ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जर आपण फक्त परमेश्वराला दृढ धरून ठेवले तर इतर सर्व गोष्टी आपोआपच आपल्याला सोडून जातील . "
पुष्प २७ पुढे सुरु
साध्या , खेडूत अशिक्षित गोपिकांना हे माहित होते . त्या कृष्णासोबत रासलीला करीत . प्रत्येक गोपीसमोर एक कृष्ण दृश्यमान होत असे . हाती हात घेऊन त्या रासलीला खेळत . भगवंताशी अंतरंगात झालेल्या ऐक्याचा मधूर अनुभव त्यांनी रासलीलेद्वारे बाह्य जगास दाखविला . अंतर्यामी प्रभूचे रसपान , अमृतपान आपण केलेच पाहिजे . असे झाले तर या जगातील अनुभव , सर्व भौतिक रस रसहीन होतील . मतिरस या शब्दाची संधी जर आपण सोडवली तर मति रस होते. मति म्हणजे मेधा , बुद्धी , रसज्ञान . हा आहे ज्ञानरस . ही ज्ञान प्राप्ती हाच आनंद आहे . जर हे ज्ञान आपण प्राप्त केले नाही तर ' मी अन् माझे ' यात कायमचे जखडून आपण जन्ममृत्युच्या चक्रात अडकून राहू . मनामुळे तणाव व आजार निर्माण होतात . सर्वांगीण निरामय संपूर्ण स्वास्थासाठी तणावरहित होणे हा राजमार्ग आहे . आपण यावर चिंतन केल्यास आपण कोणत्या अवस्थेत आहोत याची आपल्याला अचूक कल्पना होईल . आपल्यातील तणावांची कारणभीमंसा करून निरामय आरोग्याचा मार्ग आपणच शोधला पाहिजे . तणावरहित होण्यासाठी लोकं योगाक्लासला जातात . तथापि , एका तासाच्या योगवर्गाने तणावरहित होता येत नाही . आपल्या पूर्वजांनी घालून दिलेले नीति नियम जीवनात पाळायला हवेत . श्वास आत घेण्यास , बाहेर सोडण्यास लागणारा वेळ म्हणजे श्वासाचे अवलोकन करणे , याचा अभ्यास म्हणजे योग आहे .
मुलांबरोबर खेळून , गाऊन अथवा हसून तणावरहित होण्याचा प्रयत्न करणे उपयोगाचे नाही . म्हणून स्वामींनी इथे × ही खून केली . याने तणाव येण्याचे कधीही थांबणार नाही . हे केवळ धार्मिक जीवन जगणे , योग्य वर्तणूक , प्रेमळ संभाषण आणि यथार्थ ज्ञान याद्वारेच शक्य आहे . असे केल्यानेच आपण तणाव रहित होऊ शकू . ह्या महोत्तम अवताराने इथे अवतरून ८४ वर्षे याची शिकवण दिली . त्याने सर्व प्रकारांनी शिकवण दिली . नवजात अर्भक अवस्थेपासून ते वयोवृद्ध होईपर्यंत मानवाने कसे वागावे हे त्याने शिकविले . हे लिहित असताना मला एका भजनाची आठवण आली ; हे भजन स्वामी गात असत , " हरी भजन बिना सुख शांती नाही ."
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा