ओम श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वरास प्राप्त करून घेणे हा मनुष्याचा सर्वोच्च धर्म आहे ".
पुष्प २० पुढे सुरु
आता आपण चौथा चरण पाहू .
देवादिकांची मांदियाळी तुझ्याभोवती , तत्पर सेवेसी हे गंगादेवी , मायामोहिनी तू जणू भूतलीची
विषरहित बनविसी कलिसी विराजोनी शिवमस्तकी
या विषयी मी आधीच्या अध्यायात लिहिले आहे . त्यामध्ये स्वामींच्या फोटोत त्यांच्या मस्तकावर तसेच माझ्या खोलीतील खिडक्या दरवाजे आणि इतर अनेक ठिकाणी चार बोटांचे ठसे कसे उमटले ते मी विशद केले आहे .
नंतर स्वामी म्हणाले , " तू ' मी ' विना ' मी ' आहेस . माझ्या शिरावरील मुकुट . शंकराच्या मस्तकावरील गंगा हे त्याचे शास्त्र प्रमाण आहे ".
मायेला दूर सारण्यासाठी मी ह्या जगात आले . मला ' मी ' नाही म्हणून स्वामींनी अंगठा सोडून ४ बोटे दाखविली . मी माझा अंगठा म्हणजे ' मी ' कापून टाकून स्वामींना अर्पण केला . जरी माझ्या ठायी पूर्ण ज्ञान व सर्व शक्ती आहे . तरी मला ' मी ' नसल्यामुळे मी परमेश्वर होऊ शकत नाही . परमेश्वर साक्षी भावात असतो . मी ती अवस्था प्राप्त केल्यास मी काहीही करू शकणार नाही . माझ्याकडे सर्व शक्ती असतीलही तसेच मी परमेश्वरासारखीच असेन तथापि मला ' मी ' नसल्याने मी सर्व गोष्टी करू शकत नाही . त्यामुळे मी स्वामींच्या विश्वव्याप्त रूपांतील विष दूर करते . समस्त विश्वामधील विष दूर करते . हा विषारी कली दूर झाल्याने सत्य युग निर्माण होते . म्हणून स्वामी म्हणतात की मी अमृत कलश घेऊन महाविष्णूंच्या पदकमलांमधून आले आहे . परमेश्वर आणि विश्व ' एक ' आहेत .
त्या चरणामध्ये म्हटले आहे ......
विषरहित बनविसी कलिसी विराजोनी शिवमस्तकी
तथापि , परमेश्वराचे वैश्विक रूप असलेल्या साईचे मस्तक मी विषरहित करते .
दाविते तुझे अस्तित्व
या विश्वातील जलोघ न् सरिता अनेक
हे कर्पूरवर्णी गंगे ,
पती तुझा सागर ( जलधी ),
बहुत महापर्वत ओलांडीलेसी तू
क्रीडा करण्या तव पतीसवे.
उर्वरित वसंतामृत पुढील भागात
जय साई राम