रविवार, ३० मार्च, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

" परमेश्वरावर प्रेम करा . त्याचा ध्यास घ्या . तुम्हाला फक्त तो आणि तोच हवा आहे , हे त्याला सांगा ".

    वसंतामृतमाला


        पुष्प सोळावे 
     ( पंधराव्या पुष्पावरून पुढे सुरु ) 
     विश्व ब्रह्माची कूस


          वयाच्या ३० व्या वर्षी स्वामींनी मानवतेला एक गंभीर इशारा दिला . ते म्हणाले मनुष्य परमेश्वराला त्याच्या भौतिक , सांसारिक चष्म्यातून पाहतो.  मनुष्याची कल्पना अशी असते की परमेश्वर त्याच्या सारखाच आहे. तो ही शुल्लक इच्छांची पूर्ती , पत्नी ,   कुटुंब आणि अपत्य यांच्या शोधात जातो त्याचे ही आपल्या सारखेच पत्नी व कुटुंब आहे असे मानून मनुष्य त्या भोवती कथा रचतो . ' परमेश्वर त्याची पत्नी आणि मुले ' ही संकल्पना मनुष्याच्या मनात युगानुयुगे आहे . याचे कारण मनुष्य भौतिक जीवनाचा चष्मा घालून सर्व काही पाहतो . जे निळा चष्मा घालतात त्यांना सर्व निळे दिसते . जे पिवळा घालतात त्यांना  सर्व जग पिवळे दिसते . याचप्रमाणे मनुष्य भौतिक चष्म्यातून परमेश्वराला पाहतो . 
            हा दृष्टीकोन बदलण्यासाठी परमेश्वर येथे आला आहे . याचे प्रात्यक्षिक करण्यासाठी मला त्याने येथे आणले आहे . तो महामहीम परमेश्वर आहे , आदिमूलम आहे . त्याच्या कृपेला व करुणेला त्याने माझे रूप देऊन इथे आणले आहे . मानवतेचे दुःखभोग पाहून आम्ही येथे आलो आहोत .  तसेच त्यांना एकदा मुक्तीच्या आनंदाची अनुभूती देण्यासाठी आलो आहोत . माझा जन्म स्वामींमधून झाला . त्यामुळे मी सदैव अश्रू ढाळते आणि विलाप करते . तथापि स्वामींनी प्रत्यक्ष मला कधीही पाहिले नाही , माझ्याशी संभाषण केले नाही वा मला स्पर्श केला नाही . जे काही घडते ते केवळ ध्यानामध्ये . ५८ वर्षे मी परमेश्वरासाठी करूण विलाप करते आहे . १९९६ मध्ये त्यांनी माझ्याशी ध्यानात संभाषण करण्यास सुरुवात केली . त्यांनी मला माझे अनुभव कथित करणारे ' इथेच ! या क्षणी !! मुक्ती !!! ' हे पुस्तक लिहिण्यास सांगितले . त्यांनी स्वतः पुस्तकाच्या प्रतीवर स्वाक्षरी करून ते प्रकाशित केले . या दरम्यानच स्वामींनी संपूर्ण विश्व माझ्या उदरात ठेवले आणि ते म्हणाले की त्यांच्या आणि माझ्या पोटी नवनिर्मितीचा जन्म होईल . 
         त्यानंतर मी ' भगवंताचे अखेरचे सात दिवस '  हे पुस्तक लिहिले . स्वामींनी स्वहस्ते त्याचा स्वीकार केला . त्या पुस्तकात मी लिहिले की स्वामी माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधतील त्यांनतर माझी काया त्यांच्या देहात विलीन होईल . त्यावेळी एका व्यक्तीने माझ्या दुसऱ्या पुस्तकातील काही भाग दाखवून म्हटले, ' राधा कृष्ण विश्वगर्भ ' . त्यानंतर त्याने मला प्रशांती निलयममध्ये पुन्हा पाऊल टाकू नये असे बजावले .

उर्वरित वसंतामृत पुढील भागात…

जय साई राम
 
               

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा