गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार 

        " जन्मजात आपल्यामध्ये अमर्याद शक्ती असते . त्यायोगे मनुष्य पंचतत्वांनाही नियंत्रणात ठेवू शकतो . " 

पुष्प २८ पुढे सुरु 

३ जुलै , प्रातः ध्यान 
वसंता - स्वामी , प्लीज आश्रमवासी सदैव माझ्याबरोबर असावेत .
स्वामी - हो . सर्वजण तुझ्या सोबत असतील . मी तुला खोली बदलायला का सांगितले माहिती आहे ? तेथे तुझी स्पंदने भरून उरली आहेत . ही स्पंदने आश्रमवासीनमध्ये परिवर्तन करतील . तेथे ध्यान केल्याने त्यांना अधिक उर्जा मिळेल . 
वसंता - आता मला समजले स्वामी , मी लिहीन . केदारनाथ मंदिरावर अशी आपत्ती का ओढवली ? 
स्वामी - तुझ्या अश्रूरुपी प्रेमगंगेच्या वेगवान प्रवाहाने संपूर्ण जगाचा संहार झाला असता म्हणून शिवाने तिला आपल्या मस्तकावर धारण केले . मी तुला तुझा संदर्भ गंगेशी जोडून लिहिण्यास सांगण्याचे हे कारण . इंद्रादि देवांनी मला सांगितले की तुझ्या अश्रूंच्या आवेगात जगाचा संहार करण्याची ताकद आहे . केदारनाथच्या घटनेद्वारे हे दर्शविले गेले . 
ध्यान समाप्त . 
            आता आपण ह्या विषयी पाहू . स्वामींनी मला खोली बदलण्यास कां सांगितले ? आश्रमवासी मला सोडून जातील की काय अशी भीती मला वाटली . स्वामींनी नंतर सांगितले , " त्या खोलीत बसून ध्यान केल्याने तेथील स्पंदने त्यांचे परिवर्तन करतील ." त्या खोलीमध्ये माझी भावस्पंदने अधिक तीव्र आहेत . नंतर मी स्वामींना केदारनाथ मंदिरावर ओढवलेल्या आपत्तीचे कारण विचारले . तेथील संहाराचे फोटो आजच मी वर्तमानपत्रात पाहिले . बाहेरील जगात घडणाऱ्या घटनांची गंधवार्ताही आम्हाला नसते . वर्तमान पत्र पाहिल्यानंतर ही समग्र बातमी मला कळली . ही दुदैवी घटना १९ जूनला घडली . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साई राम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा