गुरुवार, ७ ऑगस्ट, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

      " जागे व्हा ! परमेश्वराची दिव्य हाक ऐका . मोक्षप्राप्तीसाठी आता , याक्षणी निकराचे प्रयत्न करा ."
पुष्प २४ पुढे सुरु 

          गेली ७२ वर्षे मी स्वामींवर एकाग्रतेने प्रेमाचा वर्षाव केला . त्यामुळे विश्वाची भ्रमणकक्षा बदलली . माझे प्रेम विश्वव्याप्त होऊन सर्व वसंतमयम् झाले . यापूर्वी प्रेम प्रवेशित कसे होते हे मी छोट्या प्रमाणात दर्शविले . नंतर हे प्रेम विस्तारीत स्तरावर कार्यरत झाले . प्रेम करणे कोणी कोणाला शिकवू शकत नाही . ते आपोआप येते व वृद्धिंगत होते . मुल लहानाचे मोठे होते . शिकते नंतर त्याचे लग्न होते . पत्नी , मुले , कुटुंब या सर्व गोष्टी  मागोमाग येतात . मनुष्याला त्यांच्या विषयी आसक्ती व ममता असते . कौटुंबिक जीवन कसे जगावे हे त्याला कोण शिकवतो ? कोणीही नाही ! कॉलेजमध्ये एखादा खास अभ्यासक्रम बनवून शिकवू शकतीलही , परंतु हे सर्व त्यांना आपोआपच माहित असते . हे कसे काय ? हे सर्व अनेक जन्मांचे अर्जित आहे . 
           माणसाला या गोष्टींची माहिती उपजत असते . पण परमेश्वरावर प्रेम कसे करावे हे तो जाणत  नाही . कारण जन्मजन्मांतरी तो हे कधी शिकलाच नाही . किती विचित्र जग आहे हे ? कोणी याचा विचार करतो कां ? ' मी व माझे ' मात्र कोणीही न शिकवताच येते . भगवत् भक्ती मात्र अनायास येत नाही . युगानुयुगे मनुष्य कौटुंबिक जीवन जगतो त्यामुळे त्याला भौतिक जीवनाविषयीची सर्व माहिती असते . परंतु भगवत्  भक्ती त्याच्यासाठी अपरिचित आहे . 
          स्वामींनी एका कार्डाद्वारे सर्वकाही स्पष्ट करून सांगितले . स्वामींच्या ३१ जुलैच्या प्रवचनावर मी विवरण करावे असे त्यांनी मला आता सांगितले . राखाडी रंगाच्या मण्यांनी मातेची ममता तर विशुद्ध प्रेम हिऱ्यांनी दर्शविले . कार्डावरील कृष्णाला त्या दोहोनी सुशोभित केले होते . आसक्ती व माया पुरे ! जागे व्हा . स्वामींचे शब्द आचरणात आणा . हा महामहीम अवतार भूतलावर अवतरला आहे त्याचा तुम्ही पुरेपुर लाभ घेतला पाहिजे . 

जय साईराम

व्ही. एस.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा