ओम श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
मन नेहमीच नकारात्मकतेवर केंद्रित असते . त्याला सकारात्मक बनवा आणि म्हणा , " मी सर्वांवर प्रेम करतो ".
पुष्प चौदावे पुढे सुरु
वसंता - स्वामी , मी सकाळपासून अश्रू ढाळते आहे . हे तुम्ही काय दिलय , Valentine Card ?
स्वामी - माझे तुझ्यावरील प्रेम तसूभरही कमी होणार नाही . दिव्यदेहांमध्ये आपण सदैव एकत्रच असतो . मी आल्यावर आपली स्थूलरुपात भेट होईल . अशा तऱ्हेने मी माझे प्रेम तुझ्याकडे व्यक्त करत आहे .
वसंता - आता मला समजले स्वामी .
ध्यान समाप्ती
आता आपण पाहू या . आज मी अनावर अश्रू ढाळत असल्यामुळे स्वामींनी अशा पद्धतीने त्यांचे प्रेम व्यक्त केले . प्रेमाद्वारे आम्ही स्त्री आणि पुरुषामध्ये २४ परिपूर्णतत्वे निर्माण केली . आमचे प्रेम , सत्य युग व कलियुगाला जोडणारे बटन बनले . आमच्या भावविश्वाद्वारे चौदा भुवने पूर्णम् झाली . स्वामी म्हणाले मी सदैव तुझ्या विचारांमध्ये असतो . हे माझे वचन आहे . ऑल हिज लव्ह एच एम एस यातून एक हजार वर्षांसाठी ' सत्य हृदय प्रकटीकरण ' हे सूचित केले जाते . ५ तत्वे आणि ४ युगे केवळ बाबा . हे सत्य युग आहे , सत्य साई बाबा युग . त्यांच्या शिवाय तेथे दुसरे काही नाही . मी त्यांच्या दिव्यत्वाचे मर्म आहे हे दर्शवण्यासाठी स्वामींनी हे कार्ड दिले .
जय साई राम
व्ही. एस.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा