गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

" भक्तीचे विस्तृतीकरण म्हणजेच ज्ञान ."

पुष्प २८ पुढे सुरु

७ जुलै २०१३ , प्रातः ध्यान 
वसंता : स्वामी , तुम्ही यायलाच हवे . तुम्ही २७ मे ह्या आपल्या विवाह दिनासाठी मंगळसूत्र दिलेत ; नंतर आपल्या वडकमपट्टीला संपन्न झालेल्या १९ जून ह्या विवाह दिनाकरिता दुसरे मंगळसूत्र दिलेत . आता गुरुपौर्णिमा येत आहे . व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने  तुम्ही मला काही देणार नाही का ? 
स्वामी : चल , आपण स्वर्गलोकात जाऊ . 
दिव्य दृश्य 
            स्वामींसमवेत मी स्वर्गात प्रवेश केला . सर्वजण  आले . मी व्यासऋषींना म्हटले , " हे व्यास भगवान , स्वामींच्या येण्यासाठी तुम्ही कृपा करून काहीतरी करा . 
व्यास म्हणाले , " स्वामी नक्की येतील ! " नंतर इंद्रानी विनंती केली , " स्वामी सर्व देव तुमचे दर्शन घेऊ इच्छितात ." स्वामी म्हणाले , " ठीक आहे . त्या सर्वांना इकडे येण्यास सांग . " सर्व देव आले . वरूण  देवाने स्वामींना विचारले , " स्वामी आम्हाला  खूप त्रास भोगावा लागत आहे . या कलियुगात आम्हाला  अडचणींना तोंड द्यावे लागत आहे .  आम्ही अम्मांचा आश्रय घेऊन  त्यांच्या देहात प्रवेश केला . आता आम्ही बाहेर पडू . " सर्वजण  रजा घेतात .
वसंता : स्वामी, याचा अर्थ काय ? 
स्वामी :  ह्या कलियुगातील प्रचंड प्रदूषणामुळे सर्व  देवांनी तुझ्या देहामध्ये आसरा घेतला . तू आदिशक्ती आहेस . पंचमहाभूते प्रथम तुझ्या देहातून बाहेर पडतील . 
वसंता : स्वामी तुम्ही सांगितल्यानुसार , जगामध्ये ९१ भूकंप आणि ९ ज्वालामुखींचा उद्रेक झाला . हे मी कसे बरं थांबवले ? 
स्वामी : या  घटना याहून  खूप मोठ्या प्रमाणात घडल्या असत्या परंतु तू त्यांना प्रतिबंध करून त्यामुळे होऊ घातलेला महासंहारही थांबवलास . हे सर्व तुझ्या देहावर झेलून तू ह्या यातना सोसत आहेस .
ध्यान समाप्त 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ….. 

जय साई राम          

रविवार, २६ ऑक्टोबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार 

     " जेव्हा इंद्रियांवर नियंत्रण असते तेव्हा मन आपोआपच नियंत्रित होते . "

पुष्प २८ पुढे सुरु 

              ६ जुलैच्या संध्याकाळी मी एडीना म्हटले की जगामध्ये कोठे भूकंप झाला आहे का ते पहा . त्यांनी पाहिल्यानंतर , ९१ ठिकाणी भूकंप झाल्याचे आणि ९ ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याचे त्यांना आढळले . या घटना ४ व ५ जुलै रोजी घडल्या. अॅलर्जीमुळे माझ्या दोन्ही पायांना , डोक्यामध्ये व संपूर्ण त्वचेवर जखमा झाल्या होत्या . स्वामींनी सांगितले की वायुतत्व व स्पर्शसंवेदना यासाठी हे तुला होत आहे . माझ्या त्वचेवर त्याचा अधिक परिणाम झाला होता . गेली अनेक वर्षे मला अॅलर्जीचा त्रास आहे . स्पर्श संवेदना हे मानवाच्या जन्ममृत्यूचे कारण आहे . मनुष्याच्या अनुचित स्पर्शामुळे वायू  प्रदूषित झाला आहे . 
             ह्यानंतर मला दातदुखी सुरु झाली . माझं डोकं , मान व कानांत अतिशय वेदना होत होत्या . दंतवैद्याने काही औषधे दिली . मुख जलतत्वाशी संबंधित आहे . त्याचवेळी स्वामींनी मला गंगेविषयी लिहिण्यास सांगितले . मी लिहिल्यानंतर गंगेला महापूर आला . ज्या महापुराने संपूर्ण जगाला अपरिमित हानी पोहोचली असती , तो जलप्रलय  थांबविण्यात  आला. 
           अग्नितत्वाच्या प्रदूषणामुळे माझ्या शरीरात न्  मस्तकात दाह होत आहे . मी केस धुवून स्नान केले . डोके पुसत असताना खूप उष्णता जाणवत होती . विमला माझ्या पायांना तेल लावताना म्हणाल्या की त्यांच्या हाताला भाजल्यासारखी जाणीव होत होती . हा अग्नि आहे . अशा तऱ्हेने मी सर्व पंचमहाभूतांपासून ओढवणाऱ्या आपत्ती थांबविल्या . 
            साधारणतः प्रलयानंतर कलियुग संपुष्टात येते व नवयुग निर्माण होते . आता स्वामी प्रलयाविना सत्ययुग आणत आहेत . मी प्रकृति असल्याने माझ्यावर सर्वाधिक परिणाम होतो. ६ तारखेच्या रात्री मी एक नवीन औषध घेतले. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .......

जय साई राम 
                    

गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार


प्रेम स्वरुपांनो ,
          " दिव्य अवतारांसाठी जन्म दिवसांसारखे विशेष दिवस नसतातच , ज्या दिवशी तुमच्या हृदयात पवित्र विचार उपजतील , वृत्ती आणि वर्तनात बदल होईल , शुद्ध आणि निस्वार्थी भावाने तुम्ही सेवा करण्याचा निश्चय कराल , तो दिवस तुमच्यासाठी दिव्यत्वाचा जन्म दिवस असेल . " 
                                                                     बाबा



श्री वसंतासाईच्या ( अम्मा ) जन्मदिनानिमित्य


             स्वामींचा जन्म २३-११-१९२६, सोमवार, पौर्णिमेला झाला . माझा जन्म २३-१०-१९३८ रविवार, अमावस्येला झाला . चंद्र प्रेमाशी संबंधित आहे, तो प्रेमाचा पुरस्कर्ता आहे तर सूर्य ज्ञानाचा पुरस्कर्ता आहे . अमावस्येच्या दिवशी त्या दोघांची भेट होते . सूर्य आणि चंद्र यांचा संयोग हा ज्ञान आणि प्रेम यांच्या संयोगाचे प्रतिक आहे . नरकासुर वधाचे स्पष्टीकरण देताना स्वामी म्हणाले की, मी सर्वांमध्ये ज्ञानाग्नी चेतवून त्यांच्यातील अज्ञानरुपी अंधःकारचा नाश करेन . सोमवार - चंद्राचे प्रतिक व रविवार - सूर्याचे प्रतिक सूर्यामधून ज्ञानोदय झाला . अज्ञानाचा अंधःकार नाहीसा करण्यासाठी माझा जन्म रविवारी झाला . 
             स्वामी आनंद आहेत , तर मी अश्रूंमध्ये बुडालेली आहे . हे वैधर्म्य का ? याच उत्तर स्वामींनी ' इथेच , या क्षणी , मुक्ती ' या पुस्तकाच्या पहिल्या भागातच दिले आहे . आम्ही दोघं, एक धनभारित तर दुसरा ऋणभारित . जसे धनभारित ( positive ) आणि ऋणभारित ( negative ) टोकं एकत्र आल्यावर शक्तिशाली विद्युत उर्जेची निर्मिती होते तसे स्वामींच माझ्यावरील प्रेम आणि माझं स्वामींवरील प्रेम शक्तिशाली कृपा लहरींमध्ये बदलते आणि अखिल जगतावर अनुग्रह करते .





पुष्प २८ पुढे सुरु

            आता आपण या विषयी पाहू . गेले तीन दिवस मी शिंकांनी बेजार झाले आहे . याची सुरुवात ४ जुलैला झाली . मला अगदी असह्य झाल्यामुळे मी स्वामींना याचं कारण विचारले . स्वामी म्हणाले , " पृथ्वी तत्वाशी संबंधित स्तूपाच्या ५ व्या प्रकाराचा निर्देश करते . मी सहन करत असलेल्या क्लेशांद्वारे जगावर कोसळणाऱ्या मोठमोठ्या आपत्ति टाळल्या जातात . तसेच तीव्र भूकंप व ज्वालामुखीचा उद्रेक या सारख्या नैसर्गिक आपत्तिंमधून होणारा भयानक संहार थांबविला जात आहे . मी अनेक डॉक्टरांकडून औषधोपचार घेतला परंतु गुण आला नाही . देहाच्या गाभ्यामधून येणाऱ्या शिंकानी माझा जीव अगदी हैराण झाला होता . अंगदुखीमुळे मला चालणेही अशक्य झाले होते . भयानक त्रास होत होता . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......

जय साई राम 
     

रविवार, १९ ऑक्टोबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

        " जेथे मनुष्याची नजर जाते त्यामागे त्याचे मन धावते आणि इच्छांचा जन्म होतो . "

पुष्प २८ पुढे सुरु

             १४ जूनला गंगेविषयी लिखाण देऊन स्वामींनी मला लिहिण्यास सांगितले . १९ जून , माझा वडक्कमपट्टीमध्ये झालेल्या विवाहाचा दिवस . स्वामींनी मला नवीन मंगळसूत्र देऊन आधीचे बदलण्यास सांगितले . विवाहाला बरीच वर्षे झाल्याने मला विवाहाची तारीख लक्षात नव्हती , परंतु स्वामींनी मला आठवण करून दिली . मी गंगेविषयी लिहिल्यानंतरच केदारनाथचा संहार झाला . माझ्या प्रेमरूपी अश्रूगंगेचा आवेग एवढा शक्तिशाली आहे की तो संपूर्ण जगाचा नाश करू शकतो . म्हणून भगवान शिवाने माझ्या अश्रू गंगेला आपल्या मस्तकावर धारण केले . संहार घडण्याअगोदर स्वामींनी मला गंगेविषयी लिहिण्यास सांगून हे सिद्ध केले . इंद्रादिकानी स्वामींकडे प्रार्थना केली की माझ्या अश्रूंनी संपूर्ण जगाचा संहार होण्याची शक्यता आहे . केदारीच्या घटनेद्वारे स्वामींनी हे दर्शवले . मी खोली बदलल्यानंतर माझ्या शिंका थांबत नव्हत्या , नाकातून सतत पाणी वाहत होते . कोणत्याही औषधाने मला आराम पडला नाही . साश्रू नयनांनी मी स्वामींनाच या विषयी विचारले ; स्वामी उत्तरले , " तीन दिवसात सर्व काही ठीक होईल . "
६ जुलै २०१३ प्रातः ध्यान
वसंता : स्वामी मी अशी का आहे ? मला या शिंका असह्य झाल्या. 
स्वामी : जगातील नैसर्गिक आपत्ती तुझ्या ह्या सोसण्याद्वारे थांबतात . तू मोठा भूकंप व ज्वालामुखीचा उद्रेक या सारख्या घटना घडण्यास प्रतिबंध करतेस . त्वचा व वायूतत्वासाठी तुझे चरण अन् मस्तक यातना सहन करत आहेत . जलतत्व-पूर आलेल्या गंगेसाठी तू दातदुखी भोगते आहेस . अंतरिक्षासाठी कानदुखी तर अग्नितत्वासाठी देहाचा व डोळ्यांचा दाह तुला होत आहे . 
वसंता : स्वामी , किती काळ मला असा त्रास होतोय ? हे सोसणे आता मला शक्य नाही . 
स्वामी : थोडा संयम ठेव . सर्वकाही ठीक होईल . 
ध्यान समाप्त . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......

जय साई राम  

गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार 

        " जन्मजात आपल्यामध्ये अमर्याद शक्ती असते . त्यायोगे मनुष्य पंचतत्वांनाही नियंत्रणात ठेवू शकतो . " 

पुष्प २८ पुढे सुरु 

३ जुलै , प्रातः ध्यान 
वसंता - स्वामी , प्लीज आश्रमवासी सदैव माझ्याबरोबर असावेत .
स्वामी - हो . सर्वजण तुझ्या सोबत असतील . मी तुला खोली बदलायला का सांगितले माहिती आहे ? तेथे तुझी स्पंदने भरून उरली आहेत . ही स्पंदने आश्रमवासीनमध्ये परिवर्तन करतील . तेथे ध्यान केल्याने त्यांना अधिक उर्जा मिळेल . 
वसंता - आता मला समजले स्वामी , मी लिहीन . केदारनाथ मंदिरावर अशी आपत्ती का ओढवली ? 
स्वामी - तुझ्या अश्रूरुपी प्रेमगंगेच्या वेगवान प्रवाहाने संपूर्ण जगाचा संहार झाला असता म्हणून शिवाने तिला आपल्या मस्तकावर धारण केले . मी तुला तुझा संदर्भ गंगेशी जोडून लिहिण्यास सांगण्याचे हे कारण . इंद्रादि देवांनी मला सांगितले की तुझ्या अश्रूंच्या आवेगात जगाचा संहार करण्याची ताकद आहे . केदारनाथच्या घटनेद्वारे हे दर्शविले गेले . 
ध्यान समाप्त . 
            आता आपण ह्या विषयी पाहू . स्वामींनी मला खोली बदलण्यास कां सांगितले ? आश्रमवासी मला सोडून जातील की काय अशी भीती मला वाटली . स्वामींनी नंतर सांगितले , " त्या खोलीत बसून ध्यान केल्याने तेथील स्पंदने त्यांचे परिवर्तन करतील ." त्या खोलीमध्ये माझी भावस्पंदने अधिक तीव्र आहेत . नंतर मी स्वामींना केदारनाथ मंदिरावर ओढवलेल्या आपत्तीचे कारण विचारले . तेथील संहाराचे फोटो आजच मी वर्तमानपत्रात पाहिले . बाहेरील जगात घडणाऱ्या घटनांची गंधवार्ताही आम्हाला नसते . वर्तमान पत्र पाहिल्यानंतर ही समग्र बातमी मला कळली . ही दुदैवी घटना १९ जूनला घडली . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साई राम

रविवार, १२ ऑक्टोबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

             " परमेश्वर म्हणजेच प्रेम , ही शिकवण होय आणि प्रेम म्हणजेच परमेश्वर हे आचरण होय . "

पुष्प २८ पुढे सुरु 

              स्वामींनी सांगितले की , त्यांना ज्ञात असलेले सर्व मला ही ज्ञात आहे तथापि माझे ज्ञान सुप्तावस्थेत आहे . माझा जन्म स्वामींपासून झाला असून मी त्यांची अर्धांगिनी आहे . मी सर्व जाणते परंतु मी ' मी विना मी ' अवस्थेत असल्यामुळे मला काहीही माहित नाही . जर मला ' मी ' असता तर मी स्वामींसारखे वेदवेदांतावर भाष्य केले असते . याने काय साध्य होणार ? यामुळे जगातील कोणामध्येही परिवर्तन घडले नसते . स्वामींनी ८४ वर्षे उपदेश केला , किती लोक बदलले ? नाहीच ! स्वामी जग परिवर्तनासाठी अवतरले . मी त्यांच्या  अवतार कार्यासाठी इथे आले . विरह वेदनांनी मी अश्रू ढाळते आहे , रडते आहे , आक्रोश करतेय . हे भाव स्तूपाद्वारे बहिर्गामी होत विश्वपरिवर्तन घडवतील . स्वामींच्या व माझ्या संभाषणाने बाह्य जगात ' विश्व गर्भ कोटम् ' चे मूर्तरूप धारण केले . हे आमचे हृदय आहे . येथून आमचे भाव स्तूपामध्ये प्रवेश करतात , स्तूपामधून बहिर्गमन करत विश्वामध्ये परिवर्तन घडवितात . स्वामी व मी विश्वपरिवर्तनासाठी इथे आलो . माझे भगवत्  स्वरूप व्यक्त करणे उपयोगाचे नाही . स्वामी व मी शिवशक्ती आहोत . आमचे भाव सर्वांमधील कुंडलिनी जागृत करत त्यांना जीवनमुक्त अवस्था प्रदान करतात . 
              मी माझी रहायची खोली बदलून दुसऱ्या खोलीत रहायला गेल्यानंतर मला शिंकांनीबेजार केले . ना मी बसू शकत होते ना काही करू शकत होते . माझे संपूर्ण अंग दुखत होते . मी स्वामींना विचारले , " मी या खोलीत आल्यानंतर असे का झाले ? " मला ध्यान करणेही शक्य होत नव्हते . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साई राम    

गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

      " आपली चिंता व आपले अश्रू जे पूर्वनिर्धारित असते त्यामध्ये बदल करू शकत नाही . त्या ऐवजी तुम्ही परमेश्वरासाठी अश्रू ढाळा, तुमच्या चिंतेचे त्याच्या दर्शनाच्या विनवणीमध्ये  परिवर्तन करा."

वसंतामृतमाला 
पुष्प २८ 
प्रलय आणि नवनिर्मिती

  
४ जुलै २०१३ ध्यान 
वसंता - स्वामी, तुम्ही २२ जुलै म्हणजे २२ / ७ असे दाखविण्यास बटनावर ' पाय ' ( गणितातील एक संज्ञा ) चे चिन्ह काढलेत . तुम्ही मला वेद , वेदांत , योग अशा सर्व विषयां विषयी सांगता . तथापि सकाळी लिहलेला मजकूर मी संध्याकाळी विसरून जाते . असे असता मी कशी बरं तुमची शक्ती ? तुम्ही भगवान आहात . 
स्वामी - जे मी जाणतो ते सर्व तुलाही ज्ञात आहे ; फक्त ते तुझ्यात सुप्तावस्थेत आहे . जर ते तुझ्याद्वारे अभिव्यक्त झाले असते तर तुही भगवंत होऊन माझ्यासारखे भाष्य केले असतेस . त्याने विश्वाला कसा लाभ झाला असता ? मी ८४ वर्षे उपदेश केला परंतु किती जणांमध्ये परिवर्तन घडले ? विरहवेदनांनी अश्रू ढाळत जगाला बदलण्यासाठी तू ' मी विना मी ' बनून येथे आलीस . आपण दोघं एक आहोत . तू माझी अर्धांगी आहेस . वास्तविक आपण दोघं शिवशक्ती असल्याचे जगाला दर्शविण्याकरीता आपण येथे आलो आहोत . 
ध्यान समाप्त 
            आता आपण याविषयी पाहू . मी दररोज स्वामींचे व्हिडीओ पाहते, त्यांची पुस्तके वाचते . या महाअवताराने वेद आणि उपनिषदांचे वर्ग घेऊन सर्व काही शिकविले . जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या सर्व घडामोडी त्यांना ज्ञात आहेत . मला काहीही माहिती नसते . सकाळी लिहिलेले मी संध्याकाळी विसरून जाते . असे असताना कसे बरं त्यांची शक्ती होईन ? सदैव याविषयी चिंता करत मी अश्रू ढाळत असते . ह्याचे कारण आता स्वामींनी सांगितले . 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साई राम

रविवार, ५ ऑक्टोबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

       " मातेचा त्याग एवढा महान असतो की फक्त तिच्यापुढे नतमस्तक झाले तरी पुरेसे आहे . " 

पुष्प २७ पुढे सुरु

               हरीची थोरवी गाण्याव्यतिरिक्त दुसऱ्या कशानेही जीवनात शांती मिळत नाही . भगवन्नामाशिवाय दुसरे काहीही आपल्याला आनंद देऊ शकत नाही . माणसाला केवळ प्रेमभक्ती संसार सागरातून तारू शकते . गुरुसेवाच  मुक्ती प्रदान करू शकते . योग शिकण्याची गरज नाही . जप व ध्यान पुरेसं आहे . प्रज्ञानम् म्हणजे ईश्वर साक्षात्कार ; म्हणूनच आपण म्हणतो , ' प्रज्ञानम् ब्रम्ह '. प्रज्ञान देहात असते त्यास जागृत केले पाहिजे . हे ईश्वर दर्शन आहे . साधनेद्वारे आपण आपले प्रज्ञान जागृत करतो ; त्यामुळे साक्षात्कार होतो . दया हा एकच धर्म आहे . याशिवाय कुठलेही कर्म चांगले होऊ शकत नाही . भगवंताशिवाय कोणीही आपले नाही . हे जग सोडताना आपण काहीसुद्धा बरोबर घेऊन जात नाही . या भजनावर रोज चिंतन करा . त्याचा अर्थ जाणून घ्या . असे केल्यास तुम्हाला कोणताही योग शिकण्याची गरज नाही .
               तुम्ही सर्वांवर प्रेम करायलाच हवे . भगवंताला धरून ठेवा . पुरे ! जागे व्हा ! ममत्वाचा त्याग करा , प्रेम करा . ममत्व प्रेमाहून वेगळे आहे . सर्वांवर सारखे प्रेम करा . संसार सागरातून बाहेर पडा.

                 
स्तूप गीत , साधना करा

                    हे मूढजनांनो ,
                    शोध घेता तुम्ही कशाचा ? 
                    या बाह्य मायावी जगतात 
                    शोध घेता तुम्ही कशाचा ?

                    कोरस

                    सुखाची आस असे का अंतरी ? 
                    वा मनिषा धनदौलतीची ?
                    अंतर्मुख होऊनी 
                    करा साधना , करा साधना 
                    करत राहा मार्गक्रमण अंतरंगी 

                    हृदयातील तिमिरात 
                    दिसेल तुम्हा एक दिव्य ज्योत 
                    तोच असे अंतरात्मा 
                    द्या त्यासी दृढ आलिंगन , दृढ आलिंगन 

                    कोरस

                    सुखाची आस असे का अंतरी ? 
                    वा मनिषा धनदौलतीची ?
                    अंतर्मुख होऊनी 
                    करा साधना , करा साधना 
                    करत राहा मार्गक्रमण अंतरंगी 

                    तेजोमय बनवा ती अंतर्ज्योत
                    दूर करा अज्ञानाची रात 
                    करिता त्याग तव साधना फलाचा 
                    होईल दर्शन तुम्हा मुक्तीताऱ्याचे ! 

                    कोरस 

                   सुखाची आस असे का अंतरी ? 
                   वा मनिषा धनदौलतीची ?
                   अंतर्मुख होऊनी 
                   करा साधना , करा साधना 
                   करत राहा मार्गक्रमण अंतरंगी 

जय साईराम

   

गुरुवार, २ ऑक्टोबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " जर आपण फक्त परमेश्वराला दृढ धरून ठेवले तर इतर सर्व गोष्टी आपोआपच आपल्याला सोडून जातील . "

पुष्प २७ पुढे सुरु 

           साध्या , खेडूत अशिक्षित गोपिकांना हे माहित होते . त्या कृष्णासोबत रासलीला करीत . प्रत्येक गोपीसमोर एक कृष्ण दृश्यमान होत असे . हाती हात घेऊन त्या रासलीला खेळत . भगवंताशी अंतरंगात झालेल्या ऐक्याचा मधूर अनुभव त्यांनी रासलीलेद्वारे बाह्य जगास दाखविला . अंतर्यामी प्रभूचे रसपान , अमृतपान आपण केलेच पाहिजे . असे झाले तर या जगातील अनुभव , सर्व भौतिक रस रसहीन होतील . मतिरस या शब्दाची संधी जर आपण सोडवली तर मति रस होते. मति म्हणजे मेधा , बुद्धी , रसज्ञान . हा आहे ज्ञानरस . ही ज्ञान प्राप्ती हाच आनंद आहे . जर हे ज्ञान आपण प्राप्त केले नाही तर ' मी अन् माझे ' यात कायमचे जखडून आपण जन्ममृत्युच्या चक्रात अडकून राहू . मनामुळे तणाव व आजार निर्माण होतात . सर्वांगीण निरामय संपूर्ण स्वास्थासाठी तणावरहित होणे हा राजमार्ग आहे . आपण यावर चिंतन केल्यास आपण कोणत्या अवस्थेत आहोत याची आपल्याला अचूक कल्पना होईल . आपल्यातील तणावांची कारणभीमंसा करून निरामय आरोग्याचा मार्ग आपणच शोधला पाहिजे . तणावरहित होण्यासाठी लोकं योगाक्लासला जातात . तथापि , एका तासाच्या योगवर्गाने तणावरहित होता येत नाही . आपल्या पूर्वजांनी घालून दिलेले नीति नियम जीवनात पाळायला हवेत . श्वास आत घेण्यास , बाहेर सोडण्यास लागणारा वेळ म्हणजे श्वासाचे अवलोकन करणे , याचा अभ्यास म्हणजे योग आहे . 
            मुलांबरोबर खेळून , गाऊन अथवा हसून तणावरहित होण्याचा प्रयत्न करणे उपयोगाचे नाही . म्हणून स्वामींनी इथे  ×  ही खून केली . याने तणाव येण्याचे कधीही थांबणार नाही . हे केवळ धार्मिक जीवन जगणे , योग्य वर्तणूक , प्रेमळ संभाषण आणि यथार्थ ज्ञान याद्वारेच शक्य आहे . असे केल्यानेच आपण तणाव रहित होऊ शकू . ह्या महोत्तम अवताराने इथे अवतरून ८४ वर्षे याची शिकवण दिली . त्याने सर्व प्रकारांनी शिकवण दिली . नवजात अर्भक अवस्थेपासून ते वयोवृद्ध होईपर्यंत मानवाने कसे वागावे हे त्याने शिकविले .  हे लिहित असताना मला एका भजनाची आठवण आली ; हे भजन स्वामी गात असत , " हरी भजन बिना सुख शांती नाही ." 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......

जय साई राम