गुरुवार, २१ ऑगस्ट, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

       " परमेश्वरामध्ये समरस झालेला मनुष्य केवळ एकच गोष्ट जाणतो . परमेश्वर, परमेश्वर आणि परमेश्वर ! "

पुष्प २५ पुढे सुरु

           बऱ्याच दिवसांपासून मी समाधानकारक ध्यान करू शकत नव्हते . माझी शारिरीक पिडाही वाढली . विवेकानंद ध्यानाला बसले की त्यांच्या अवघ्या देहावर डास बसले तरी त्यांना ते जाणवत नसे कारण त्यावेळी त्यांचे मन परमेश्वराशी ऐक्य पावलेले असे . त्यांचे देहभान नाहीसे होई . ब्रम्हानंदांनी ( तुर्यानंद ) त्यांच्या ऑपरेशनला किती वेळ लागेल असे विचारून ऑपरेशनच्या आधी १० मिनिटे त्यांनी ध्यान लावले . त्या दरम्यान त्यांचे मन परमेश्वराशी एकरूप झाले होते . डॉक्टर ऑपरेशन करत असता त्यांच्या शरीराने कोणतीही प्रक्रिया दर्शविली नाही . गुंगी दिलेल्या माणसासारखे ते बेशुद्धावस्थेत होते . त्यांनी ऑपरेशन झाल्यानंतर डोळे उघडले . मी असे कां बंर करू शकत नाही ? असे मी स्वामींना विचारले असता ते उत्तरले की, मी प्रकृति निर्मिती आहे ; आणि वैश्विक अवस्था दाखविण्यासाठी मी येथे आले आहे . 
           निर्मितीतील प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते . अस्थिरता म्हणजे निर्मिती . रोपटे वृक्षात परिवर्तित होते . छोट्या बालकाचे मानवात परिवर्तन होते . निर्मितीचा सतत बदलत राहण्याचा गुणधर्म दाखविण्यासाठी स्वामींनी घड्याळाला काट्यांचे उदाहरण दिले . घड्याळ्यातील सेकंद काटा न् मिनीट काटा सतत फिरत राहून वेळ दाखवितो . सूर्य उदय पावतो व अस्तास जातो . दिवस मावळून रात्र होते . दिवसांचा सप्ताह होतो, सप्ताहाचा महिना आणि नंतर एक वर्ष होते . हे दर्शविण्यासाठी मी इथे आले आहे . माझा प्रत्येक भाव केवळ स्वामींसाठी असतो . इथे मन आणि देह वेगळे करायची मला गरज नाही . माझे सर्व भाग केवळ स्वामींशी निगडीत असतात . माझी ही काया स्वामींकरिताच आहे .

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......

जय साई राम    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा