रविवार, ३० मार्च, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

" परमेश्वरावर प्रेम करा . त्याचा ध्यास घ्या . तुम्हाला फक्त तो आणि तोच हवा आहे , हे त्याला सांगा ".

    वसंतामृतमाला


        पुष्प सोळावे 
     ( पंधराव्या पुष्पावरून पुढे सुरु ) 
     विश्व ब्रह्माची कूस


          वयाच्या ३० व्या वर्षी स्वामींनी मानवतेला एक गंभीर इशारा दिला . ते म्हणाले मनुष्य परमेश्वराला त्याच्या भौतिक , सांसारिक चष्म्यातून पाहतो.  मनुष्याची कल्पना अशी असते की परमेश्वर त्याच्या सारखाच आहे. तो ही शुल्लक इच्छांची पूर्ती , पत्नी ,   कुटुंब आणि अपत्य यांच्या शोधात जातो त्याचे ही आपल्या सारखेच पत्नी व कुटुंब आहे असे मानून मनुष्य त्या भोवती कथा रचतो . ' परमेश्वर त्याची पत्नी आणि मुले ' ही संकल्पना मनुष्याच्या मनात युगानुयुगे आहे . याचे कारण मनुष्य भौतिक जीवनाचा चष्मा घालून सर्व काही पाहतो . जे निळा चष्मा घालतात त्यांना सर्व निळे दिसते . जे पिवळा घालतात त्यांना  सर्व जग पिवळे दिसते . याचप्रमाणे मनुष्य भौतिक चष्म्यातून परमेश्वराला पाहतो . 
            हा दृष्टीकोन बदलण्यासाठी परमेश्वर येथे आला आहे . याचे प्रात्यक्षिक करण्यासाठी मला त्याने येथे आणले आहे . तो महामहीम परमेश्वर आहे , आदिमूलम आहे . त्याच्या कृपेला व करुणेला त्याने माझे रूप देऊन इथे आणले आहे . मानवतेचे दुःखभोग पाहून आम्ही येथे आलो आहोत .  तसेच त्यांना एकदा मुक्तीच्या आनंदाची अनुभूती देण्यासाठी आलो आहोत . माझा जन्म स्वामींमधून झाला . त्यामुळे मी सदैव अश्रू ढाळते आणि विलाप करते . तथापि स्वामींनी प्रत्यक्ष मला कधीही पाहिले नाही , माझ्याशी संभाषण केले नाही वा मला स्पर्श केला नाही . जे काही घडते ते केवळ ध्यानामध्ये . ५८ वर्षे मी परमेश्वरासाठी करूण विलाप करते आहे . १९९६ मध्ये त्यांनी माझ्याशी ध्यानात संभाषण करण्यास सुरुवात केली . त्यांनी मला माझे अनुभव कथित करणारे ' इथेच ! या क्षणी !! मुक्ती !!! ' हे पुस्तक लिहिण्यास सांगितले . त्यांनी स्वतः पुस्तकाच्या प्रतीवर स्वाक्षरी करून ते प्रकाशित केले . या दरम्यानच स्वामींनी संपूर्ण विश्व माझ्या उदरात ठेवले आणि ते म्हणाले की त्यांच्या आणि माझ्या पोटी नवनिर्मितीचा जन्म होईल . 
         त्यानंतर मी ' भगवंताचे अखेरचे सात दिवस '  हे पुस्तक लिहिले . स्वामींनी स्वहस्ते त्याचा स्वीकार केला . त्या पुस्तकात मी लिहिले की स्वामी माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधतील त्यांनतर माझी काया त्यांच्या देहात विलीन होईल . त्यावेळी एका व्यक्तीने माझ्या दुसऱ्या पुस्तकातील काही भाग दाखवून म्हटले, ' राधा कृष्ण विश्वगर्भ ' . त्यानंतर त्याने मला प्रशांती निलयममध्ये पुन्हा पाऊल टाकू नये असे बजावले .

उर्वरित वसंतामृत पुढील भागात…

जय साई राम
 
               

गुरुवार, २७ मार्च, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" निरंतर ईशचिंतन हीच खरी भक्ती ". 

पुष्प पंधरावे पुढे सुरु 

           शिवाने त्यांचे अर्धे शरीर पार्वतीला का दिले ? कारण त्या दोन वेगवेगळ्या शक्ति एकाच देहातून कार्यरत आहेत . शक्ती मूलाधारात वास करते आणि शिव आज्ञा चक्रात . त्या दोघांचा संयोग म्हणजे मुक्ती.   हे शिवशक्ती तत्व दर्शवते . हे देहामध्ये घडते . एका देहात दोन शक्ती वास करतात . एक अनिष्ट गोष्टींचा नाश करते आणि दुसरी तपशक्ती . हे शिव आणि शक्ती आहेत .  
           आता महाविष्णूंचे तत्व पाहू या . ते पालनकर्ता आहेत .  महालक्ष्मी या कार्यात त्यांना मदत करते .   संकटकाळी मनुष्य देवाची प्रार्थना करतो . जेव्हा तो कळकळून , अंतःकरणपूर्वक भगवंताची प्रार्थना करतो तेव्हा त्याची कृपा धावून येते मग तो कोणीही असो , कोठेही असो वा प्रार्थना कोणत्याही कारणास्तव् असो . त्याची कृपा त्यांना प्राप्त होते . हे मन आणि भाव यांच्याशी संबंधित आहे . त्यांच्या कृपेला महालक्ष्मीचे नाम आणि रूप देण्यात आले आहे .  
          महालक्ष्मीचे स्थान महाविष्णुंच्या वक्षस्थली का आहे ? कारण कृपा अंतःकरणातून , हृदयातून येते .   मनुष्याच्या हाकेला कृपा धावून येते . महाविष्णु हे सृष्टीचे पालन पोषण करणाऱ्या देवाचे रूप आहे .   संकटकाळात , दुःखात वा आजारपणात मनुष्याने केलेल्या अंतःकरणपूर्वक प्रार्थनेने त्याच्या हृदयातील निद्रिस्त परमेश्वर जागा होऊन त्याच्यावर कृपेचा वर्षाव करतो व त्यांच्या दुःखाचे परिमार्जन करतो .   महाविष्णु सर्वांच्या हृदयात निवास करतात व तेथून ते सर्वांचे पालन पोषण करतात . सर्वांचे हृदय म्हणजे क्षीरसागर होय . तेथे महाविष्णु योगनिद्रेत पहुडले आहेत . विवेक बुद्धीने आपण आपल्या हृदयाचे समुद्र मंथन केले पाहिजे . हे विश्व खरे नसून भ्रम आहे , माया आहे . मृत्युसमयी आपल्या बरोबर काहीही येत नाही .  आपले मन ईश्वराभिमुख करून जेव्हा आपण पुन्हा पुन्हा यावर चिंतन करू तेव्हा त्याच्या कृपेचा ओघ आपल्याकडे वळेल . हीच महालक्ष्मी आहे .  
           जसे समुद्र मंथनानंतर प्रथम हलाहल बाहेर आले . त्याचप्रमाणे जेव्हा आपण साधना करतो तेव्हा आपल्यातील दुर्गुण दूर केले जातात . समुद्रमंथनातून सर्वात शेवटी बाहेर आली महालक्ष्मी . जेव्हा सर्व दुर्गुण नष्ट होतात तेव्हा परमेश्वरी कृपा म्हणजेच महालक्ष्मी हातात माला घेऊन दृश्यमान होते . मनुष्य म्हणजे महाविष्णु . जेव्हा तो साधनेद्वारे त्याच्या सर्व दुर्गुणांचा नाश करतो तेव्हा त्याला कृपा प्राप्त होते . ही कृपा म्हणजेच महालक्ष्मी होय . ती मनुष्याच्या गळ्यात मुक्तीची माला घालते व भवरोगामधून त्याची सुटका करते . तो परमेश्वरामध्ये विलीन होतो . स्वामींचे अवतार कार्य याचा निर्देश करते .

… 
 व्ही. एस. 
    
जय साई राम
    

रविवार, २३ मार्च, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

     " भक्ती हा परिपूर्णतेकडे जाणाऱ्या आत्म्याचा प्रवास आहे . सदैव ईश्वरचिंतनात लीन ही खरी भक्ती होय ".

पुष्प पंधरावे पुढे सुरु

          यासाठीच पूर्वीच्या काळी चार आश्रमांची स्थापना केली गेली . ब्रम्हचर्य , गृहस्थ , वानप्रस्थ आणि संन्यास हे चार आश्रम होत . प्रथम मनुष्याने मन आणि इंद्रियांवर ताबा मिळवायला हवा . म्हणून सर्वांवर नियंत्रण कसे मिळवावे आणि या जगात उचित जीवन कसे जगावे हे शिकवले जाई . सर्वजण सद्गुण अंगी बाणवून मगच भौतिक जीवनात प्रवेश करत , नंतर विवाह करत . अनासक्त राहून आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत . त्यानंतर ते वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करत . यामध्ये ते त्यांची कर्तव्ये आणि कौटुंबिक बंध या सर्वांचा त्याग करत . त्यानंतर संन्यस्त जीवनाकडे , संन्यास या चौथ्या आश्रमाकडे वाटचाल करत . 
          आज मनुष्याने ही जीवन प्रणाली सोडून दिली असून तो मन मानेल त्याप्रमाणे जीवन जगतो आहे . त्याच्या अंगी शिस्त वा आत्मसंयमन नाही . शिस्त लावणे आणि ज्ञानदान हे सरस्वतीचे कार्य आहे . हे ब्रम्हा आणि सरस्वती या दोघांचे कार्य आहे . प्रत्येक पुरुष आणि स्त्री ब्रम्हा आहेत . त्यांचे ज्ञान सरस्वती आहे . ज्ञान आणि बोधरहित जीवन हे पशुजीवनासमान आहे . म्हणून सर्वांनी भारतीय संस्कृतीचे अनुसरण केले पाहिजे . 
          पुढचा मुद्दा - शिव शक्ती . संहारकर्ता म्हणून शिवाचे पूजन केले जाते . पार्वती ही शिवाची अर्धांगिनी आहे . शिव आणि शक्ती हे कोणी पुरुष आणि स्त्री नव्हेत . शिव आणि शक्ती हे रूपक आहे जे जगाला तप आणि कामदहन याविषयी निर्देश करते . भगवान शंकराने कामदहन केले . विवाहापूर्वी कामदहन करणे गरजेचे आहे . अशा तऱ्हेने शिव हे नितीतत्व शिकवतात . पार्वती हे तपाचे प्रतिक आहे . सर्व इच्छांचा नाश करण्यासाठी ती तप आणि साधना करते . सर्व भौतिक इच्छांचा नाश  झाल्यानंतरच त्यांचा विवाह होतो . तसे न केल्यास पुन्हा जन्म अटळ आहे . शिव संहारकर्ता आहे याचा हा अर्थ आहे . आपण साधना करून शिखर गाठतो . याचा अर्थ सर्वांमध्ये असणाऱ्या मूलाधार शक्तीचा आज्ञा चक्रात असणाऱ्या शिवाशी संयोग होतो . यानंतर जन्म मृत्यूचे चक्र थांबते . 
            माझा जन्म का झाला ? माझा जन्म आणि माझ्या जीवनातील  दुःख यामागे नेमके काय कारण असावे ? यावर मनुष्याने चिंतन केले पाहिजे . अशा तऱ्हेने चिंतन करून आसक्ती , इच्छा आणि ' मी व माझे ' भाव या सर्वांचा नाश केला पाहिजे . असे केल्यानंतर एका मागोमाग एक ज्ञानाची कवाडे खुली होतात . तुम्ही प्रत्येकजण शिव आहात . तुम्ही तुमच्यामधील दुर्गुणांचा नाश केला पाहिजे . यासाठी तुम्हाला सोबत करते तुमची साधना . हेच तप आहे . तुमच्या दुर्गुणांचा नाश करणारे तुम्ही शिव आणि तुमची साधना म्हणजेच तुमची शक्ती , पार्वती . या दोघांचा संयोग हा विवाह अथवा मुक्ती होय . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .......

जय साई राम 
     

गुरुवार, २० मार्च, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " भक्तांसाठी तो निर्गुण निराकार परमेश्वर अनेक रूपे धारण करतो .  भक्तांच्या स्थायीभावानुसार ती रूपे वेगवेगळी असतात ". 

पुष्प पंधरावे पुढे सुरु 

           स्वामी आता पुन्हा नव्याने येतील आणि स्वहस्ते माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधतील . महालक्ष्मीसाठी मंगळसूत्र का नाही ? आज अमरने मला वाचण्यासाठी सत्य साई स्पीकस् भाग १ माझ्यापुढे ठेवला . दररोज दुपारच्या ध्यानानंतर माझ्यासाठी ठेवलेले स्वामींचे पुस्तक मी वाचते . आज त्याने  सत्य साई स्पीकस् चा पहिला भाग ठेवला होता . मी त्याचे एक पान असेच उघडले ते २२३ नंबरचे पान होते . मी वाचू लागले . 
         ....... सध्याचं , त्रिदेव पत्नी लक्ष्मी , सरस्वती आणि पार्वती यांच्याविषयीच सर्व बोलण मूर्खपणाचं आहे . त्यातून केवळ तुम्ही घालत असलेला सांसारिक चष्मा ( सांसारिक जीवन ) उघड होतो . स्वर्गीय कुटुंबाविषयी असणाऱ्या तुमच्या भौतिक कल्पनांचे ते चित्रण असते . मनुष्याच्या तीव्र इच्छापूर्तीसाठी मानवी जीवनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रचित कथा आहेत या. ही नांवे केवळ देवत्वामधून येणाऱ्या त्यांच्या शक्तिची अभिव्यक्ती आहे . उदा. लक्ष्मी हे करुणा अथवा विष्णुकृपेचे मूर्तिमंत आहे . म्हणून ती विष्णुच्या वक्षस्थली वास करते असे म्हणतात . 
          शक्तीची नावे परमेश्वरी शक्ती दर्शवतात . लक्ष्मी म्हणजे मूर्तिमंत करुणा आणि विष्णुकृपा होय . म्हणून तिचे निवासस्थान विष्णुचे वक्षस्थल आहे असे म्हटले जाते . 
३० मे २०१३ सकाळचे ध्यान 
वसंता - स्वामी , मला महालक्ष्मी विषयी लिहायचे आहे . कृपया काहीतरी सांगा ना . 
स्वामी - महाविष्णुंची करुणा आणि कृपा स्त्री स्वरुपात पाहिली जाते . आपण येथे येऊन हे दर्शवित आहोत . वास्तविक ती स्त्री नाही . ती शक्ती आहे . शिव आणि शक्तीबाबतही असेच म्हणता येईल . शिव हा संहार करणारा देव आहे , जो कामदहन करतो . पार्वती म्हणजे तप . अशा तऱ्हेने तू लिही . 
वसंता - मला समजले स्वामी . 
ध्यानसमाप्ती 
            महालक्ष्मी हे महाविष्णुंच्या करुणेचे रूप आहे . त्यांच्या कारुण्य शक्तीसाठी स्त्रीरूपाचे प्रतिक वापरले आहे . ब्रम्हदेव निर्माता आहे तथापि निर्मितीकरता ज्ञानाची आवश्यकता असते . ह्या ज्ञानाला स्त्री स्वरूप देऊन तिला सरस्वती नावाने संबोधले जाते . परमेश्वर विश्व निर्मिती करतो  . सर्व सजीव आपला वंश निर्माण करतात . निर्मिती म्हणजे वृद्धी . मनुष्य त्याचा वंश निर्माण करतो . पशु आणि इतर सजीवांना वृद्धी व ज्ञान याची देणगी नसते . मनुष्याला बुद्धी असल्यामुळे त्याने बुद्धी व ज्ञानाचा उपयोग करूनच आपली वंशवृद्धी करायला हवी . 
        " हे मानवा , पशुवत होऊन डुकरांप्रमाणे ज्ञानरहित वंशवृद्धी करू नकोस . ज्ञानाच्या ईश्वरदत्त देणगीचा योग्य वापर करून विवाह , कौटुंबिक जीवन , अपत्यप्राप्ती आणि वंशवृद्धी कर ".

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ....... 

जय साई राम    

रविवार, १६ मार्च, २०१४

ॐ  श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

" प्रेमाने सिंचित केलेल्या भक्तिच्या बीजातून भक्तिचे नाजूक रोपटे अंकुरते , त्याच्या संरक्षणासाठी साधनेचे कुंपण घालून परमेश्वर प्राप्तीचे फळ मिळवता येते ".

         वसंतामृतमाला
                पुष्प पंधरावे 
              सांसारिक चष्मा 
 
        स्वामी परत आले नाहीत , माझे दुःख अधिक गहिरे झाले आहे . एक वेळ शारीरिक क्लेश सहन करणे शक्य आहे परंतु या हृदयवेदना कशा सहन करायच्या ? 
२९ मे २०१३ सकाळचे ध्यान 
वसंता - स्वामी , ' Valentine Day ' आता कसा काय ? 
स्वामी - आपण त्या दिवशी नक्की भेटू . आपण त्याच दिवशी साश्रू नयनांनी एकमेकांचा निरोप घेतला . आता आपण हर्ष भराने पुन्हा भेटू . हे माझे वचन आहे . मी ह्या वर्षी येईन . 
वसंता - स्वामी तुम्ही यापूर्वी ही  अनेक वेळा हे वचन दिले आहे . परंतु तसे काही घडले नाही . 
स्वामी - या वेळेस नक्की घडेल . मी येणार म्हणजे येणार . हे अवतार कार्य आहे . माझ्या गळ्यात माला घालणारी महालक्ष्मी तू आहेस . तथापि त्या वेळी मी तुझ्याकडे पाहिले नाही . मी प्रथमच पृथ्वीवर तुझे प्रेम पाहिले आणि अनुभवले . अनुभव घेण्यासाठी मी तुझ्याशी विवाह केला . तुला त्यावेळी सत्य माहित नव्हते . त्यानंतर आपण गांधर्व विवाह केला . परत आल्यावर मी प्रथमच तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधेन . तो पर्यंत महालक्ष्मीसाठी मांगल्य नव्हते . 
वसंता - स्वामी , तुम्ही हे काय सांगताय ? 
स्वामी - हे खरं आहे . तुझ्या या ओसंडून वाहणाऱ्या प्रेमासाठी मी काही केले नाही . आता मी ते अनुभवतोय . 
वसंता - मला समजले स्वामी . आता मी लिहीन . 
ध्यान समाप्ती 
           १४ फेब्रुवारी २००९ स्वामींनी मला मुद्देनहल्लीला   जाण्यास सांगितले . आम्ही पुट्टपर्तीवरून  गाडी घेतली व स्वामींच्या गाडीच्या मागे गेलो . तिथे गेल्यावर , स्वामी प्रवचन देताना आम्ही त्यांच्या समोरच बसलो होतो . प्रवचन ऐकत असता माझ्या नेत्रांतून अश्रूधारा वाहत होत्या . स्वामींच्या डोळ्यांतही अश्रू तरळत होते . 
          परतताना आम्हाला थोडासा उशीर झाला . तथापि स्वामींनी रस्त्याच्या मध्यावर गाडी थांबवून आमची प्रतिक्षा केली . आम्ही बाकीच्या गाड्यांमध्ये सामील झाल्यानंतर स्वामींनी पुट्टपर्तीकडे प्रयाण केले . त्यावेळी मी स्वामींना शेवटचे पाहिले . आम्ही दोघांनी साश्रू नयनांनी एकमेकांना पाहात निरोप घेतला . म्हणून स्वामी म्हणाले की आपण त्याच दिवशी भेटू . 
            समुद्र मंथन झाल्यावर त्यातून महालक्ष्मी प्रकट झाली . तिने महाविष्णूंच्या गळ्यात माला घातली आणि पदसेवेस प्रारंभ केला . त्यावेळी प्रभू योगनिद्रेत असल्यामुळे त्यांनी तिला पाहिले नाही . स्वामी आणि मी अवतार कार्यासाठी भूतलावर आलो . माझ्या प्रेमाची अनुभूती घेण्यासाठी स्वामींनी माझ्याशी विवाह केला . माझे प्रेम केवळ कृष्णासाठी होते . मी म्हणाले की मी फक्त त्याच्याशीच विवाह करेन . असे असताना मी एखाद्या सामान्य मानवाशी कसा काय विवाह करणार ? मी केवळ त्यांच्याशीच विवाह केल्याचे माझ्या प्रज्ञानाला माहित असल्याचे स्वामींनी उघड केले . विवाह केल्याशिवाय परमेश्वरसुद्धा माझ्या प्रेमाची अनुभूती घेऊ शकत नाही . म्हणून स्वामी म्हणाले की माझ्या प्रेमाची अनुभूती घेण्यासाठी त्यांनी माझ्याशी विवाह केला . त्यानंतर त्यांनी त्यांच्या स्थूल रुपात माझ्याशी गांधर्व विवाह केला .

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ….

जय साई राम          

गुरुवार, १३ मार्च, २०१४

ओम श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

मन नेहमीच नकारात्मकतेवर केंद्रित असते . त्याला सकारात्मक बनवा आणि म्हणा , " मी सर्वांवर प्रेम करतो ".
 
पुष्प चौदावे पुढे सुरु

आज स्वामींनी एक कार्ड दिले .
* कार्डच्या एका कोपऱ्यात एक अंडाकृती फ्रेम होती . त्यात एका स्त्री व पुरुषाचे चित्र होते . फ्रेमवर दोन मोती होते एक वर आणि एक खाली .

* त्यापुढे अंडाकृती आकार २४ वक्र रेषांपासून बनवला होता . त्याच्या आतमध्ये  Love हा शब्द आणि दोन गुलाब होते .

* त्याच्याखाली एका वर्तुळामध्ये सोनेरी अक्षरात हार्ट हा शब्द दिसत होता . त्याच्यावर हृदयाचा आकार होता  आणि १४ वक्र रेषांची सोनेरी वर्तुळाकार किनार असलेले दोन पांढरे खडे होते .

* त्यापुढे एक मोठे वर्तुळ होते . त्यात हृदयाच्या आकाराचे कुलूप आणि त्याच्याखाली Forever असे लिहिले होते .

* त्याखाली तपकिरी रंगाची अंडाकृती होती , त्याच्या मध्यावर सोनेरी रंगात Promise शब्द होता .

* त्यापुढे चौकटचा आकार होता . त्यामध्ये लिहिले होते , ' थिंकिंग ऑफ यू ' ( तुझाच विचार करतोय ) .

* या सर्वाभोवती ८ वक्र रेषांच्या डिझाईनची सोनेरी किनार होती .
 
* अखेरीस , तपकिरी रंगाच्या पार्श्वभूमीवर सोनेरी रंगात   ' Valentine Day ' असे लिहिले होते आणि लव्ह हार्ट यू शब्दांवर दोन गुलाब बांधले होते . त्याच्या दोन्ही बाजूस १५ सोनेरी मणी व ७ वक्र रेषा होत्या आणि पुढील मजकूर होता : HMS 5004B
२८ मे २०१३ ध्यान 
वसंता - स्वामी , मी सकाळपासून अश्रू ढाळते आहे . हे तुम्ही काय दिलय , Valentine Card ? 
स्वामी - माझे तुझ्यावरील प्रेम तसूभरही कमी होणार नाही . दिव्यदेहांमध्ये आपण सदैव एकत्रच असतो . मी आल्यावर आपली स्थूलरुपात भेट होईल . अशा तऱ्हेने मी माझे प्रेम तुझ्याकडे व्यक्त करत आहे . 
वसंता - आता मला समजले स्वामी . 
ध्यान समाप्ती 
           आता आपण पाहू या . आज मी अनावर अश्रू ढाळत असल्यामुळे स्वामींनी अशा पद्धतीने त्यांचे प्रेम व्यक्त केले . प्रेमाद्वारे आम्ही स्त्री आणि पुरुषामध्ये २४ परिपूर्णतत्वे निर्माण केली . आमचे प्रेम , सत्य युग व कलियुगाला जोडणारे बटन बनले . आमच्या भावविश्वाद्वारे चौदा भुवने पूर्णम्  झाली . स्वामी म्हणाले मी सदैव तुझ्या विचारांमध्ये असतो . हे माझे वचन आहे . ऑल हिज लव्ह एच एम एस यातून एक हजार वर्षांसाठी ' सत्य हृदय प्रकटीकरण ' हे सूचित केले जाते .  ५ तत्वे आणि ४ युगे केवळ बाबा . हे सत्य युग आहे , सत्य साई बाबा युग . त्यांच्या शिवाय तेथे दुसरे काही नाही . मी त्यांच्या दिव्यत्वाचे मर्म आहे हे दर्शवण्यासाठी स्वामींनी हे कार्ड दिले . 

जय साई राम 

व्ही. एस.