ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
पुष्प पंधरावे पुढे सुरु
स्वामी आता पुन्हा नव्याने येतील आणि स्वहस्ते माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधतील . महालक्ष्मीसाठी मंगळसूत्र का नाही ? आज अमरने मला वाचण्यासाठी सत्य साई स्पीकस् भाग १ माझ्यापुढे ठेवला . दररोज दुपारच्या ध्यानानंतर माझ्यासाठी ठेवलेले स्वामींचे पुस्तक मी वाचते . आज त्याने सत्य साई स्पीकस् चा पहिला भाग ठेवला होता . मी त्याचे एक पान असेच उघडले ते २२३ नंबरचे पान होते . मी वाचू लागले .
....... सध्याचं , त्रिदेव पत्नी लक्ष्मी , सरस्वती आणि पार्वती यांच्याविषयीच सर्व बोलण मूर्खपणाचं आहे . त्यातून केवळ तुम्ही घालत असलेला सांसारिक चष्मा ( सांसारिक जीवन ) उघड होतो . स्वर्गीय कुटुंबाविषयी असणाऱ्या तुमच्या भौतिक कल्पनांचे ते चित्रण असते . मनुष्याच्या तीव्र इच्छापूर्तीसाठी मानवी जीवनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रचित कथा आहेत या. ही नांवे केवळ देवत्वामधून येणाऱ्या त्यांच्या शक्तिची अभिव्यक्ती आहे . उदा. लक्ष्मी हे करुणा अथवा विष्णुकृपेचे मूर्तिमंत आहे . म्हणून ती विष्णुच्या वक्षस्थली वास करते असे म्हणतात .
शक्तीची नावे परमेश्वरी शक्ती दर्शवतात . लक्ष्मी म्हणजे मूर्तिमंत करुणा आणि विष्णुकृपा होय . म्हणून तिचे निवासस्थान विष्णुचे वक्षस्थल आहे असे म्हटले जाते .
३० मे २०१३ सकाळचे ध्यान
वसंता - स्वामी , मला महालक्ष्मी विषयी लिहायचे आहे . कृपया काहीतरी सांगा ना .
स्वामी - महाविष्णुंची करुणा आणि कृपा स्त्री स्वरुपात पाहिली जाते . आपण येथे येऊन हे दर्शवित आहोत . वास्तविक ती स्त्री नाही . ती शक्ती आहे . शिव आणि शक्तीबाबतही असेच म्हणता येईल . शिव हा संहार करणारा देव आहे , जो कामदहन करतो . पार्वती म्हणजे तप . अशा तऱ्हेने तू लिही .
वसंता - मला समजले स्वामी .
ध्यानसमाप्ती
महालक्ष्मी हे महाविष्णुंच्या करुणेचे रूप आहे . त्यांच्या कारुण्य शक्तीसाठी स्त्रीरूपाचे प्रतिक वापरले आहे . ब्रम्हदेव निर्माता आहे तथापि निर्मितीकरता ज्ञानाची आवश्यकता असते . ह्या ज्ञानाला स्त्री स्वरूप देऊन तिला सरस्वती नावाने संबोधले जाते . परमेश्वर विश्व निर्मिती करतो . सर्व सजीव आपला वंश निर्माण करतात . निर्मिती म्हणजे वृद्धी . मनुष्य त्याचा वंश निर्माण करतो . पशु आणि इतर सजीवांना वृद्धी व ज्ञान याची देणगी नसते . मनुष्याला बुद्धी असल्यामुळे त्याने बुद्धी व ज्ञानाचा उपयोग करूनच आपली वंशवृद्धी करायला हवी .
" हे मानवा , पशुवत होऊन डुकरांप्रमाणे ज्ञानरहित वंशवृद्धी करू नकोस . ज्ञानाच्या ईश्वरदत्त देणगीचा योग्य वापर करून विवाह , कौटुंबिक जीवन , अपत्यप्राप्ती आणि वंशवृद्धी कर ".
उर्वरित वसंतामृत पुढील भागात .......
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा