गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१३

                                          ओम श्री साई राम                            
                                    पुष्प चौथे पुढे सुरु

४) सौंदर्य - सौंदर्य  अत्यंत धोकादायक आहे . एक दिवस तुमचे सौंदर्य लोप पावणार आहे . सौंदर्य म्हणजे काय ? साधारणतः सौंदर्य या शब्दातून बाह्य सौंदर्य सूचित होते . तथापि बाह्य सौंदर्य किती काळ टिकेल ? सर्व काही क्षणभंगुर आहे . सौंदर्य तारुण्य काळापर्यंत टिकून राहते . वार्धक्यामध्ये सौंदर्य ओसरू लागते म्हणून बाह्य सौंदर्याचा विचार करू नका . तुमचे लक्ष तुमच्या आंतरिक सौंदर्यावर केंद्रित करा . 
             स्वर्गीय लोकात केवळ अप्सरांसाठी बाह्य सौंदर्य उचित असते . कारण त्या चिरतरुण असतात . पृथ्वीवरील मानवाचे सौंदर्य हे आभाळात चमकून क्षणार्धात अदृश्य होणाऱ्या विजेप्रमाणे असते . म्हणून सौंदर्याचा अहंकार बाळगू नका .
५) तारुण्य - तारुण्य हे क्षणार्धात अदृश्य होणाऱ्या विजेप्रमाणे असते . तारुण्याच्या अहंकाराविषयी बोलतांना स्वामी म्हणतात , " वडीलधाऱ्या  मंडळींचा मान राखा . आजचे तरुण उदयाचे वयस्क आहे . काळ सतत बदलतो आहे . मुल जन्माला येते , तारुण्यात प्रवेश करते , वार्धक्याकडे वाटचाल व अखेरीस मृत्यू पावते . म्हणून कोणीही आपल्या तारुण्याचा अहंकार बाळगू नका . परमेश्वर प्राप्ती हेच केवळ मनुष्याचे ध्येय आहे तथापि परमेश्वराची कृपा असेल तर एखादा चिरतरुण राहू शकतो . मार्कंडेय हे त्याचे उदाहरण आहे . तो सोळाव्या वर्षी मृत्यू पावेल असे त्याला सांगितले गेले . त्या दिवसापासून त्याने उत्कट भक्ती भावाने परमेश्वराची आराधाना केली . त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन परमेश्वराने त्याला सदैव सोळा वर्षे वयाचा  राहण्याचा चिरंजीवी होण्याचा वर दिला . युगा  मागून युग गेली तरी तो सोळा वर्षाचाच चिरतरुण राहिला आदि शंकरांनीही सांगितले होते. सावधान केले होते की तारुण्याचा अहंकार बाळगू नका. स्वामीही तेच सांगतात . 
           एक उदाहरण पाहू या. पुरू नावाचा एक राजा होता. वार्धक्याकडे झुकला असूनही त्याला तारुण्यातील मौजमजा लुटण्याची इच्छा होती. त्याने त्याच्या पुत्रांना विचारले की ते त्यांच्या तारुण्याच्या बदल्यात त्याचे  वार्धक्य घेतील का . चौघापैकी तिघा पुत्रांनी नकार दिला. सर्वात धाकटया मुलाने त्याला संमती दर्शवून वडिलांचे वार्धक्य घेतले . वडिलांनी इतर तीन मुलांना ते शिकारी होतील असा शाप दिला. धाकटा मुलगा वार्धक्यात अनेक हालअपेष्टा सोसत होता. त्याचे वडील तारुण्यातील आनंद उपभोगत होते . बराच कालावधी लोटल्यानंतर त्यानी त्याचे वार्धक्य परत घेतले आणि मुलाला राज्य पद दिले . 
           ह्या कथेतून तारुण्याची आसक्ती दर्शविली आहे . राजाला तारुण्यातील मौजमजा लुटण्याच्या इच्छेखातर तो तीन मुलांना शिकारी बनवतो व धाकटया मुलाला वृद्ध बनवतो . तिन्ही मुलांना शाप देण्या इतकी तसेच धाकटया मुलाचे वृद्धात परिवर्तन करण्याची इतकी सिद्धी शक्ती त्याच्या कडे असते . तथापि ती सिद्धी तारुण्यातील मौजमजा लुटण्यासाठी खर्ची घालतो. जर त्याने ती सर्व शक्ती परमेश्वराकडे वळवली असती तर त्याला अमरत्व प्राप्त झाले असते.  हे लक्षात घ्या. वृद्धत्व येण्यापूर्वी  केवळ थोडी वर्षे तारुण्याचा बहार असतो . यातून कोणीही सुटू शकत नाही .
                    उर्वरित वसंतामृत पुढील भागात ...... 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा