ओम श्री साई राम
अमृत संवत्सर
माँ
श्री वसंता साई माँ (२ )
अम्मा ! अखिल विश्वातील समस्त भक्तांकडून ह्या कविता आपल्या सुवर्ण चरण कमली अमृत वर्षात पदार्पणानिमित्य हे समर्पण .
अमृत संवत्सर
डोळ्यात प्राण आणुनी
प्रतीक्षा करत होतो आम्ही
तुझ्या पदार्पणाची , या मंगल वर्षात
उजाडली आज पहाट , त्या अमृत वर्षाची
ऋषीमुनी सांगती नाडी ग्रंथात
बोलावतील स्वामी तुज या शुभ संवत्सरात
ती मंगल घटिका नाही दूर
येता नूतन देहधारी श्री सत्य साईश्वर
दीर्घ प्रतिक्षेची तुझ्या होईल अखेर , होईल अखेर
जगद्जननी आहेस तू , सांगतील स्वामी जगासमोर
होतील नतमस्तक सारे तुझ्या कमल चरणांवर
कलियुगाचा अस्त अन सत्ययुगाची पहाट
साई वसंतेचा जयजयकार दुमदुमेल अखिल विश्वात
माँ
श्री वसंता साई माँ (२ )
प्रेम
स्वरूपिणी माँ
शांती
दायिनी माँ
दुःख निवारिणी माँ
हृदयस्पर्शी माँ
आनंद दायिनी माँ
श्री वसंता साई माँ (२ )
ज्ञान दायिनी माँ
आत्म स्वरूपिणी माँ
शक्ती प्रदायीनी माँ
अंर्तयामिनी माँ
दिव्य स्वरूपिणी माँ
श्री वसंता साई माँ (२)
सद्गुण संपन्न माँ
जगद्धो धारिणी माँ
विश्व मुक्ती प्रदायिनी माँ
श्री वसंता साई माँ
साई राम
श्री वसंता साई माँ (२)
सद्गुण संपन्न माँ
जगद्धो धारिणी माँ
विश्व मुक्ती प्रदायिनी माँ
श्री वसंता साई माँ
साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा