रविवार, १० ऑगस्ट, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

     " मनामध्ये सदैव सद्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती यांच्यामध्ये लढा चालू असतो . मनुष्याने आत्मविश्लेषण करून मनाचे मंथन केले पाहिजे . " 

वसंतामृतमाला

पुष्प २५ 

आमचे आगळे विश्व
        मला माझ्या एका जुन्या डायरीतील मजकूर पहायचा होता . मी सहज २९ ऑक्टोबर १९९५ या पानावर नजर टाकली . स्वामींनी  त्यातील काही नोंदी लाल शाईने अधोरेखित केल्या होत्या असे मला आढळून आले . त्या पानाच्या वरील समासात निम्नलिखित ओळ लिहून अति महत्वाचे असा शेरा मारला होता .
            " ती खरोखर मनरहित अवस्थेत जाऊ इच्छिते कां ? " 
आता आपण डायरीतील नोंद पाहू . 
२९ ऑक्टोबर १९९५ मध्यरात्रीचे २:३० 
            मी मध्यरात्रीच जागी झाले . स्वामींच्या विचारानी मला झोप येत नव्हती . मी रडत होते . मग मी लिहायला सुरुवात केली. 
        " स्वामी , मला उच्च मनरहित अवस्था प्राप्त होऊ दे . तुम्ही पूर्वी सांगितले होते की भक्ताने साधनेचा मार्ग मधेच सोडून देणे योग्य नाही . माझ्या गुरुनी माझा त्याग करून साधना मार्गावर मला मधेच सोडून दिले तर ते अयोग्य नाही कां ? मी मनरहित अवस्थेत कशी पोहोचणार ? मनरहित अवस्था मी कशी प्राप्त करू ? तुम्ही मला मार्ग दाखविणार नाही कां ? असे असेल तर मला हे जीवन नको .  "
*     *     *
          
          विलाप करीत मी लिहिले . माझ्या लिखाणातील हा छोटासा भाग स्वामींनी अधोरेखित करून त्या पानावरील वरच्या समासात ' ती खरोखर मनरहित अवस्थेत जाऊ इच्छिते कां ? '  असा प्रश्न लिहिला व तेथे अति महत्वाचे असा शेराही मारला . नंतर मला यावर लेखन करण्यास सांगितले . 
          १० मे च्या ध्यानात मी स्वामींना विचारले , " मनरहित अवस्था म्हणजे काय ? " स्वामी उत्तरले की,  या अवस्थेत असलेले शांत व स्थितप्रज्ञ असतात . ते आपले भाव व्यक्त करीत नाहीत . त्यांची अवस्था व माझी अवस्था वेगळी आहे . मी माझे वेगवेगळे भाव स्वामींकडे व्यक्त करत असते . माझे भाव स्तुपामध्ये प्रवेशित होऊन सर्वांचे परिवर्तन करतात . साधारणपणे जडभरता सारखे महान भक्त व महाज्ञानी मनरहित अवस्थेत शांत असतात . यांना स्थितप्रज्ञ म्हणतात . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......

जय साई राम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा