रविवार, ३१ ऑगस्ट, २०१४

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार

     " देह, मन, बुद्धी, इंद्रिये आणि अहंकार रहित प्रेम शुद्ध आणि सत् चितआनंद स्वरुप आहे . त्याचे सार मनुष्याच्या आकलना पलीकडचे आहे . "

पुष्प २५ पुढे सुरु

           काही दिवसांपूर्वी  मी स्वामींना विचारले होते की , मला त्यांनी चांदी न देण्यामागे काही कारण आहे का . त्यांनी मला पदक किंवा पैंजण द्यावे अशी मी त्यांच्याकडे  मागणी  केली  होती . त्यानंतर  स्वामींनी  त्यांच्या छोट्या पादुका ठेवण्यासाठी मला हा चांदीचा कुंडा दिला . स्वामींचे चरण हेच माझे विश्व आहे . माझ्या भावविश्वाद्वारे माझे पादुका विश्व नवनिर्मिती बनले . मुक्ती निलयममधील ज्ञान मुक्ती विनायकाने हे नवविश्व उचलून धरले आहे . याचा अर्थ काय ? या नवीन सत्ययुगात ज्ञान आणि मुक्ती हे नवविश्वाचे आधारस्तंभ असतील . स्वामींनी या चांदीच्या कुंडणद्वारे नवनिर्मिती कशी असेल हे सर्व दर्शविले आहे . म्हणून म्हणते , " जागे व्हा ! तुमच्यातील इच्छा अभिलाषांना दूर करा व ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करा . पुरे झाले हे जीवन ! पुरे झाल्या इच्छापूर्ती करण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म मृत्युच्या फेऱ्या !       
       १९९१ मध्ये मला स्वामींच्या पादुका मिळाल्यानंतर मी एक गीत लिहिले होते .

आपले विश्व वेगळे,
फलासम साई या विश्वाचा स्वामी,
रेड्डीयार, चेट्टीयार बनती आप्तआपुले येथील
करिती सहभागी सर्वांसी ते त्याच्या कृपाप्रसादात
दृढ धरुनी ठेविती ते चरण त्याचे 
सव्याज परतावा देईल तो त्यासी हमखास 

           या प्रकरणासाठी हे गीत समर्पक आहे .  स्वामींचे चरण ठेवलेल्या चांदीच्या कुंड्यातील या पादुका विश्वाविषयी सांगतात . याचा अर्थ केवळ रेड्डीयार आणि चेट्टीयारच नव्हेत तर सर्व विश्व एकमेकांचे आप्त बनेल . सत्ययुगामध्ये स्वामी कृपावर्षाव करतील व सर्वांना तो कृपाप्रसाद लाभेल परंतु त्यासाठी तुम्ही त्यांचे चरण घट्ट धरून ठेवणे ही एकच अट आहे . 

जय साई राम  

गुरुवार, २८ ऑगस्ट, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " जो दुसऱ्याला काया, वाचा, मनाने दुखवत नाही तो खरा साधक होय ." 

पुष्प २५ पुढे सुरु 

          आता आपण या विषयी पाहू . मी स्वामींच्या सान्निध्यासाठी तळमळते आहे . " स्वामी कधी येणार ? " हा एकच प्रश्न मी सतत विचारते आहे . स्वामींच्या विरहाने लोक व्यथित का होत नाहीत ? सर्वजण ही घटना सहजपणे स्वीकारताना दिसतात . मी एकटीच असा करूण विलाप कां करते आहे ? साधक साधना करतात त्यांना आत्मसाक्षात्कार होतो . अखेरीस देहत्याग करून ते परमात्म्यामध्ये विलीन होतात . तथापि मला माझा देह स्वामींना समर्पित करायचा आहे . आत्म्याचा परमात्म्याशी योग म्हणजे लय . इथे जीव पुन्हा जन्म घेत नाही . मला माझा देह परमेश्वराला अर्पण करायचा आहे ; ते सुद्धा देही परमेश्वराला.  मला देहधारी भगवंताचे सान्निध्य हवे आहे . 
          भौतिक दृष्ट्या शारिरीक सान्निध्य म्हणजे वासना . यातून काम संतती जन्मास येते . स्वामींच्या देहाचे सान्निध्य लाभता काम ज्ञानात परिवर्तित होतो . जेव्हा स्वामी व मी एकमेकांना पाहू , स्पर्श करून संभाषण करू तेव्हा आमचे भाव स्तूपाद्वारे विश्वात व्याप्त होतील . यामधून नवनिर्मिती होईल . केवळ ह्याच कारणास्तव मी विरह वेदना सोसते आहे . हे अवतार कार्य आहे . या विरहानंतर शिव व शक्ती एकत्र येतील , त्यांचा योग होईल . 
           आज दुपारी स्वामींनी चांदीचा बाऊल दिला . त्याच्या काठाला ३ रिबीनी लावल्या होत्या आणि दोन्ही बाजूना ६ नागमोडी वळणे होती . त्या बाऊलला गणपतीच्या सोंडेच्या आकाराचे तीन पाय होते . बाऊलच्या आत ९२५ हे आकडे कोरले होते . 
१२ मे २०१३ ध्यान
वसंता :-  हा चांदीचा कुंडा कशासाठी ?
स्वामी :-  सकाळी तू मला विचारलेस , " मला चांदी देण्यातही काही अडचणी आहेत का ?" म्हणून मी तो दिला . 
वसंता :-  ह्याचे मी  काय करू ? ह्यातून काय सूचित होते ? 
स्वामी :-  परमेश्वर आणि त्याची शक्ती १६ कला व षड्गुणांनी युक्त आहेत . ते आणि निर्मिती एकच आहेत. ही नवनिर्मिती आहे . हे नवविश्व ज्ञानमुक्ती विनायकाने केलेले आहे . ह्या कुंड्यामध्ये छोट्या पादुका ठेव . तुझे विश्व पादुकाविश्व आहे . तुझ्या भावविश्वाद्वारे तू तुझ्या पादुका विश्वाचे नवनिर्मितीत रुपांतर करतेस .  
वसंता :-  आता मला समजले, स्वामी .
ध्यान समाप्त 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात ....

जय साई राम    

रविवार, २४ ऑगस्ट, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

     " आपला जन्म कसा झाला हे महत्वाचे नसून आपला मृत्यु कसा होतो हे महत्वाचे आहे ". 

पुष्प २५ पुढे सुरु 

         माझ्या जन्माद्वारे स्वामींपासून आद्य निर्मिती होते हे उघड झाले आहे . माझी काया स्वामींच्या देहात विलीन होईल . हे लयाचे निदर्शक आहे . परमेश्वरापासून अस्तित्वात आलेली सृष्टी पुन्हा परमेश्वरामध्ये विलीन होते, याला लय म्हणतात . मी व स्वामी या तत्वाचे प्रात्यक्षिक करण्यासाठी इथे आलो . ' इथेच याक्षणी मुक्ती ' या पुस्तकाच्या तिसऱ्या भागात ' मी ॐ नमो नारायणाय ' या मंत्राचा जप करू नये असे स्वामींनी सांगितले . ते पुढे म्हणाले , " तू हा जप केलास तर समाधी अवस्थेत जाशील ". मी समाधी अवस्था प्राप्त करण्यासाठी भूतलावर आले नाही . जन्मापासून मन आणि देह पृथक असलेल्या अवस्थेत मी आहे . मला ह्याची कल्पना नाही म्हणून मी स्वामींना विचारले . जन्मापासूनच मन स्वामींबरोबर तर काया या भूलोकात अशा अवस्थेत मी आहे . स्वामींनी माझे मन त्यांच्यापाशी ठेऊन घेतले आणि देह या जगात पाठविला . माझे ११ मे २०१३ चे ध्यान यासाठी समर्पक आहे . 
११ मे २०१३ सकाळचे ध्यान 
वसंता :- स्वामी , ' मी येईन , नक्की येईन ' असे सांगून तुम्ही मला का फसवता ? केव्हा येणार तुम्ही ? मला तुमचे सान्निध्य हवे आहे . 
स्वामी :- मी नक्की येईन . रडू नकोस . हे सर्व अवतारकार्यासाठी आहे . सामान्य व्यक्ति आत्मस्वरूप जाणून परमात्म्यात , शुद्ध सत्वामध्ये , चैतन्यात विलीन होतात . परंतु तू सदैव देहाचा विचार करतेस . आत्मा म्हणजे लय , विलयन . देह म्हणजे वृद्धी . तू देहाच्या सान्निध्यासाठी कां आग्रह धरतेस ? तुला देही भगवंताचे सान्निध्य का हवे आहे ? भौतिक दृष्टीकोनातून ही वासना आहे . परंतु तू ही वासना ज्ञानात परिवर्तित केलीस . देहाचे सान्निध्य म्हणजे निर्मिती . आत्मा म्हणजे लय , योग . देह म्हणजे वृद्धी यातूनच निर्मिती होते . 
वसंता :- आता मला समजले स्वामी . जन्मापासून आतापर्यंत माझे जीवन एक काल्पनिक विश्व आहे . 
स्वामी :- नाही , ते लवकरच सत्यात उतरेल . मी आलो की सर्व वास्तव होईल . 
ध्यान समाप्त 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ....

जय साई राम

गुरुवार, २१ ऑगस्ट, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

       " परमेश्वरामध्ये समरस झालेला मनुष्य केवळ एकच गोष्ट जाणतो . परमेश्वर, परमेश्वर आणि परमेश्वर ! "

पुष्प २५ पुढे सुरु

           बऱ्याच दिवसांपासून मी समाधानकारक ध्यान करू शकत नव्हते . माझी शारिरीक पिडाही वाढली . विवेकानंद ध्यानाला बसले की त्यांच्या अवघ्या देहावर डास बसले तरी त्यांना ते जाणवत नसे कारण त्यावेळी त्यांचे मन परमेश्वराशी ऐक्य पावलेले असे . त्यांचे देहभान नाहीसे होई . ब्रम्हानंदांनी ( तुर्यानंद ) त्यांच्या ऑपरेशनला किती वेळ लागेल असे विचारून ऑपरेशनच्या आधी १० मिनिटे त्यांनी ध्यान लावले . त्या दरम्यान त्यांचे मन परमेश्वराशी एकरूप झाले होते . डॉक्टर ऑपरेशन करत असता त्यांच्या शरीराने कोणतीही प्रक्रिया दर्शविली नाही . गुंगी दिलेल्या माणसासारखे ते बेशुद्धावस्थेत होते . त्यांनी ऑपरेशन झाल्यानंतर डोळे उघडले . मी असे कां बंर करू शकत नाही ? असे मी स्वामींना विचारले असता ते उत्तरले की, मी प्रकृति निर्मिती आहे ; आणि वैश्विक अवस्था दाखविण्यासाठी मी येथे आले आहे . 
           निर्मितीतील प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते . अस्थिरता म्हणजे निर्मिती . रोपटे वृक्षात परिवर्तित होते . छोट्या बालकाचे मानवात परिवर्तन होते . निर्मितीचा सतत बदलत राहण्याचा गुणधर्म दाखविण्यासाठी स्वामींनी घड्याळाला काट्यांचे उदाहरण दिले . घड्याळ्यातील सेकंद काटा न् मिनीट काटा सतत फिरत राहून वेळ दाखवितो . सूर्य उदय पावतो व अस्तास जातो . दिवस मावळून रात्र होते . दिवसांचा सप्ताह होतो, सप्ताहाचा महिना आणि नंतर एक वर्ष होते . हे दर्शविण्यासाठी मी इथे आले आहे . माझा प्रत्येक भाव केवळ स्वामींसाठी असतो . इथे मन आणि देह वेगळे करायची मला गरज नाही . माझे सर्व भाग केवळ स्वामींशी निगडीत असतात . माझी ही काया स्वामींकरिताच आहे .

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......

जय साई राम    

रविवार, १७ ऑगस्ट, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

         कृष्ण भक्ती ही एक अशी शृंखला आहे जिच्याद्वारे तुमचे मर्कट मन बद्ध केले जाते , शांत केले जाते . क्रिश शब्दाचा अर्थ आकर्षून घेणे . भगवान कृष्ण तुमचे मन त्यांच्याकडे आकर्षून घेतात व तुम्हाला सतावणाऱ्या इंद्रियजन्य इच्छांपासून दूर ठेवतात . ते सर्व जीवांची शांती आनंद आणि ज्ञान प्राप्तीची गहिरी तृष्णा भागवतात म्हणून अध्यात्मिक क्षेत्रामध्ये कृष्णभक्तीची तृष्णा हे स्वास्थ्याचे लक्षण समजले जाते . जोपर्यंत कृष्णमहिम्याच्या चिंतनाने तुमचे चारित्र्य शुद्ध होण्यास सुरुवात होत नाही तोपर्यंत कृष्णनाम जपणे व्यर्थ आहे . भगवद्कृपेमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे आणि ती केवळ पात्र व्यक्तीस प्राप्त होते म्हणून मनामध्ये ईश्वरनिष्ठा आणि भक्तीभाव ठेवून आज गोकुळाष्ठमीच्या शुभदिनी तुम्ही तुमचे चारित्र्य शुद्ध बनवण्यास प्रारंभ करा म्हणजे तुम्हाला भगवद्कृपेची प्राप्ती होईल .
- बाबा -


जेव्हा बाळ कृष्ण येतो 



            एकदा दिव्य दृश्यात मी बाळकृष्ण बघते .
          तो मला उंच आकाशात घेऊन जातो . जंगल, पर्वत, झाडे, वृक्षवेली सर्व काही कृष्ण . सर्वत्र कृष्ण, अगदी पृथ्वीच्या कणाकणात, पाण्याच्या प्रत्येक थेंबात ! अहाहा ! किती आनंद ! कृष्ण गातोय गोपी त्याच्या सभोवती नाचत आहेत . संपूर्ण जग आनंदाने नाचतंय . कृष्ण आणि मी पोपट बनून एकमेकांशी बोलतोय, कोकीळ बनून गातोय, मोर होऊन नाचतोय, गरुड होऊन आकाशात भरारी घेतोय ! 
( माझ्या नेत्रांवाटे अश्रुधारा वाहताहेत . मी पुतळ्यासारखी निस्तःब्ध झाले . ) 
१७ मार्च १९९६ 
         प्रातःकाळी मी विष्णूसहस्त्रनाम म्हणते आहे . एकाकी मी बाळकृष्णाला उड्या मारत, नाचत, गात, असलेला पाहते . तो माझ्या मांडीवर बसतो आणि माझ्याकडे पाहून हसतो . गळ्याभोवती हात टाकून माझा पापा घेतो . मी त्याला प्रेमाने कुरवाळते, त्याचे हात धरून त्याच्याशी खेळते . त्याला झोपाळ्यावर बसवते आणि हळुवार झोका देते . यशोदामातेप्रमाणेच, मी त्याच्या मिश्कील डोळ्यांकडे एकटक पाहण्याचा आनंद लुटते . त्याच्या इवल्याश्या निळसर पायांना स्पर्श करून लाडानी त्याच्या हातांना चापटी मारते . तो धावतो, मी त्याला पकडायचा प्रयत्न करते पण पकडू शकत नाही . माझे डोळे आनंदाश्रूंनी भरतात . शेवटी थकून मी ध्यानाला बसते . गालातल्या गालात हसत तो माझ्या मागे येऊन लडिवाळपणे आपल्या इवलाश्या हातांनी माझे डोळे झाकतो . 
         किती सुंदर दर्शन ! मी पूर्ण शुद्धीवर आले तेव्हा रेडिओवर स्वामी हरिदास गिरींच गाणं लागलं होतं, ' कृष्णा, ये, तुझ्या खोड्यांविना ये ! ' 




       

गुरुवार, १४ ऑगस्ट, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

    " परमेश्वराप्रती असणारे प्रेम , हृदयाच्या गाभ्यामधून महापूराच्या लोंढ्यासारखे दुथडी भरून वाहायला हवे . " 


पुष्प २५ पुढे सुरु

          
          संसारी माणसांचे निरनिराळे भाव अहंकारी मनाद्वारे व्यक्त होतात . भाव विचारांमध्ये परिवर्तित होऊन विचारांचे संस्कार बनतात . ह्या संस्कारांमुळेच मनुष्य पुनः पुन्हा जन्म घेऊन मृत्यू पावतो . मी दररोज साश्रू नयनांनी स्वामींपाशी हजारो भाव व्यक्त करते . काहीही वाचले की रडतच मी विचार करते .
' मी त्यांच्या सारखी कां नाही ?' 
          डायरीतील मजकूर लिहिण्याच्या काळात स्वामी माझ्याशी ध्यानात बोलत नव्हते . मी दिवसरात्र अश्रू ढाळत माझे भाव व्यक्त करत असे . मनाला क्षणाचीही उसंत नसे . मी स्वामींपाशी अव्याहत भाव व्यक्त करत असे . 
१३ मे २०१३ सकाळचे ध्यान 
 वसंता - स्वामी , मी आता ध्यान करू शकत नाही . विवेकानंद जेव्हा ध्यानाला बसत तेव्हा त्यांच्या संपूर्ण अंगावर ब्लॅंकेट पांघरल्यासारखे डास बसलेले असत . ब्रम्हानंद उर्फ तुर्यानंद यांनी ऑपरेशनच्या वेळी मन देहापासून वेगळे केले होते . मी असे गहन ध्यान का नाही करू शकत ? 
स्वामी - तू सर्वांहून वेगळी आहेस . तू अगोदरच तुझे मन देहापासून वेगळे केले आहेस . त्यांनी शांत तप केले . तू भावदर्शन करण्यासाठी आली आहेस . क्षणोक्षणी निर्मितीमध्ये बदल होत असतात . घड्याळ्यातील अविरत फिरणाऱ्या सेकंद व मिनिट काट्यांप्रमाणे  हालचाल व बदल म्हणजेच निर्मिती . तू प्रकृती , निर्मिती आहेस . छोटे बालक व रोपटे क्षणाक्षणाला वाढत असते . तुझे भाव त्यांच्यासारखे आहेत . सतत बदलते . म्हणून तू शांतपणे ध्यान करू शकत नाहीस . 
वसंता - आता मला समजले स्वामी . 
ध्यान समाप्त . 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात ….. 

जय साई राम
       

रविवार, १० ऑगस्ट, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

     " मनामध्ये सदैव सद्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती यांच्यामध्ये लढा चालू असतो . मनुष्याने आत्मविश्लेषण करून मनाचे मंथन केले पाहिजे . " 

वसंतामृतमाला

पुष्प २५ 

आमचे आगळे विश्व
        मला माझ्या एका जुन्या डायरीतील मजकूर पहायचा होता . मी सहज २९ ऑक्टोबर १९९५ या पानावर नजर टाकली . स्वामींनी  त्यातील काही नोंदी लाल शाईने अधोरेखित केल्या होत्या असे मला आढळून आले . त्या पानाच्या वरील समासात निम्नलिखित ओळ लिहून अति महत्वाचे असा शेरा मारला होता .
            " ती खरोखर मनरहित अवस्थेत जाऊ इच्छिते कां ? " 
आता आपण डायरीतील नोंद पाहू . 
२९ ऑक्टोबर १९९५ मध्यरात्रीचे २:३० 
            मी मध्यरात्रीच जागी झाले . स्वामींच्या विचारानी मला झोप येत नव्हती . मी रडत होते . मग मी लिहायला सुरुवात केली. 
        " स्वामी , मला उच्च मनरहित अवस्था प्राप्त होऊ दे . तुम्ही पूर्वी सांगितले होते की भक्ताने साधनेचा मार्ग मधेच सोडून देणे योग्य नाही . माझ्या गुरुनी माझा त्याग करून साधना मार्गावर मला मधेच सोडून दिले तर ते अयोग्य नाही कां ? मी मनरहित अवस्थेत कशी पोहोचणार ? मनरहित अवस्था मी कशी प्राप्त करू ? तुम्ही मला मार्ग दाखविणार नाही कां ? असे असेल तर मला हे जीवन नको .  "
*     *     *
          
          विलाप करीत मी लिहिले . माझ्या लिखाणातील हा छोटासा भाग स्वामींनी अधोरेखित करून त्या पानावरील वरच्या समासात ' ती खरोखर मनरहित अवस्थेत जाऊ इच्छिते कां ? '  असा प्रश्न लिहिला व तेथे अति महत्वाचे असा शेराही मारला . नंतर मला यावर लेखन करण्यास सांगितले . 
          १० मे च्या ध्यानात मी स्वामींना विचारले , " मनरहित अवस्था म्हणजे काय ? " स्वामी उत्तरले की,  या अवस्थेत असलेले शांत व स्थितप्रज्ञ असतात . ते आपले भाव व्यक्त करीत नाहीत . त्यांची अवस्था व माझी अवस्था वेगळी आहे . मी माझे वेगवेगळे भाव स्वामींकडे व्यक्त करत असते . माझे भाव स्तुपामध्ये प्रवेशित होऊन सर्वांचे परिवर्तन करतात . साधारणपणे जडभरता सारखे महान भक्त व महाज्ञानी मनरहित अवस्थेत शांत असतात . यांना स्थितप्रज्ञ म्हणतात . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......

जय साई राम

गुरुवार, ७ ऑगस्ट, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

      " जागे व्हा ! परमेश्वराची दिव्य हाक ऐका . मोक्षप्राप्तीसाठी आता , याक्षणी निकराचे प्रयत्न करा ."
पुष्प २४ पुढे सुरु 

          गेली ७२ वर्षे मी स्वामींवर एकाग्रतेने प्रेमाचा वर्षाव केला . त्यामुळे विश्वाची भ्रमणकक्षा बदलली . माझे प्रेम विश्वव्याप्त होऊन सर्व वसंतमयम् झाले . यापूर्वी प्रेम प्रवेशित कसे होते हे मी छोट्या प्रमाणात दर्शविले . नंतर हे प्रेम विस्तारीत स्तरावर कार्यरत झाले . प्रेम करणे कोणी कोणाला शिकवू शकत नाही . ते आपोआप येते व वृद्धिंगत होते . मुल लहानाचे मोठे होते . शिकते नंतर त्याचे लग्न होते . पत्नी , मुले , कुटुंब या सर्व गोष्टी  मागोमाग येतात . मनुष्याला त्यांच्या विषयी आसक्ती व ममता असते . कौटुंबिक जीवन कसे जगावे हे त्याला कोण शिकवतो ? कोणीही नाही ! कॉलेजमध्ये एखादा खास अभ्यासक्रम बनवून शिकवू शकतीलही , परंतु हे सर्व त्यांना आपोआपच माहित असते . हे कसे काय ? हे सर्व अनेक जन्मांचे अर्जित आहे . 
           माणसाला या गोष्टींची माहिती उपजत असते . पण परमेश्वरावर प्रेम कसे करावे हे तो जाणत  नाही . कारण जन्मजन्मांतरी तो हे कधी शिकलाच नाही . किती विचित्र जग आहे हे ? कोणी याचा विचार करतो कां ? ' मी व माझे ' मात्र कोणीही न शिकवताच येते . भगवत् भक्ती मात्र अनायास येत नाही . युगानुयुगे मनुष्य कौटुंबिक जीवन जगतो त्यामुळे त्याला भौतिक जीवनाविषयीची सर्व माहिती असते . परंतु भगवत्  भक्ती त्याच्यासाठी अपरिचित आहे . 
          स्वामींनी एका कार्डाद्वारे सर्वकाही स्पष्ट करून सांगितले . स्वामींच्या ३१ जुलैच्या प्रवचनावर मी विवरण करावे असे त्यांनी मला आता सांगितले . राखाडी रंगाच्या मण्यांनी मातेची ममता तर विशुद्ध प्रेम हिऱ्यांनी दर्शविले . कार्डावरील कृष्णाला त्या दोहोनी सुशोभित केले होते . आसक्ती व माया पुरे ! जागे व्हा . स्वामींचे शब्द आचरणात आणा . हा महामहीम अवतार भूतलावर अवतरला आहे त्याचा तुम्ही पुरेपुर लाभ घेतला पाहिजे . 

जय साईराम

व्ही. एस.

रविवार, ३ ऑगस्ट, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

       " साधना , साधना , साधना ! केवळ साधनेद्वारे जीव शिव बनतो ." 

पुष्प २४ पुढे सुरु 

    यशोदा पुन्हा राधेला सांगते , 
          ' राधे , आतापर्यंत माझ्यावर अहंकार व अज्ञानाचा पगडा होता . तू तो दूर करून माझे डोळे उघडलेस . ह्या जगात कृष्णावर माझ्याहून अधिक प्रेम करणारे कितीतरी लोक असतील . परंतु माझ्या अज्ञानामुळे मला वाटे की माझे कृष्णावरील प्रेमच सर्वश्रेष्ठ आहे . हे चूक आहे . कृपया तू अनुसरत असलेल्या प्रेममार्गाची शिकवण तू मला दे ......' 
           यशोदा तिला म्हणते की तिने यशोदेचे डोळे उघडले व नंतर तिच्या कृष्णप्रेमाबद्दल अधिक स्पष्ट करून सांगावे असेही यशोदा राधेला सुचवते . इथेही सर्वांची मनोवस्था सारखीच आहे . ते म्हणतात , ' मी स्वामींच्या निकट आहे . स्वामी माझ्याशी बोलतात . मीच त्यांचा श्रेष्ठ भक्त आहे ! जेथे अहंकार तेथे अज्ञान . हे भगवंताच्या महान भक्तांमधेही आढळते. खरा भक्त कोण आहे हे केवळ भगवंतच जाणतो . आता आपण राधेने काय उत्तर दिले ते पाहू . 
         " हा विषय शिकविण्यासारखा अथवा देण्यासारखा नाही . जेव्हा तुम्हाला तुमच्या आत्मस्वरूपाचे ज्ञान होईल आणि तुमची कृष्णावर पूर्ण श्रद्धा बसेल तेव्हा ते प्रेम आपोआपच तुमच्यामधून अभिव्यक्त होईल." 
           तुम्ही भुकेले असताना तुमच्यासाठी दुसरे कोणी खाऊन तुमची क्षुधा शमणार नाही . तुमचे तुम्हीच खायला हवे . त्याचप्रमाणे ही उच्च भक्ती वा प्रेम कोणी कोणाला देऊ शकत नाही . याकरिता तुम्हाला आध्यात्मिक भूक असणे आवश्यक आहे . तुम्ही परमेश्वरासाठी अश्रू ढाळायला हवेत . तरच तो तुमच्याकडे येईल . 
           माझी गोष्ट वेगळी आहे . मी सर्वांना माझी प्रेमशक्ती द्यावी असे स्वामींनी मला सांगितले . मी हजारो लोकांना , नद्यांना , महासागरांना , एवढेच नव्हे तर प्राण्यांनाही माझी प्रेमशक्ती प्रदान केली . महान अवतारकार्य कसे घडते याचे हे प्रात्यक्षिक आहे . स्वामींनी मला हे अल्प प्रमाणात दाखवले . एक उदाहरण देते . पृथ्वी म्हणजे काय ? तिचे कार्य कसे चालते ? हे सर्व विद्यार्थ्यांना पृथ्वीचा छोटा गोल दाखवून शिकवले जाते . विज्ञानाच्या तासाला , प्रयोग शाळेत प्रयोग करून अनेक क्लिष्ट विषय सोप्या पद्धतीने समजावून दिले जातात . त्याचप्रमाणे स्वामींनी हे अगोदर दाखविले तथापि त्यांच्यापैकी कोणीतरी हे सिद्ध करू शकेल कां की त्यांना परमेश्वराप्रती पूर्ण प्रेम निर्माण झाले ? नाही ! ते त्यांच्यामध्ये येणार नाही . कोणी दिल्याने ते प्राप्त होऊ शकत नाही . सर्वतोपरी प्रयत्न केले तरच हा विशुद्ध प्रेमभाव उत्पन्न होईल . आसक्तीची बंधने झुगारून दिल्यास मार्ग मोकळा होईल .


उर्वरित वसंतामृत पुढील भागात  ......

जय साई राम