ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" प्रेमाने सिंचित केलेल्या भक्तिच्या बीजातून भक्तिचे नाजूक रोपटे अंकुरते , त्याच्या संरक्षणासाठी साधनेचे कुंपण घालून परमेश्वर प्राप्तीचे फळ मिळवता येते ".
पुष्प पंधरावे
सांसारिक चष्मा
स्वामी परत आले नाहीत , माझे दुःख अधिक गहिरे झाले आहे . एक वेळ शारीरिक क्लेश सहन करणे शक्य आहे परंतु या हृदयवेदना कशा सहन करायच्या ?
२९ मे २०१३ सकाळचे ध्यान वसंता - स्वामी , ' Valentine Day ' आता कसा काय ?
स्वामी - आपण त्या दिवशी नक्की भेटू . आपण त्याच दिवशी साश्रू नयनांनी एकमेकांचा निरोप घेतला . आता आपण हर्ष भराने पुन्हा भेटू . हे माझे वचन आहे . मी ह्या वर्षी येईन .
वसंता - स्वामी तुम्ही यापूर्वी ही अनेक वेळा हे वचन दिले आहे . परंतु तसे काही घडले नाही .
स्वामी - या वेळेस नक्की घडेल . मी येणार म्हणजे येणार . हे अवतार कार्य आहे . माझ्या गळ्यात माला घालणारी महालक्ष्मी तू आहेस . तथापि त्या वेळी मी तुझ्याकडे पाहिले नाही . मी प्रथमच पृथ्वीवर तुझे प्रेम पाहिले आणि अनुभवले . अनुभव घेण्यासाठी मी तुझ्याशी विवाह केला . तुला त्यावेळी सत्य माहित नव्हते . त्यानंतर आपण गांधर्व विवाह केला . परत आल्यावर मी प्रथमच तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधेन . तो पर्यंत महालक्ष्मीसाठी मांगल्य नव्हते .
वसंता - स्वामी , तुम्ही हे काय सांगताय ?
स्वामी - हे खरं आहे . तुझ्या या ओसंडून वाहणाऱ्या प्रेमासाठी मी काही केले नाही . आता मी ते अनुभवतोय .
वसंता - मला समजले स्वामी . आता मी लिहीन .
ध्यान समाप्ती
१४ फेब्रुवारी २००९ स्वामींनी मला मुद्देनहल्लीला जाण्यास सांगितले . आम्ही पुट्टपर्तीवरून गाडी घेतली व स्वामींच्या गाडीच्या मागे गेलो . तिथे गेल्यावर , स्वामी प्रवचन देताना आम्ही त्यांच्या समोरच बसलो होतो . प्रवचन ऐकत असता माझ्या नेत्रांतून अश्रूधारा वाहत होत्या . स्वामींच्या डोळ्यांतही अश्रू तरळत होते .
परतताना आम्हाला थोडासा उशीर झाला . तथापि स्वामींनी रस्त्याच्या मध्यावर गाडी थांबवून आमची प्रतिक्षा केली . आम्ही बाकीच्या गाड्यांमध्ये सामील झाल्यानंतर स्वामींनी पुट्टपर्तीकडे प्रयाण केले . त्यावेळी मी स्वामींना शेवटचे पाहिले . आम्ही दोघांनी साश्रू नयनांनी एकमेकांना पाहात निरोप घेतला . म्हणून स्वामी म्हणाले की आपण त्याच दिवशी भेटू .
समुद्र मंथन झाल्यावर त्यातून महालक्ष्मी प्रकट झाली . तिने महाविष्णूंच्या गळ्यात माला घातली आणि पदसेवेस प्रारंभ केला . त्यावेळी प्रभू योगनिद्रेत असल्यामुळे त्यांनी तिला पाहिले नाही . स्वामी आणि मी अवतार कार्यासाठी भूतलावर आलो . माझ्या प्रेमाची अनुभूती घेण्यासाठी स्वामींनी माझ्याशी विवाह केला . माझे प्रेम केवळ कृष्णासाठी होते . मी म्हणाले की मी फक्त त्याच्याशीच विवाह करेन . असे असताना मी एखाद्या सामान्य मानवाशी कसा काय विवाह करणार ? मी केवळ त्यांच्याशीच विवाह केल्याचे माझ्या प्रज्ञानाला माहित असल्याचे स्वामींनी उघड केले . विवाह केल्याशिवाय परमेश्वरसुद्धा माझ्या प्रेमाची अनुभूती घेऊ शकत नाही . म्हणून स्वामी म्हणाले की माझ्या प्रेमाची अनुभूती घेण्यासाठी त्यांनी माझ्याशी विवाह केला . त्यानंतर त्यांनी त्यांच्या स्थूल रुपात माझ्याशी गांधर्व विवाह केला .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ….
जय साई राम
Vasanthamruthmala is truly a nector to the heart
उत्तर द्याहटवाVasanthamruthmala is truly a nector to soul
उत्तर द्याहटवा