ओम श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मृत्युसमयी मनात असणारे प्रबळ विचार पुढील जन्माचा पाया रचतात " .
वसंतामृतमाला
पुष्प चौदावे ( तेराव्या पुष्पावरून पुढे चालू )
एच एम एस
" कृष्ण पुढे म्हणतो , ऋतूंमध्ये मी वसंत ऋतू आहे ". या ऋतूत सृष्टीमध्ये सर्वत्र फुलोरा फुलतो . सगळीकडे प्रसन्नता असते , आनंद नांदतो . तथापि ह्या वसंताच्या जीवनात कधी वसंत फुललाच नाही . तिचे जीवन म्हणजे केवळ वाळवंट ! वाळवंटात हिरवळ नसते . मी असा विचार करून सतत अश्रू ढाळते . मी सदैव ईश्वराशी संयुक्त होते म्हणून त्याच्यापासून विभक्त झाल्यावर मला हे जग एखाद्या रखरखीत वाळवंटासारखे भासू लागले . माझी परमेश्वराची तृषा कधीही शमणारी नाही . कारण येथील जीवन हे केवळ मृगजळ आहे . येथे खरे पाणी नाही . तरीसुद्धा या जगात लोक आनंदाने कसे काय जीवन जगतात ? कारण त्यांना खऱ्या पाण्याची चवच माहित नाही . त्यांची मृगजळावर अपार श्रद्धा असल्याने ते त्याच्या पाठीमागे धावतात . सर्वकाही माया , भ्रम , मृगजळ आहे . पत्नी , मुले , पद , प्रतिष्ठा आणि धन या सर्व गोष्टींच्या शोधात तुम्ही धावता . त्या सर्व गोष्टी म्हणजे एक मृगजळ आहे . त्यामध्ये खरा आनंद नाही . परमेश्वराचा शोध घ्या . तेथे खरा आनंद आहे . आसक्ती न ठेवता तुम्ही तुमची सर्व कर्तव्ये पार पाडा .
स्वामींनी लिहिलेले एक गीत आपण पाहू .
तू माझी शक्ती
तू माझी शक्ती , माझी शक्ती
हे प्रिय वसंतु
तू वसंत माझ्या जीवनातील
तूचि माझा आश्रय
तू माझे दिव्य प्रेम
तूचि निर्मल निकेतन
तू मर्म माझ्या दिव्यत्वाचे
हे वसंतु
तू वसंत माझ्या जीवनातील
उर्वरित वसंतामृत पुढील भागात......
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा