ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वर म्हणजेच प्रेम , ही शिकवण होय आणि प्रेम म्हणजेच परमेश्वर हे आचरण होय . "
पुष्प २८ पुढे सुरु
स्वामींनी सांगितले की , त्यांना ज्ञात असलेले सर्व मला ही ज्ञात आहे तथापि माझे ज्ञान सुप्तावस्थेत आहे . माझा जन्म स्वामींपासून झाला असून मी त्यांची अर्धांगिनी आहे . मी सर्व जाणते परंतु मी ' मी विना मी ' अवस्थेत असल्यामुळे मला काहीही माहित नाही . जर मला ' मी ' असता तर मी स्वामींसारखे वेदवेदांतावर भाष्य केले असते . याने काय साध्य होणार ? यामुळे जगातील कोणामध्येही परिवर्तन घडले नसते . स्वामींनी ८४ वर्षे उपदेश केला , किती लोक बदलले ? नाहीच ! स्वामी जग परिवर्तनासाठी अवतरले . मी त्यांच्या अवतार कार्यासाठी इथे आले . विरह वेदनांनी मी अश्रू ढाळते आहे , रडते आहे , आक्रोश करतेय . हे भाव स्तूपाद्वारे बहिर्गामी होत विश्वपरिवर्तन घडवतील . स्वामींच्या व माझ्या संभाषणाने बाह्य जगात ' विश्व गर्भ कोटम् ' चे मूर्तरूप धारण केले . हे आमचे हृदय आहे . येथून आमचे भाव स्तूपामध्ये प्रवेश करतात , स्तूपामधून बहिर्गमन करत विश्वामध्ये परिवर्तन घडवितात . स्वामी व मी विश्वपरिवर्तनासाठी इथे आलो . माझे भगवत् स्वरूप व्यक्त करणे उपयोगाचे नाही . स्वामी व मी शिवशक्ती आहोत . आमचे भाव सर्वांमधील कुंडलिनी जागृत करत त्यांना जीवनमुक्त अवस्था प्रदान करतात .
मी माझी रहायची खोली बदलून दुसऱ्या खोलीत रहायला गेल्यानंतर मला शिंकांनीबेजार केले . ना मी बसू शकत होते ना काही करू शकत होते . माझे संपूर्ण अंग दुखत होते . मी स्वामींना विचारले , " मी या खोलीत आल्यानंतर असे का झाले ? " मला ध्यान करणेही शक्य होत नव्हते .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा