्मे थोर 
जणू उत्तुंग पर्वत 
त्यासवे असती संकुचित स्वार्थ पारायण , 
जणू सपाट भूप्रदेश 
अन आहे अस्वस्थ काही 
जशा समुद्रलहरी 

काही असती पाषाण हृदयी,
काही मृदुल , जशा लतावेली , 
डुलती मंद झुळुकेनी ,
काही विहंगासम मुक्तात्मे ,
घेत भरारी अध्यात्म गगनी 
 काही स्वार्थी माणसे ,
स्वकवचात फसती खेकड्यासम

माणसांचे विभिन्न स्वभाव !
आनंदानुभव घ्या त्यातून 
लक्ष असु दया एकात्मतेवर 
हेच आहे सत्य 
हि विभिन्नताच करी संस्कार 
आणि बीज पेरी पुनर्जन्माचे 

किती विभिन्न निर्मिती ही !
किती विभिन्न स्वभाव तरी !
हे साई ! दर्शन होते सर्वांमधुनी तुझ्या कृपेचे.
उणेदुणे काढणे आणि मन गुंतवणे 
हे निव्वळ अज्ञान असे ! 

                                                              श्री वसंता साई

संदर्भग्रंथ :- कर्मकायदयावर उपाय 





गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०१३


                                                          ओम श्री साई राम

                               सत्ययुग आणि कर्मकायदा

                                          प्रस्तावना

           हे विलक्षण पुस्तक एक नवा विचार आहे. पुस्तक वाचण्यापूर्वी , कृपाकरून प्रस्तावना वाचा म्हणजे तुम्हाला ह्या ' कर्मकायदा '  पुस्तकाचा  विषय समजण्यास सह्यायभूत होईल . 
               कर्म म्हणजे काय ? आपण करीत असलेली प्रत्येक कृतीच कर्म आहे. जर आपण प्रत्येक कृती योग म्हणून भगवंताशी  जोडून केली , तर ती आपल्याला स्पर्श करत नाही ' साई गीता प्रवचनम् ' पुस्तकातील ' कर्मयोग ' या अध्यायात हे  मी स्पष्टपणे मांडले आहे . 
  ममत्वामुळे आपण कर्माशी बांधले जातो . हेच जन्म मृत्युच्या चक्राचे कारण होय . आपल्या मध्ये उत्पन्न होणा-या भावनांचे  विचार बनतात . विचार कृतीत उतरतात.  या कृती  , चांगल्या अथवा वाईट , त्यांचे मनावर ठसे  उमटतात  आणि गहिरे संस्कार  बनू शकतात . हे संस्कार आपला पुढील जन्म ठरवतात. 
          पत्नी, मुले, कुटुंब, मालमत्ता ह्या विषयांच ममत्व माणसाला पुन्हा पुन्हा जन्म घेण्यास कारणीभूत असत . हाच ' कर्म कायदा ' आहे . हे प्रतिबिंब, प्रतिक्रिया आणि प्रतिध्वनीच तत्व आहे . हे माणसाचा पाठलाग करत असते . म्हणूनच कुठलीही कृती सारासार विचार करूनच केली पाहिजे . 
           पाप म्हणजे काय ? एखादी गोष्ट वाईट आहे हे ठाऊक असूनही ती कृती करणे  म्हणजे  पाप. जर तुम्हाला माहित आहे की हे काम वाईट आहे , तर ते घडायलाच नको . तरी सुद्धा जर तुम्ही ते केलत तर ते पाप होईल . प्रत्येकास सद्सद्विवेकबुद्धी  आहे . ती आपल्याला  ' हे वाईट आहे ' असे सांगत असते . असे असतांना आपण पाप का करतो ? त्याला कारण आपला अहंकार , मत्सर आणि क्रोध असतो . हे पाप आहे . 
              साधूला अहंकार किंवा स्वार्थ  नसतो , म्हणून तो पाप कारु शकत नाही. त्याला काहीच बंधने किंवा स्वार्थ नसतात . म्हणूनच कर्म त्याला स्पर्श करत नाहीत . 
           पाप चार प्रकारची असतात . पहिला प्रकार म्हणजे चूक आहे हे जाणूनही केलेले कृत्य . एखादी व्यक्ति जेव्हा देशाचा कायदा , त्याचे नियम , शिस्त  पाळत नाही  तेव्हा ते दुस-या  प्रकारचे पाप होते . राज्य कारभार सुरळीत चालण्यासाठी प्रत्येक देशाचा विशिष्ट कायदा असतो . तो न पाळणा-याल्या शिक्षा होते . जे अप्रामाणिक आहेत  , आपल्या भूमीच्या कायदयाचा अवमान करतात , शहराचे किंवा गावाचे नियम पाळत नाहीत त्यांना शिक्षा भोगावी लागते . हे सर्व मानवी जीवनाचे ढोबळ नियम आहेत.  जे देशाचा कारभार चालावतात , जसं की सरकारी कार्यालये , पोलीस , न्याय संस्था हे सर्व , कायदा अंमलात आणून त्याला आधारही देतात . 
            तिस-या  प्रकारचे पाप धर्मग्रंथांशी संम्बंधित आहे . ह्या ग्रंथांनी आपल्याला धर्म , नियम व धर्माच्या आज्ञा आखून दिल्या आहेत . शास्त्र म्हणजे नुसते वरवरचे नियम नसून पूर्वजांची आपल्याकडे सोपविण्यात आलेली पिढयानपिढयाची शिकवण आहे . धर्म ग्रंथ म्हणजे काय ? मानवाने शास्त्रोक्त जीवन जगण्यासाठी घालून दिलेल्या धार्मिक विधी व नियम या विषयी वचने व आज्ञा असलेले ग्रंथ म्हणजेच धर्म ग्रंथ . उदाहरणार्थ , जन्मापासून निरनिराळी धार्मिक कार्ये काय असतात हे ते सांगतात . मुलाच्या जन्मापासून अकराव्या दिवशी घराची शुद्धी करून नंतरच बारसे केले  जाते. त्या नंतर मुलाचा 'अक्षर अभ्यास ' सुरु होतो . नंतर मुंज आणि त्यानंतर लग्न होते . 
            धर्म ग्रंथांनी जीवनाची प्रत्येक अवस्था नियमांच्या चौकटीत बसवली आहे . जर आपण त्याचे शास्त्रोक्त अनुसरण केले नाही तर शास्त्रे आपल्याला शिक्षा करतील . हे धर्म ग्रंथ दुर्लक्षिणे हे तिस-या प्रकारचे पाप होय . 
            धर्म धर्माचं रक्षण करतो आणि अधर्माचा नाश करतो . तमिळ भाषेत एक म्हण आहे , ' देवाची चक्की संथ पण निः संशय दळतेच . ' मानवी कायदा ताबडतोब शिक्षा करतो . दैवीकायदा अचूक वेळी शिक्षा करतो . जर कोणी धर्माने वागण्यात कुचराई केली तर धर्म त्याचा संहार करतो . 
             ' माय डियर स्टुडंटस् ' ह्या पुस्तकात पान नं. १०४ वर स्वामी म्हणतात , " महान ऋषी , ज्ञानी किंवा संताला दुखावणारी व्यक्ति जगाच्या कल्याणास अडथळा असते . दुःखावेगाने त्यासाधुने क्रोधाचा एक शब्द जरी उच्चारला तरी तो शाप ठरतो ." 
               चवथ्या  प्रकारचे पाप म्हणजे ऋषी , मुनींना त्रास देणे . स्वामींनी मला प्रस्तावनेत या चार प्रकारच्या पापांविषयी लिहिण्यास सांगितले . 
           या पुस्तकात कर्मकायदा  सत्ययुगात कसा कार्य करेल या विषयी लिहिले आहे . जगदोद्धाराच्या  आड येणाऱ्या चौथ्या प्रकारच्या पापीजनांना स्वामींनी उघडकीस आणले . स्वामी म्हणाले , " त्यांना शाप दे , वैकुंठ एकादशीला त्यांच्या प्रतिमा यज्ञ कुंडात जाळून टाक . " 
          मी म्हणाले , " मी हे कसं करू ? मला माहित नाही . " स्वामी म्हणाले , " ते जहरी आहेत . " 
             सत्य युग आता सुरु होत आहे आणि २८ वर्षात ते पूर्णपणे उदयास येईल . त्यावेळी सर्वजण परमेश्वराचे पूर्णत्व अनुभवतील .
                    सत्ययुगाच्या उदयास अडथळा तरी कोणता  आहे ? ह्या पुस्तकातच त्याच विवरण केलं आहे . 
             कृपा करून काळजीपूर्वक वाचा आणि तुमच्या मार्गातील  अडथळे दूर करा . 

संदर्भग्रंथ :- सत्ययुग आणि कर्मकायदा 

      जय साईराम
     सत्यमेव जयते 
    वसंता साई



 प्रिय वाचकांनो ,
            तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला .   तुमचे अभिप्राय तुम्ही mukthinilayammarathi@gmail.com किंवा mukthinilayam@gmail.com या email ID वर कळवू शकता.