गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०१३


                                                          ओम श्री साई राम

                               सत्ययुग आणि कर्मकायदा

                                          प्रस्तावना

           हे विलक्षण पुस्तक एक नवा विचार आहे. पुस्तक वाचण्यापूर्वी , कृपाकरून प्रस्तावना वाचा म्हणजे तुम्हाला ह्या ' कर्मकायदा '  पुस्तकाचा  विषय समजण्यास सह्यायभूत होईल . 
               कर्म म्हणजे काय ? आपण करीत असलेली प्रत्येक कृतीच कर्म आहे. जर आपण प्रत्येक कृती योग म्हणून भगवंताशी  जोडून केली , तर ती आपल्याला स्पर्श करत नाही ' साई गीता प्रवचनम् ' पुस्तकातील ' कर्मयोग ' या अध्यायात हे  मी स्पष्टपणे मांडले आहे . 
  ममत्वामुळे आपण कर्माशी बांधले जातो . हेच जन्म मृत्युच्या चक्राचे कारण होय . आपल्या मध्ये उत्पन्न होणा-या भावनांचे  विचार बनतात . विचार कृतीत उतरतात.  या कृती  , चांगल्या अथवा वाईट , त्यांचे मनावर ठसे  उमटतात  आणि गहिरे संस्कार  बनू शकतात . हे संस्कार आपला पुढील जन्म ठरवतात. 
          पत्नी, मुले, कुटुंब, मालमत्ता ह्या विषयांच ममत्व माणसाला पुन्हा पुन्हा जन्म घेण्यास कारणीभूत असत . हाच ' कर्म कायदा ' आहे . हे प्रतिबिंब, प्रतिक्रिया आणि प्रतिध्वनीच तत्व आहे . हे माणसाचा पाठलाग करत असते . म्हणूनच कुठलीही कृती सारासार विचार करूनच केली पाहिजे . 
           पाप म्हणजे काय ? एखादी गोष्ट वाईट आहे हे ठाऊक असूनही ती कृती करणे  म्हणजे  पाप. जर तुम्हाला माहित आहे की हे काम वाईट आहे , तर ते घडायलाच नको . तरी सुद्धा जर तुम्ही ते केलत तर ते पाप होईल . प्रत्येकास सद्सद्विवेकबुद्धी  आहे . ती आपल्याला  ' हे वाईट आहे ' असे सांगत असते . असे असतांना आपण पाप का करतो ? त्याला कारण आपला अहंकार , मत्सर आणि क्रोध असतो . हे पाप आहे . 
              साधूला अहंकार किंवा स्वार्थ  नसतो , म्हणून तो पाप कारु शकत नाही. त्याला काहीच बंधने किंवा स्वार्थ नसतात . म्हणूनच कर्म त्याला स्पर्श करत नाहीत . 
           पाप चार प्रकारची असतात . पहिला प्रकार म्हणजे चूक आहे हे जाणूनही केलेले कृत्य . एखादी व्यक्ति जेव्हा देशाचा कायदा , त्याचे नियम , शिस्त  पाळत नाही  तेव्हा ते दुस-या  प्रकारचे पाप होते . राज्य कारभार सुरळीत चालण्यासाठी प्रत्येक देशाचा विशिष्ट कायदा असतो . तो न पाळणा-याल्या शिक्षा होते . जे अप्रामाणिक आहेत  , आपल्या भूमीच्या कायदयाचा अवमान करतात , शहराचे किंवा गावाचे नियम पाळत नाहीत त्यांना शिक्षा भोगावी लागते . हे सर्व मानवी जीवनाचे ढोबळ नियम आहेत.  जे देशाचा कारभार चालावतात , जसं की सरकारी कार्यालये , पोलीस , न्याय संस्था हे सर्व , कायदा अंमलात आणून त्याला आधारही देतात . 
            तिस-या  प्रकारचे पाप धर्मग्रंथांशी संम्बंधित आहे . ह्या ग्रंथांनी आपल्याला धर्म , नियम व धर्माच्या आज्ञा आखून दिल्या आहेत . शास्त्र म्हणजे नुसते वरवरचे नियम नसून पूर्वजांची आपल्याकडे सोपविण्यात आलेली पिढयानपिढयाची शिकवण आहे . धर्म ग्रंथ म्हणजे काय ? मानवाने शास्त्रोक्त जीवन जगण्यासाठी घालून दिलेल्या धार्मिक विधी व नियम या विषयी वचने व आज्ञा असलेले ग्रंथ म्हणजेच धर्म ग्रंथ . उदाहरणार्थ , जन्मापासून निरनिराळी धार्मिक कार्ये काय असतात हे ते सांगतात . मुलाच्या जन्मापासून अकराव्या दिवशी घराची शुद्धी करून नंतरच बारसे केले  जाते. त्या नंतर मुलाचा 'अक्षर अभ्यास ' सुरु होतो . नंतर मुंज आणि त्यानंतर लग्न होते . 
            धर्म ग्रंथांनी जीवनाची प्रत्येक अवस्था नियमांच्या चौकटीत बसवली आहे . जर आपण त्याचे शास्त्रोक्त अनुसरण केले नाही तर शास्त्रे आपल्याला शिक्षा करतील . हे धर्म ग्रंथ दुर्लक्षिणे हे तिस-या प्रकारचे पाप होय . 
            धर्म धर्माचं रक्षण करतो आणि अधर्माचा नाश करतो . तमिळ भाषेत एक म्हण आहे , ' देवाची चक्की संथ पण निः संशय दळतेच . ' मानवी कायदा ताबडतोब शिक्षा करतो . दैवीकायदा अचूक वेळी शिक्षा करतो . जर कोणी धर्माने वागण्यात कुचराई केली तर धर्म त्याचा संहार करतो . 
             ' माय डियर स्टुडंटस् ' ह्या पुस्तकात पान नं. १०४ वर स्वामी म्हणतात , " महान ऋषी , ज्ञानी किंवा संताला दुखावणारी व्यक्ति जगाच्या कल्याणास अडथळा असते . दुःखावेगाने त्यासाधुने क्रोधाचा एक शब्द जरी उच्चारला तरी तो शाप ठरतो ." 
               चवथ्या  प्रकारचे पाप म्हणजे ऋषी , मुनींना त्रास देणे . स्वामींनी मला प्रस्तावनेत या चार प्रकारच्या पापांविषयी लिहिण्यास सांगितले . 
           या पुस्तकात कर्मकायदा  सत्ययुगात कसा कार्य करेल या विषयी लिहिले आहे . जगदोद्धाराच्या  आड येणाऱ्या चौथ्या प्रकारच्या पापीजनांना स्वामींनी उघडकीस आणले . स्वामी म्हणाले , " त्यांना शाप दे , वैकुंठ एकादशीला त्यांच्या प्रतिमा यज्ञ कुंडात जाळून टाक . " 
          मी म्हणाले , " मी हे कसं करू ? मला माहित नाही . " स्वामी म्हणाले , " ते जहरी आहेत . " 
             सत्य युग आता सुरु होत आहे आणि २८ वर्षात ते पूर्णपणे उदयास येईल . त्यावेळी सर्वजण परमेश्वराचे पूर्णत्व अनुभवतील .
                    सत्ययुगाच्या उदयास अडथळा तरी कोणता  आहे ? ह्या पुस्तकातच त्याच विवरण केलं आहे . 
             कृपा करून काळजीपूर्वक वाचा आणि तुमच्या मार्गातील  अडथळे दूर करा . 

संदर्भग्रंथ :- सत्ययुग आणि कर्मकायदा 

      जय साईराम
     सत्यमेव जयते 
    वसंता साई



 प्रिय वाचकांनो ,
            तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला .   तुमचे अभिप्राय तुम्ही mukthinilayammarathi@gmail.com किंवा mukthinilayam@gmail.com या email ID वर कळवू शकता.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा