रविवार, २४ ऑगस्ट, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

     " आपला जन्म कसा झाला हे महत्वाचे नसून आपला मृत्यु कसा होतो हे महत्वाचे आहे ". 

पुष्प २५ पुढे सुरु 

         माझ्या जन्माद्वारे स्वामींपासून आद्य निर्मिती होते हे उघड झाले आहे . माझी काया स्वामींच्या देहात विलीन होईल . हे लयाचे निदर्शक आहे . परमेश्वरापासून अस्तित्वात आलेली सृष्टी पुन्हा परमेश्वरामध्ये विलीन होते, याला लय म्हणतात . मी व स्वामी या तत्वाचे प्रात्यक्षिक करण्यासाठी इथे आलो . ' इथेच याक्षणी मुक्ती ' या पुस्तकाच्या तिसऱ्या भागात ' मी ॐ नमो नारायणाय ' या मंत्राचा जप करू नये असे स्वामींनी सांगितले . ते पुढे म्हणाले , " तू हा जप केलास तर समाधी अवस्थेत जाशील ". मी समाधी अवस्था प्राप्त करण्यासाठी भूतलावर आले नाही . जन्मापासून मन आणि देह पृथक असलेल्या अवस्थेत मी आहे . मला ह्याची कल्पना नाही म्हणून मी स्वामींना विचारले . जन्मापासूनच मन स्वामींबरोबर तर काया या भूलोकात अशा अवस्थेत मी आहे . स्वामींनी माझे मन त्यांच्यापाशी ठेऊन घेतले आणि देह या जगात पाठविला . माझे ११ मे २०१३ चे ध्यान यासाठी समर्पक आहे . 
११ मे २०१३ सकाळचे ध्यान 
वसंता :- स्वामी , ' मी येईन , नक्की येईन ' असे सांगून तुम्ही मला का फसवता ? केव्हा येणार तुम्ही ? मला तुमचे सान्निध्य हवे आहे . 
स्वामी :- मी नक्की येईन . रडू नकोस . हे सर्व अवतारकार्यासाठी आहे . सामान्य व्यक्ति आत्मस्वरूप जाणून परमात्म्यात , शुद्ध सत्वामध्ये , चैतन्यात विलीन होतात . परंतु तू सदैव देहाचा विचार करतेस . आत्मा म्हणजे लय , विलयन . देह म्हणजे वृद्धी . तू देहाच्या सान्निध्यासाठी कां आग्रह धरतेस ? तुला देही भगवंताचे सान्निध्य का हवे आहे ? भौतिक दृष्टीकोनातून ही वासना आहे . परंतु तू ही वासना ज्ञानात परिवर्तित केलीस . देहाचे सान्निध्य म्हणजे निर्मिती . आत्मा म्हणजे लय , योग . देह म्हणजे वृद्धी यातूनच निर्मिती होते . 
वसंता :- आता मला समजले स्वामी . जन्मापासून आतापर्यंत माझे जीवन एक काल्पनिक विश्व आहे . 
स्वामी :- नाही , ते लवकरच सत्यात उतरेल . मी आलो की सर्व वास्तव होईल . 
ध्यान समाप्त 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ....

जय साई राम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा