गुरुवार, १४ ऑगस्ट, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

    " परमेश्वराप्रती असणारे प्रेम , हृदयाच्या गाभ्यामधून महापूराच्या लोंढ्यासारखे दुथडी भरून वाहायला हवे . " 


पुष्प २५ पुढे सुरु

          
          संसारी माणसांचे निरनिराळे भाव अहंकारी मनाद्वारे व्यक्त होतात . भाव विचारांमध्ये परिवर्तित होऊन विचारांचे संस्कार बनतात . ह्या संस्कारांमुळेच मनुष्य पुनः पुन्हा जन्म घेऊन मृत्यू पावतो . मी दररोज साश्रू नयनांनी स्वामींपाशी हजारो भाव व्यक्त करते . काहीही वाचले की रडतच मी विचार करते .
' मी त्यांच्या सारखी कां नाही ?' 
          डायरीतील मजकूर लिहिण्याच्या काळात स्वामी माझ्याशी ध्यानात बोलत नव्हते . मी दिवसरात्र अश्रू ढाळत माझे भाव व्यक्त करत असे . मनाला क्षणाचीही उसंत नसे . मी स्वामींपाशी अव्याहत भाव व्यक्त करत असे . 
१३ मे २०१३ सकाळचे ध्यान 
 वसंता - स्वामी , मी आता ध्यान करू शकत नाही . विवेकानंद जेव्हा ध्यानाला बसत तेव्हा त्यांच्या संपूर्ण अंगावर ब्लॅंकेट पांघरल्यासारखे डास बसलेले असत . ब्रम्हानंद उर्फ तुर्यानंद यांनी ऑपरेशनच्या वेळी मन देहापासून वेगळे केले होते . मी असे गहन ध्यान का नाही करू शकत ? 
स्वामी - तू सर्वांहून वेगळी आहेस . तू अगोदरच तुझे मन देहापासून वेगळे केले आहेस . त्यांनी शांत तप केले . तू भावदर्शन करण्यासाठी आली आहेस . क्षणोक्षणी निर्मितीमध्ये बदल होत असतात . घड्याळ्यातील अविरत फिरणाऱ्या सेकंद व मिनिट काट्यांप्रमाणे  हालचाल व बदल म्हणजेच निर्मिती . तू प्रकृती , निर्मिती आहेस . छोटे बालक व रोपटे क्षणाक्षणाला वाढत असते . तुझे भाव त्यांच्यासारखे आहेत . सतत बदलते . म्हणून तू शांतपणे ध्यान करू शकत नाहीस . 
वसंता - आता मला समजले स्वामी . 
ध्यान समाप्त . 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात ….. 

जय साई राम
       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा