ओम श्री साई राम
... स्वामी पुस्तक घेतात ! *
२३ ऑक्टोबर २००७
... स्वामी पुस्तक घेतात ! *
२३ ऑक्टोबर २००७
सकाळचे ६:३० वाजलेत ! भरगच्च भरलेल्या कुलवंतराय मंडपामध्ये मी बसते . अनेक विचार उठतात ... ' हे खरं आहे नं ? मी या पुस्तकात लिहिलेलं सर्व सत्य आहे न ?' काल ध्यानात स्वामी म्हणाले , " तू डॉक्टर बागचींना पुस्तक दे . मी घेईन . "
बराच वेळ झाला ! स्वामी अजून आले नाहीत ! डॉक्टर बागची दिसत नाहीत . मी विचार करते , ' हे काही सत्य नाही .' आम्ही फार दूर बसलो आहोत . मी स्वतःशीच कुजबुजते , ' हे काही सत्य नाही .' माझ्या पुढयात बसलेली भक्त सर्वांना व्यत्यय आणते आहे . मी शांतपणे स्वतःला सांगते , " हे सत्य नाही . हे काही सत्य नाही ."
८ वाजून ५५ मिनिटे झाली आहेत . डॉक्टर बागची येतात आणि व्हरांडयात बसतात . स्वामी कुठे आहेत ? भजन सुरु होतं . माझ हृदय धडधडतंय ! मी रडवेली होऊन स्वामींचा धावा करते . ' स्वामी , प्लीज या ना!' स्वामी गाडीतून येतात . ९ वाजून २२ मिनिटे झाली आहेत . भजन ऐकू येते , ' बाबा ! आवो मेरे कीर्तन में. ' स्वामी व्हरांडयात जातात . स्वामी गाडीतून बाहेर येताच डॉक्टर बागची पुढे सरकतात . त्यांच्या हातात पुस्तक आहे . स्वामी हात वर करून आशीर्वाद देतात . एक भक्त उठतात आणि स्वामींशी बोलतात . नंतर स्वामी डॉक्टर बागचींना बोलावतात . डॉक्टर बागची पुस्तक दाखवताहेत . स्वामींचे दिव्य हात पुस्तक घेतात . माझ्या अश्रूंना उधान येते , तसेच माझ्या बरोबरच्या सर्वांच्या आनंदालाही . ९ वाजून २५ मिनिटे झाली आहेत . भजन चाललंय … ' अंतर ज्योती जालाओ साई … ' स्वामी भजन सभागृहामध्ये जातात . ५ मिनिटां नंतर आरती होते . स्वामी निघतात .
हे सर्व असं घडलं की जणू स्वामी केवळ पुस्तक घ्यायलाच आले होते ! भजन सुरु होता होता डॉक्टर बागचींचं येण , स्वामींचं येण , ' अंतर ज्योती जालाओ साई ' ही ओळ गायली जात असताना स्वामींनी पुस्तकाचा स्वीकार करण , सर्व काही त्या दैवी योजनेचा भाग असच दिसत होतं. भजनाच्या ह्या ओळीचा अर्थ आहे , ' अंतर मनातील ज्योती जागवा . ' माझे स्वामीन मध्ये एक रूप होण्याविषयीचे पुस्तक स्वामींनी माझ्या जन्म दिवशी घेतले . मी ज्योती रूपाने जन्म घेतला आणि ज्योती रूपाने विलीन होणार ! केवळ हेच सत्य आहे. ह्या व्यतिरिक्त काहीही सत्य नाही .
माझी इच्छा होती , माझ्या जन्म दिवशी स्वामींनी माझ्या कडे बघावे आणि आशीर्वाद दयावा . आता मला कळतंय की स्वामींच पुस्तक घेण हाच सर्वात मोठा आशीर्वाद आहे . आता पर्यंत मी बावीस पुस्तके प्रकाशित केली आहेत . हे पहिलं पुस्तक आहे जे स्वामींनी घेतलं. ह्या वरून पुस्तकाचे महत्व जगास दिसून येईल .
श्री वसंता साई
संदर्भग्रंथ :- भगवंताचे अखेरचे ७ दिवस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा