पुष्प तिसरे पुढे सुरु
दुस-या विभागात स्वामींनी लिहिले आहे .
दुस-या विभागात स्वामींनी लिहिले आहे .
.......अहंकार हा देहा द्वारे ओळखला जातो. तो देहभावाशी निगडीत असतो . अग्निला वेढणाऱ्या धुराप्रमाणे अहंकार आपल्यास वेढून टाकतो त्यामुळे आपण आपले सत्यदिव्य स्वरूप पाहू शकत नाही . अहंकाराने आपले उदात्त स्वरूप जाऊन ते खालच्या पातळीवर येते .
अहंकार हा देहाशी आणि देहभाव असणा-यांशी निगडीत असतो यातूनच ' मी आणि माझे ' याचा उदभव होतो . देहाशी संबंधित असणा-या सर्व गोष्टींशी आपण आपल्याला जोडतो या मधून क्रोध , मत्सर आणि इतर सर्व दुर्गुण येतात . देहभावा मधूनच काम , क्रोध , लोभ , मोह , मद , मत्सर हे षड् रिपू आपल्या मध्ये येतात . ज्या प्रमाणे धूर अग्निला झोकाळून टाकतो त्याप्रमाणे हे षड् रिपू आपल्याला झाकून टाकतात. त्यामुळे आपण आपले खरे स्वरूप जाणू शकत नाही . आपले खरे स्वरूप कोणते ? आपण अमर आहोत . स्वामी आपल्याला ' हे अमर पुत्रांनो ' असे संबोधतात . अमरत्व हे आपले सत्य स्वरूप आहे . हे खरे स्वरूप झाकले गेल्याने आपल्याला अमरत्व स्थिती प्राप्त होऊ शकत नाही . देहभावाशी तादात्म्य पावल्यामुळे आपण पुन्हा पुन्हा जन्म मृत्युच्या फे-यात अडकतो. जर आपण आपले खरे स्वरूप जाणले तर आपल्याला पुन्हा जन्म नाही , मोक्ष प्राप्ती होईल . हे जोपर्यंत आपण जाणत नाही तो पर्यंत पुन्हा पुन्हा जन्म मृत्यु अटळ आहे . हे सत्य ज्ञात होईपर्यंत जन्म मृत्युचे चक्र थांबणार नाही . अन्यथा आपल्याला हळूहळू क्रम मुक्ती मार्गाद्वारे मोक्ष प्राप्ती होईल.
सर्व जण केवळ देहभावाशी तादात्म्य साधतात . सर्व भौतिक गोष्टींशी स्वतःला बांधून घेतात . पत्नी , मुले , नातेवाईक , धन , पद , प्रतिष्ठा अशा त-हेने जीवन चक्र चालू राहते . जरी एखादा त्याचा देहभाव विसरला तर बाकीचे त्याला तसे करू देत नाहीत .
एक उदाहरण देते . एका व्यक्तीला एक मुलगा आहे. तो अविवाहित आहे . त्याचा एक मित्र त्याला विचारतो , ' तुझा मुलगा आता मोठा झालाय , तू त्याच्या लग्नाचे बघत नाहीस का ? तू तुझ्या मुलीच्या लग्नासाठीही प्रयत्न करत नाहीस ? त्या मुलाचे वय पाहून तो मित्र वडीलांच्या मनात त्याच्या मुलाच्या व मुलीच्या लग्नाचे विचार जागृत करतो . त्यांची लग्न होऊन एक वर्ष झाल्या नंतर तोच मित्र विचारतो , " तुझ्या मुलाला आणि मुलीला अजून अपत्य प्राप्ती झाली नाही का ?" अशाप्रकारे आपल्या मुलांची लग्न करून देणे हे आपले कर्तव्य आहे असे पालकांना वाटते . जर पालक या बाबतीत काहीही न करता स्वस्थ बसले तर ते जणू फार मोठे पाप करत आहेत असे इतरांना वाटते . हे जग खरोखरच किती विचित्र आहे ? युगानुयुगे केवळ ' माझे मुल आणि लग्न ' या दोन गोष्टी प्रत्येक मनुष्याच्या मनात खोलवर कोरल्या गेल्या आहेत . त्याला जास्तीत जास्त महत्व दिले गेले आहे . समाज मनुष्याला दुस-या मार्गांचा अवलंब करू देत नाही . देहभावामुळे मनुष्य पुन्हा पुन्हा जन्मतो आणि मृत्यु पावतो. इथे सर्वांना विवाह आणि अपत्य प्राप्तीची सक्ती आहे .
जय साई राम
व्ही. एस.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा