ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" जेव्हा इंद्रियांवर नियंत्रण असते तेव्हा मन आपोआपच नियंत्रित होते . "
पुष्प २८ पुढे सुरु
ह्यानंतर मला दातदुखी सुरु झाली . माझं डोकं , मान व कानांत अतिशय वेदना होत होत्या . दंतवैद्याने काही औषधे दिली . मुख जलतत्वाशी संबंधित आहे . त्याचवेळी स्वामींनी मला गंगेविषयी लिहिण्यास सांगितले . मी लिहिल्यानंतर गंगेला महापूर आला . ज्या महापुराने संपूर्ण जगाला अपरिमित हानी पोहोचली असती , तो जलप्रलय थांबविण्यात आला.
अग्नितत्वाच्या प्रदूषणामुळे माझ्या शरीरात न् मस्तकात दाह होत आहे . मी केस धुवून स्नान केले . डोके पुसत असताना खूप उष्णता जाणवत होती . विमला माझ्या पायांना तेल लावताना म्हणाल्या की त्यांच्या हाताला भाजल्यासारखी जाणीव होत होती . हा अग्नि आहे . अशा तऱ्हेने मी सर्व पंचमहाभूतांपासून ओढवणाऱ्या आपत्ती थांबविल्या .
साधारणतः प्रलयानंतर कलियुग संपुष्टात येते व नवयुग निर्माण होते . आता स्वामी प्रलयाविना सत्ययुग आणत आहेत . मी प्रकृति असल्याने माझ्यावर सर्वाधिक परिणाम होतो. ६ तारखेच्या रात्री मी एक नवीन औषध घेतले.
उर्वरित वसंतामृत पुढील भागात .......
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा