ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
"प्रत्येक दिवस नूतन आहे , प्रत्येक तास , मिनिट , आणि सेकंद नूतन आहे . प्रत्येक क्षण आनंदात साजरा करा ".
अमृत
कण
येणाऱ्या नवीन वर्षात आनंदाची प्राप्ती कशी करून घ्याल ?
येणाऱ्या नवीन वर्षात काय घडेल हा विचार करण्यात तुम्ही वेळ वाया घालवू
नका . जर तुमची कर्म चांगली असतील तर निश्चितच तुमचे भविष्य उज्वल असेल .
राष्ट्राचे भवितव्य तुमच्या कृतींवर अवलंबून आहे . परमेश्वर सर्व साक्षी
आहे . ना तो तुमचे रक्षण करतो ना तो तुम्हाला शिक्षा करतो !प्रत्येक जण
आपआपल्या सुख दुःखास जबाबदार असतो . या नवीन वर्षात मनामध्ये सदभाव जागृत करून सर्वांना आनंद द्या . धनअर्जित करण्याच्या मागे न धावता तुमच्या
प्रेमाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा . एकदा का तुमचे
प्रेम विस्तार पावले की क्रोध , मत्सर या सारख्या दुर्गुणांना तेथे थारा
मिळणार नाही . जर तुमचे विचार आणि कृती चांगल्या असतील तर तुमचे भविष्य
उज्वल असेल . केवळ तुमचे नव्हे तर अखिल विश्व समृद्ध होईल . अखिल विश्वात
शांती व समृद्धी नांदो . या साठी प्रार्थना करा . केवळ मानवी आचरणाद्वारे शांती प्राप्त होईल .
५ एप्रिल २००८ च्या स्वामींच्या प्रवचनातून .
पुष्प नववे पुढे सुरु
मी स्त्री आहे का ? नाही ! नाही ! मी स्त्री आहे या विचाराने त्यांनी मला दर्शनाची परवानगी नाकारली . मला आत येऊ दिले नाही . परमेश्वर पुरुष आहे आणि परमेश्वरावर प्रेमकरणारी स्त्री आहे . किती विचित्र जग आहे . हे जग स्त्री पुरुष संबंधाशिवाय दुसरे काहीही जाणत नाही . ते परमेश्वरालाही त्याच तराजूत तोलतात . हा त्यांचा दृष्टीकोन आहे . मी स्त्री असल्यामुळे त्यांनी मला एखादया स्वानासारखे हुसकावून लावले ! नाही , नाही ! अरेरे ! मी स्त्री नाही . कृपया मला एकटीला राहू दया .
संत कॅथरीनसारखाच माझा छळ करण्यात
आला . स्त्रीचा जन्म घेतलेले संत होऊ शकत नाही का ? स्त्रीला संत पद प्राप्त करण्याचा अधिकार नाही का ? खरच तिला अधिकार नाही का ? स्त्री सर्वसंगपरित्याग करू शकत नाही का ? स्वामी येथे स्त्रीत्वाची महानता दर्शवण्यासाठी आले . म्हणून आम्ही जगात सत्य युग आणले . स्वामी ते वसंतमयम बनवणार आहेत . आता मला कोण हुसकावेल ? तुम्ही सत्य साई आहात . ज्या वसंतेला तुम्ही हुसकावून लावली ती तुमची आई , पत्नी आणि कन्या आहे ! म्हणून कोण तुम्हाला हुसकावेल ?
मी कोण आहे ? माझ्या वर्णनासाठी केवळ एक शब्द पुरेसा आहे .मी स्वामींच्या चरणांखालची धूळ आहे . स्वामी , हा मानवी जन्म पुरे ! हे जग आणि या जगातील सर्वजण माझ्यासाठी अपरिचित आहे , मी त्यांच्याशी आणि त्यांच्या गुणांशी परिचित नाही . मला दडण्यासाठी केवळ एक स्थान आहे आणि ते म्हणजे तुमच्या चरणांखाली . तिथे मला कोणीही पाहू शकणार नाही .
स्वामींनी मला १०८ संस्कृत नामे , १०८ तमिळ नामे आणि ८९ देहाशी संबंधित नामे दिली . त्या सर्वांमधील एक नाव मला हवे आहे . ' साई पाद धुलिकायै ' स्वामींच्या चरणाखालची धूळ . मला या खेरीज दुसरे काही नको , इतर सर्व नामे मी त्यांची शक्ती असल्याचे दर्शवतात . नाही ! मी शक्ती नाही. मला केवळ त्यांच्या चरणाखालची धूळ बनायचे आहे . केवळ हे एक स्थान असे आहे जिथे जगाच्या नजरेपासून मी सुरक्षित असेन आणि कोणीही मला पाहू शकणार नाही .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ….
टीप :- श्री वसंता साई लिखित ' Miracle Maya ' हे इंग्रजी पुस्तक वाचकांसाठी मराठी भाषेतून ' चमत्कार माया ' या नावाने प्रकाशित झाले आहे . संपर्कासाठी भ्रमनध्वनी क्रमांक - ९८९०२९४५२९.
सर्व वाचकांना नवीन वर्ष सुखसामृधीचे , आनंदमय व आरोग्यदायी जावो .
जय साई राम
व्ही. एस.
व्ही. एस.