गुरुवार, ६ मार्च, २०१४

ओम श्री साई वसंतसाईसायनमः 

सुविचार

    " आपण आपली सर्व कर्मे परमेश्वराला अर्पण केल्यानंतर हळूहळू चित्तशुद्धी होते ". 

पुष्प चौदावे पुढे सुरु

         २३ व्या प्रकरणात मी हे लिहिले आहे . परमेश्वर कलियुगात भूतलावर अवतरत नाही . ह्या कलियुग रुपी वाळवंटात , मी त्यांच्या जीवनातील वसंत आहे . सदैव माझे अश्रू , माझे रुदन आणि माझी तळमळ या द्वारे मी त्यांच्यावर माझ्या प्रेमाचा वर्षाव करते . केवळ या प्रेमामुळेच ते कलियुगात येथे राहू शकतात . 
         त्यानंतर कृष्ण घोषित करतो , ' माशांमध्ये मी मगर आहे '. आज मी सत्य साई स्पीकस्  भाग ५ या मध्ये वाचलेला मजकूर खाली देत आहे . 
          ----- तुमच्या स्वतःच्या दिव्यत्वामध्ये खोल बुडी मारा . नदीच्या तळाशी राहणारी मगर आनंदी , सुरक्षित आणि अजिंक्य असते . जेव्हा ती जमिनीवर सरपटायला लागते तेव्हा ती मनुष्याच्या हातातल खेळण बनते आणि मृत्यूला आमंत्रण देते . खोली , गहनता तुमचे आश्रय स्थान आहे . तुमच्या शक्तीचा स्त्रोत आहे . किनाऱ्यावर किंवा उथळपणे भरकटू नका .
         भवसागरात गोते खाण्याऱ्या माणसाला सर्व गोष्टी दुष्कर आहेत . त्यातून बाहेर पडले तरच त्याला मुक्ती प्राप्त होईल . प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात खोलवर जायला हवे . मानवाने संसार सागरातून बाहेर पडायलाच हवे , तरच त्याला मुक्ती मिळेल . मगर खोल पाण्यात शांत व आनंदी असते , तथापि ती जमिनीवर येताच मनुष्य तिला इजा पोहोचवतो . त्याचप्रमाणे मनुष्य भौतिक जीवनात बाह्य जगामध्ये वावरताना काम , क्रोध , लोभ , मोह , ' मी अन्  माझे ' हे सर्व त्याच्यावर हल्ला करतात . तो पुनः पुन्हा जन्म घेत मृत्यू पावतो . जर त्याने ईश्वराभिमुख होऊन अंतरंगात खोलवर बुडी मारली तर हे सहा मगर रुपी षड् रिपू त्याला स्पर्श करू शकणार नाहीत . 
         आदिशंकराचार्यांना संन्यास घ्यायचा होता.  आणि त्यांनी विवाह करावा अशी त्यांच्या आईची इच्छा होती . एक दिवस स्नानासाठी नदीवर गेले असताना एका मगरीने  त्यांचा पाय पकडला.  त्याच्या आईने   त्यांना संन्यासी बनण्यास अनुमती दिल्यानंतरच मगरीने त्यांचा पाय सोडला . ह्याला आपत्  संन्यास म्हणतात . या विषयी मी पूर्वी लिहिले आहे . तुमच्या जीवनात तुम्ही किती संकटांना तोंड देता ? जन्म म्हणजे केवळ भोग आणि नंतर मृत्यू ! या भवसागरात तुम्ही पुरेसे दुःख भोगले नाही का ? तुम्हाला स्वतः विषयी करुणा नाही वाटत का ? तुम्ही भवरोगाचे  दुःख , यातना भोगत आहात . डॉक्टरांप्रमाणे ऋषीमुनी , संत महात्मे यांनी तुम्हाला रामबाण उपाय दिला आहे. तथापि तुम्ही उन्मतपणे जे औषध घेण्याचे नाकारता ! पुरे आता , जागे व्हा ! ' मी आणि माझे ' या आसक्तीचा त्याग करा. 
         जेव्हा आम्ही विश्वब्रम्ह गर्भ कोटमची नाडी पाहायला गेलो तेव्हा त्यामध्ये इमारतीच्या छपरावर सहा मगरींची शिल्प असावीत असे लिहिले होते . त्यानंतर त्यामध्ये चार मिळवून ती संख्या दहा करण्यात आली . गर्भ कोटम मधून मनुष्याच्या षड् रिपुंवर अंकुश ठेवला जातो . सर्वजण परमेश्वराच्या संसार सागरात जन्मले सर्व त्याचेच वंशज आहेत . सर्वजण जीवनमुक्त आणि ज्ञानी असतील . स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला स्वामींची कृपा प्राप्त होईल . परमेश्वर ह्या शाश्वत सत्याचा शोध घ्या . 
उर्वरित वसंतामृत पुढील भागात

जय साई राम  
            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा