ओम श्री साई राम
वसंतामृतमाला
चतुर राजा ! ( पुष्प चौथे )
" मी आत्मा आहे. परमेश्वरामध्ये विलिन होण्यासाठी मला जन्म दिला गेला आहे . "
प्रत्येकाने अशा तऱ्हेने चिंतन करून स्वतः मध्ये परिवर्तन घडवले पाहिजे . आपण आत्म्याचे सत्य जाणले पाहिजे . हे शिकवण्यासाठीच हा महाअवतार येथे आला .
आता पुरे ! उठा ! जागे व्हा ! तुम्ही देह नाही !
देहभावामधुनच ' मी आणि माझे ' उत्पन्न होते . मनुष्य जास्तीत जास्त धन संपत्तीची आकांक्षा करतो . त्याला इतरांचे अनुकरण करण्याची इच्छा असते . त्यातून क्रोध आणि मत्सर त्याच्या अंतरंगात शिरकाव करतात . तथापि ज्यावेळी तो देह त्याग करतो तेव्हा तो बरोबर काहीही घेऊन जात नाही. कोण पत्नी ? कोण पुत्र ? वाल्मिकींच्या कथेद्वारे हे सत्य दर्शवण्यात आले आहे .
रत्नाकर अनेकांची हत्या करून त्यांच्या जवळील पैसा अडका लुटून आपल्या कुटुंबाची गुजराण करत असे . एक दिवस नारद मुनी येऊन त्याला सांगतात , " तू तुझ्या कुटुंबाला विचार की ते तू लुटलेल्या संपत्तीत भागीदार होतात . परंतु ते तुझ्या पापात भागीदार होतील का ? " ते उत्तरतात , " कुटुंबाचा चरितार्थ चालवणे हे तुझे कर्तव्य आहे . आम्ही तुझ्या पापात वाटेकरी होणार नाही ." हे ऐकल्यानंतर रत्नाकरचे डोळे उघडतात व त्याला आपली चूक समजते . तो तप करतो आणि वाल्मिकी बनतो . त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी कठोर परिश्रम केलेत तरी तुमच्या पापामध्ये कोणीही वाटेकरी होणार नाही . काम , क्रोध , मोह , लोभ , मद , मत्सर देहभावामधुन येणारे पापकारक षडरिपू आहेत . हे षडरिपू आपल्या मधून काढून टाकण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे . यासाठी देह भाव नष्ट करायला हवा . मी आत्मा आहे असा घोष करा . देह आणि देहाशी संबंधित जे काही आहे ते माझ्या सत्य स्वरूपाशी संबंधित नाही . अशा तऱ्हेने तुम्ही चिंतन केले पाहिजे .
अष्टाहंकार
स्वामींनी एका कागदावर लिहून दिले , " हे आठ प्रकारचे अहंकार ओळखा . त्या अहंकारांना पायदळी तुडवा . कुटुंब , संपत्ती , सौंदर्य , तारुण्य , विद्वत्ता , जन्मस्थान आणि आध्यात्मात व्रतवैकल्य पूर्ती यातून अहंकार उत्पन्न होतो .
आणि पुन्हा ...........
आपले आत्मस्वरूप म्हणजेच परमेश्वर अहंकाराच्या पडद्याने झाकले जाते.
आता आपण ह्या अष्टाहंकारांविषयी पाहू या . स्वामी म्हणतात तुम्ही या अहंकारांना पायदळी तुडवा . ते हे कठोर शब्दात सांगत आहेत . वडील मुलांवर प्रेमाचा वर्षाव करतात परंतु जेव्हा मुले चूका करतात ते कठोर होऊन कडक शब्दात कान उघडणी करतात . स्वामी प्रेमस्वरूप आहेत . परंतु चुकीच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्या मुलांशी ते कठोरपणे वागतात . आता आपण आठ प्रकारच्या अहंकारान विषयी पाहू .
१) कुटुंब - आसक्तीची सुरुवात कुटुंबातून होते - प्रथम पत्नी नंतर मुले , नातवंडे आणि पतवंडे . अशा तऱ्हेने आसक्ती वाढत जाऊन मनुष्यावर घट्ट पकड घेते . काही दिवसांपूर्वी मी स्वामींच्या पुस्तकातील एक गोष्ट वाचली .
" एकदा एक राजा तप करतो . त्याच्या तपाने प्रसन्न होऊन परमेश्वर त्याच्या समोर प्रकट होतो आणि विचारतो की त्याला काय हवे . राजा म्हणतो , " मला माझ्या पतवंडाचा राज्याभिषेक सोहळा पहायचा आहे !"
स्वामी हे सांगून त्या राजाच्या वर मागण्याच्या चतुराई विषयी आश्चर्य व्यक्त करतात. या एका वरात सर्व सामावले आहे . प्रथम त्या राजाला मुलगा असायला हवा त्या नंतर त्याच्या मुलाला मुलगा व्हायला हवा आणि त्या नंतर त्याच्या नातवाला मुलगा व्हायला हवा . त्या सर्वांना राज्य पद मिळायला हव. त्याचे राज्य अबाधित राहायला हवे आणि हे सर्व पाहण्यासाठी राजाची प्रकृती चांगली राहायला हवी !
संपत्ती , नाव , लौकिक , वारस ह्या सर्व इच्छा या एका वरामध्ये अंतर्भूत आहेत . एका माणसाच्या मनात किती इच्छा असतात हे स्वामी या गोष्टीतून दर्शवत आहेत ! राजाने हा वर मागितला म्हणजे त्याच्या वंशातील सर्वांना राज्य पद प्राप्त होईल . प्रत्यक्ष परमेश्वर त्याच्या समोर प्रकट झाला असे असूनही त्याच्या इच्छा वासनांमुळे त्याने असा वर मागितला . कुचेला अत्यंत दरिद्री होता व तो परमेश्वराच्या शोधार्थ निघाला . परमेश्वराचे दर्शनाने झालेल्या अतीव आनंदाच्या भरात तो त्याच्या कडे काही मागायचेच विसरला. अशा तऱ्हेने आपण धनवान किंवा राजघराण्यात जन्म झाल्याच्या अहंकाराचे वा गर्वाचे उच्चाटन करायला हवे .
२) संपत्ती - धन संपत्तीचा अहंकार अत्यंत वाईट असतो . सर्व काही नाशवंत आहे . संपत्तीही शाश्वत नाही. आजचा भिकारी उदयाचा लक्षाधीश असेल किंवा आजचा लक्षाधीश उदया भिकारी असेल . स्वामी हे बऱ्याचवेळा सांगतात . धनाचा अहंकार अत्यंत वाईट गुण आहे . धनवान लोक बऱ्याचदा इतरांचा मान ठेवत नाहीत . धनसंपत्तीव्दारे कोणीही परमेश्वर प्राप्त करून घेऊ शकत नाही . येथे केवळ विनम्रता आवश्यक आहे . महालक्ष्मी ही समस्त धनसंपदेची देवता आहे . असे असूनही तिला केवळ महा विष्णूनच्या पद्सेवेची इच्छा असते . नवविधा भक्ती मार्गाचे वर्णन करतांना स्वामी पदसेवा करणाऱ्या महालक्ष्मीचे उदाहरण देतात .
३) चारित्र्य - प्रत्येकाने सदगुण आत्मसात करावेत . परंतु सदगुण संपन्न असण्याचा अहंकार बाळगणे अत्यंत वाईट आहे . विनोबाजींनी भगवद गीतेवर लिहिलेल्या प्रबंधात असे सांगितले आहे .
' वाईट मनुष्य सदगुण संपन्न व सदगृहस्थ असल्याचा अहंकार बाळगणाऱ्या माणसापेक्षा बरा .
याचा अर्थ असा नाही की मी दुर्गुणांना उत्तेजन देतेय किंवा उचलून धरतेय . जर एखाद्याकडे चांगले गुण असतील ज्याचा त्याला अहंकार असेल तर ते दुर्गुणी व्यक्ति पेक्षा अधिक वाईट आहे . अहंकार किती घातक आहे हे दर्शवण्यासाठी विनोबाजी उदाहरण देतात . आपण सदगुणी आहोत याची त्या व्यक्तीस जाणीवही नसावी . जेव्हा एखाद्याकडे एवढी विनम्रता असेल तेव्हाच अहंकार उदभवणार नाही . एकदा धर्म राजाला जगातील एक वाईट व्यक्ति शोधण्यास सांगितले गेले . काही वेळाने तो परत आला आणि म्हणाला , " मी अखिल विश्वात शोध घेतला . परंतु सर्वजण चांगले आहेत. मी एकटाच वाईट आहे . " धर्मराज हा धर्माचे पालन करणारा राजा म्हणून ओळखला जातो . तथापि त्याचा स्वतः विषयीचा दृष्टीकोन पूर्णपणे वेगळा होता . त्याच्या दृष्टीकोनातून जगातील सर्वजण चांगले होते व केवळ तो एकटा वाईट होता . तो स्वतः एक सदगुणी व्यक्ति आहे हे तो विसरला . जर त्याच्या एवढी विनम्रता असेल तर अहंकाराचा उदभव होणार नाही . जरी तो सर्वगुण संपन्न राजा असला तरी त्याला अजिबात अहंकार नव्हता . जे सदगुणी आहेत त्यांनी या मर्यादेपर्यंत अहंकार रहित असायला हवे .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा