गुरुवार, २८ ऑगस्ट, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " जो दुसऱ्याला काया, वाचा, मनाने दुखवत नाही तो खरा साधक होय ." 

पुष्प २५ पुढे सुरु 

          आता आपण या विषयी पाहू . मी स्वामींच्या सान्निध्यासाठी तळमळते आहे . " स्वामी कधी येणार ? " हा एकच प्रश्न मी सतत विचारते आहे . स्वामींच्या विरहाने लोक व्यथित का होत नाहीत ? सर्वजण ही घटना सहजपणे स्वीकारताना दिसतात . मी एकटीच असा करूण विलाप कां करते आहे ? साधक साधना करतात त्यांना आत्मसाक्षात्कार होतो . अखेरीस देहत्याग करून ते परमात्म्यामध्ये विलीन होतात . तथापि मला माझा देह स्वामींना समर्पित करायचा आहे . आत्म्याचा परमात्म्याशी योग म्हणजे लय . इथे जीव पुन्हा जन्म घेत नाही . मला माझा देह परमेश्वराला अर्पण करायचा आहे ; ते सुद्धा देही परमेश्वराला.  मला देहधारी भगवंताचे सान्निध्य हवे आहे . 
          भौतिक दृष्ट्या शारिरीक सान्निध्य म्हणजे वासना . यातून काम संतती जन्मास येते . स्वामींच्या देहाचे सान्निध्य लाभता काम ज्ञानात परिवर्तित होतो . जेव्हा स्वामी व मी एकमेकांना पाहू , स्पर्श करून संभाषण करू तेव्हा आमचे भाव स्तूपाद्वारे विश्वात व्याप्त होतील . यामधून नवनिर्मिती होईल . केवळ ह्याच कारणास्तव मी विरह वेदना सोसते आहे . हे अवतार कार्य आहे . या विरहानंतर शिव व शक्ती एकत्र येतील , त्यांचा योग होईल . 
           आज दुपारी स्वामींनी चांदीचा बाऊल दिला . त्याच्या काठाला ३ रिबीनी लावल्या होत्या आणि दोन्ही बाजूना ६ नागमोडी वळणे होती . त्या बाऊलला गणपतीच्या सोंडेच्या आकाराचे तीन पाय होते . बाऊलच्या आत ९२५ हे आकडे कोरले होते . 
१२ मे २०१३ ध्यान
वसंता :-  हा चांदीचा कुंडा कशासाठी ?
स्वामी :-  सकाळी तू मला विचारलेस , " मला चांदी देण्यातही काही अडचणी आहेत का ?" म्हणून मी तो दिला . 
वसंता :-  ह्याचे मी  काय करू ? ह्यातून काय सूचित होते ? 
स्वामी :-  परमेश्वर आणि त्याची शक्ती १६ कला व षड्गुणांनी युक्त आहेत . ते आणि निर्मिती एकच आहेत. ही नवनिर्मिती आहे . हे नवविश्व ज्ञानमुक्ती विनायकाने केलेले आहे . ह्या कुंड्यामध्ये छोट्या पादुका ठेव . तुझे विश्व पादुकाविश्व आहे . तुझ्या भावविश्वाद्वारे तू तुझ्या पादुका विश्वाचे नवनिर्मितीत रुपांतर करतेस .  
वसंता :-  आता मला समजले, स्वामी .
ध्यान समाप्त 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात ....

जय साई राम    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा