रविवार, ९ मार्च, २०१४

ओम श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

" आसक्ती आणि इच्छा विरहीत मनुष्य जगातील सर्वात श्रीमंत मनुष्य आहे ". 

पुष्प चौदावे पुढे सुरु

         २८ मे २०१३ मी  अनावर अश्रू ढाळत होते . मला हे सर्व असह्य झाले होते . स्वामींनी आज काही दिले नाही . माझा पायही खूप दुखत होता .
२८ मे २०१३ सकाळचे ध्यान 
वसंता - स्वामी  आम्ही ऑर्थोपेडीक डॉक्टरकडे जाऊ नको का ? आम्ही एक्स रे काढू का ? 
स्वामी - डॉक्टर नको आणि एक्स रे नको ......... सर्व ठीक होईल .
वसंता - स्वामी , तुम्ही आपल्या विवाह दिनानिमित्य काहीसुद्धा दिले नाहीत . पूर्वी तुम्ही माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत  होतात . पाने भरभरून लिहित होतात आणि आता ? काही नाही ! तुम्ही फक्त त्या बनियनच्या कापडावर नंबर लिहिलेत ! 
स्वामी - रडू नकोस , मी लिहीन .
वसंता - स्वामी , तुम्ही येई पर्यंत , तुमचे लिखाण हा माझा एकमेव दिलासा आहे . 
स्वामी - मी नक्की लिहीन . तू माझी देवी आहेस . काळजी करू नको . 
वसंता - स्वामी  ज्याला मी घाबरत होते ते जरा आणि व्याधी  आता माझ्याकडे आले आहेत आणि तुम्ही शांतपणे ते सर्व पहात आहात . असाच मृत्यूही येईल का ? 
स्वामी - रडू नकोस , तुझ्या देहामध्ये परिवर्तन होईल याची खात्री बाळग. तुझा देह केवळ माझ्या देहात विलीन होईल . 
ध्यान समाप्ती 
          आता आपण या विषयी पाहू या . माझा पाय दुखण विकोपाला गेलं होतं . एस. व्ही. म्हणाले की आपण ऑर्थोपेडीक डॉक्टरांना बोलवू आणि एक्स रे काढू . तथापि स्वामी नाही म्हणाले . लहानपणापासूनच मला जरा , व्याधी आणि मृत्यूची भीती वाटत असे . मी सदैव कृष्णाची प्रार्थना करत असे की या तिन्ही गोष्टी माझ्या पर्यंत न येवोत . आता वृद्धत्व तर आलेच आहे  आणि त्याचबरोबर व्याधी ही आहेत  . मी सदैव करूण विलाप करते , " माझे सर्व तप व्यर्थ आहे का ? " या तिन्ही गोष्टींसाठी मी केवढे तप केले तथापि हे सर्व व्यर्थ ठरले ! रडून रडून मी हे प्रश्न विचारते स्वामीही आले नाहीत . आता या पुढे हे सहन करणे मला शक्य होणार नाही .  सर्वांनी  माझे सांत्वन केले . स्वामी येतील ,  माझी काया परिवर्तित होऊन  स्वामींच्या देहात विलीन होईल . हे अवतार कार्य आहे . मला हे सहन होत नाही , मी अश्रू ढाळते आहे . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साई राम    
 
           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा