ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" साधना , साधना , साधना ! केवळ साधनेद्वारे जीव शिव बनतो ."
पुष्प २४ पुढे सुरु
' राधे , आतापर्यंत माझ्यावर अहंकार व अज्ञानाचा पगडा होता . तू तो दूर करून माझे डोळे उघडलेस . ह्या जगात कृष्णावर माझ्याहून अधिक प्रेम करणारे कितीतरी लोक असतील . परंतु माझ्या अज्ञानामुळे मला वाटे की माझे कृष्णावरील प्रेमच सर्वश्रेष्ठ आहे . हे चूक आहे . कृपया तू अनुसरत असलेल्या प्रेममार्गाची शिकवण तू मला दे ......'
यशोदा तिला म्हणते की तिने यशोदेचे डोळे उघडले व नंतर तिच्या कृष्णप्रेमाबद्दल अधिक स्पष्ट करून सांगावे असेही यशोदा राधेला सुचवते . इथेही सर्वांची मनोवस्था सारखीच आहे . ते म्हणतात , ' मी स्वामींच्या निकट आहे . स्वामी माझ्याशी बोलतात . मीच त्यांचा श्रेष्ठ भक्त आहे ! जेथे अहंकार तेथे अज्ञान . हे भगवंताच्या महान भक्तांमधेही आढळते. खरा भक्त कोण आहे हे केवळ भगवंतच जाणतो . आता आपण राधेने काय उत्तर दिले ते पाहू .
" हा विषय शिकविण्यासारखा अथवा देण्यासारखा नाही . जेव्हा तुम्हाला तुमच्या आत्मस्वरूपाचे ज्ञान होईल आणि तुमची कृष्णावर पूर्ण श्रद्धा बसेल तेव्हा ते प्रेम आपोआपच तुमच्यामधून अभिव्यक्त होईल."
तुम्ही भुकेले असताना तुमच्यासाठी दुसरे कोणी खाऊन तुमची क्षुधा शमणार नाही . तुमचे तुम्हीच खायला हवे . त्याचप्रमाणे ही उच्च भक्ती वा प्रेम कोणी कोणाला देऊ शकत नाही . याकरिता तुम्हाला आध्यात्मिक भूक असणे आवश्यक आहे . तुम्ही परमेश्वरासाठी अश्रू ढाळायला हवेत . तरच तो तुमच्याकडे येईल . माझी गोष्ट वेगळी आहे . मी सर्वांना माझी प्रेमशक्ती द्यावी असे स्वामींनी मला सांगितले . मी हजारो लोकांना , नद्यांना , महासागरांना , एवढेच नव्हे तर प्राण्यांनाही माझी प्रेमशक्ती प्रदान केली . महान अवतारकार्य कसे घडते याचे हे प्रात्यक्षिक आहे . स्वामींनी मला हे अल्प प्रमाणात दाखवले . एक उदाहरण देते . पृथ्वी म्हणजे काय ? तिचे कार्य कसे चालते ? हे सर्व विद्यार्थ्यांना पृथ्वीचा छोटा गोल दाखवून शिकवले जाते . विज्ञानाच्या तासाला , प्रयोग शाळेत प्रयोग करून अनेक क्लिष्ट विषय सोप्या पद्धतीने समजावून दिले जातात . त्याचप्रमाणे स्वामींनी हे अगोदर दाखविले तथापि त्यांच्यापैकी कोणीतरी हे सिद्ध करू शकेल कां की त्यांना परमेश्वराप्रती पूर्ण प्रेम निर्माण झाले ? नाही ! ते त्यांच्यामध्ये येणार नाही . कोणी दिल्याने ते प्राप्त होऊ शकत नाही . सर्वतोपरी प्रयत्न केले तरच हा विशुद्ध प्रेमभाव उत्पन्न होईल . आसक्तीची बंधने झुगारून दिल्यास मार्ग मोकळा होईल .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा